२७ जानेवारीपासून सुरु होणार पाचवी ते आठवीच्या शाळा

By Naukari Adda Team


२७ जानेवारीपासून सुरु होणार पाचवी ते आठवीच्या शाळा, Schools 5th to 8th will start from 27th January

महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरु करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनावरच सोडण्यात आला आहे. स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. अर्थात यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा शाळा उघडण्यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला. करोनासंदर्भातली खबरदारीच्या सर्व उपाययोजना अंमलात आणून, सर्व नियम पाळूनच शाळा सुरू करा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

गायकवाड म्हणाल्या, 'आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य करुन येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत असताना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती पूर्वतयारी करणे, स्थानिक प्रशासनाने तयारीची जबाबदारी घेणे, पालकांची संमती आणि शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विविध SOP येत्या काळात आम्ही निर्गमित करू.'

मुंबईतील शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच

मुंबईतील शाळा मात्र पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद होत्या. त्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंदच राहतील. यासंदर्भातल्या परिपत्रकात मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी म्हटले आहे की मुंबईतील करोनास्थिती नियंत्रणात आहे, मात्र देशात अन्य राज्यातील करोनास्थिती पाहता आणि अन्य देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका हद्दीतील शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच राहतील.

 

 

सोर्स : म.टा 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Schools 5th to 8th will start from 27th January

By Naukari Adda Team


Against the backdrop of declining corona prevalence in Maharashtra, the state government has given the green light to start classes V to VIII in the state from January 27. The final decision, however, is left to the local administration. The local administration has to decide on this according to the local situation. Of course, parental consent, teacher's RTPCR test, etc., all the previous rules will continue to apply. School Education Minister Varsha Gaikwad has given information in this regard.

Varsha Gaikwad said that a proposal to open the school was put before Chief Minister Uddhav Thackeray. Chief Minister Uddhav Thackeray has also instructed to start the school by implementing all the precautionary measures regarding corona and following all the rules.

Gaikwad said, "Today, we had made a request to the Chief Minister to start 5th to 8th schools through the school education department and he has accepted the request and has decided to start 5th to 8th schools from January 27. While making this decision, proper preparation on the basis of corona, taking responsibility of preparation by the local administration, consent of parents and RTPCR test of teachers will be done. We will issue various SOPs in this regard in the near future. '

Schools in Mumbai closed till further orders

However, the Mumbai Municipal Corporation has decided to keep the schools in Mumbai closed till further orders. Mumbai Municipal Corporation schools were closed till January 15. They will remain closed until further notice. In a circular, Mumbai Municipal Corporation Education Officer Mahesh Palkar said that the corona situation in Mumbai is under control, but considering the corona situation in other states in the country and against the backdrop of the second wave of corona in other countries, schools in Mumbai Municipal Corporation will remain closed till further orders.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda