गुड न्यूज..आराेग्य, वैद्यकीय विभागातील 50% भरती लवकरच सुरू

By Naukari Adda Team


गुड न्यूज..आराेग्य, वैद्यकीय विभागातील 50% भरती लवकरच सुरू, Good news..health, 50% recruitment in medical department will start soon

काेराेना विषाणूचा मुकाबला करताना वैद्यकीय आराेग्य यंत्रणा, आराेग्य विभाग व गृहविभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आल्याची परिस्थिती आहे. संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी या विभागाने केलेल्या उपाययाेजना व धावपळ लक्षात घेता उपराेक्त विभागातील एकूण रिक्त पदांच्या ५० टक्के रिक्त पदभरतीसाठी शासनाने हिरवी झेंडी देताच विभागीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.

देशासह राज्यात काेराेनाचा सामना करण्यासाठी गृहविभाग, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य यंत्रणा एकदिलाने सरसावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणेने आटाेकाट प्रयत्न केल्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले; परंतु अद्यापही ही साथ कायम असून, संभाव्य साथीचा मुकाबला करण्याच्या निमित्ताने का हाेईना, शासनाने गृहविभाग, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य यंत्रणेत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदांसाठी भरती राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय नाेकऱ्यांमधील मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश देत उपराेक्त पदांसाठी बिंदुनामावलीनुसार मंजूर पदांसाठी पदभरती करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

लहान संवर्गातील पदभरतीला प्राधान्य 

 गृह, आराेग्य व वैद्यकीय आराेग्य विभागातील वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा संवर्ग वगळता लहान संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदभरतीला प्राधान्य देण्यात आले आहे. तसे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. शासनाच्या निर्णयामुळे सुशिक्षित बेराेजगार तरुणांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

 

 

सोर्स:लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Good news..health, 50% recruitment in medical department will start soon

By Naukari Adda Team


There is a situation where the staff of the medical health system, the health department and the home department are under additional stress while fighting the Carina virus. Considering the measures taken by this department to control the contagious diseases and the rush, the process has started at the divisional level as soon as the government gave the green signal for 50 per cent of the total vacancies in the above department.

The Home Department, health and medical systems have come together to tackle the problem in the country and the state. Efforts by the concerned agencies to control this epidemic also showed positive results; However, this support is still there, and in order to combat the potential epidemic, the government has taken steps to improve the Home Department, health and medical care systems. For this, the government has sanctioned recruitment for 50% of the total vacancies. In this regard, the General Administration Department has issued instructions not to implement the Maratha reservation in the government offices as per the order of the Supreme Court and to fill the posts for the sanctioned posts as per the point list for the above posts.

Preference for small cadre recruitment

Preference has been given to the recruitment of junior cadres except for the senior category of officers in the Home, Health and Medical Health Departments. That is the clear direction of the government. The government's decision has created a ray of hope among the educated unemployed youth.

 

 

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda