पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार

By Naukari Adda Team


 पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार, The advertisement for police recruitment will be announced in eight days

राज्याच्या पोलिस दलात तब्बल १२ हजार ५३८ पदांची जम्बो भरती करण्यात येणार असून या पोलिस भरतीची जाहिरात येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. पोलिस भरती लवकर करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करताना देशमुख यांनी हे आश्वासन दिले आहे.

पोलिस भरतीच्या पहिल्या टप्प्यात ५ हजार २९७ पदांची भरती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्यातील पोलिस भरती करण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. त्यानंतर देशमुख यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पोलिस भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत. १२ हजार ५३८ जागांची भरती पूर्ण झाल्यानंतर गरज पडल्यास आणखी ५ हजार पदेही भरण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

गृह विभागाने २०१९ मध्येच नोकरभरतीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ९ सप्टेंबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पोलिस भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. २०१९ च्या पोलिस भरतीत एसईबीसी प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्याचा शासनादेश ४ जानेवारी २०२१ रोजी गृह विभागाने जारी केला होता. मात्र तो तीनच दिवसांत रद्द करून मराठा समाजाच्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देणारा नवा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

सोर्स: न्यूजटाऊन


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The advertisement for police recruitment will be announced in eight days

By Naukari Adda Team


A jumbo recruitment of 12,538 posts will be done in the state police force and the advertisement for this police recruitment will be issued in the next eight days, announced Home Minister Anil Deshmukh. A bell-ringing agitation was organized by the National Federation of OBCs today demanding early recruitment of police. Deshmukh has given this assurance while discussing with the delegations of these protesters.

In the first phase of police recruitment, 5 thousand 297 posts will be recruited. Deshmukh also said that the second phase of police recruitment will be started as soon as the first phase is completed. After that, Deshmukh also interacted with the media. The Home Department has been directed to complete the police recruitment process immediately. After the recruitment of 12,538 posts is completed, if necessary, another 5,000 posts will be considered, said Deshmukh.

The Home Department had announced the recruitment decision in 2019 itself. However, on September 9, 2020, the Supreme Court adjourned the implementation of the reservation of the Maratha community, the police recruitment process was stopped. On January 4, 2021, the Home Department had issued a government order to accept candidates applying for the 2019 police recruitment from the SEBC category in the open category. However, it has been canceled in just three days and a new government order has been issued to give reservation to the candidates of Maratha community from EWS category. Therefore, the candidates from the Maratha community have got great relief.

 

 

Source: Newstown


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda