HCL करणार 20 हजार कर्मचाऱ्यांची महाभरती!

By Naukari Adda Team


HCL करणार 20 हजार कर्मचाऱ्यांची महाभरती!, HCL to recruit 20,000 employees!

 लॉकडाऊनचा काळ आणि सध्या ऑनलाईन व्यवहारावर सरकारचा असलेला भर या गोष्टींमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र भरभराटीला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीच्याहीमहसुलात मागील तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल वाढ आणि या क्षेत्रात होणारी प्रगती लक्षात घेता आगामी काळातहजार जणांना नोकरी देणार आहे.

मागील तिमाहीतच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. या कंनीच्या निव्वळ नफ्यामध्ये तब्बल 31 टक्क्यांनी वाढ झालीये. कंपनीने सांगितल्यानुसार हा नफा 3982 कोटी रुपये आहे. तसेच कंपनीच्या एकूण महसुलात 6.4 टक्क्यांनीव वाढ जाली असून हा महसूल 19302 कोटी रुपये आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आगामी काळात या कंपनीकडून 20 हजार नवे रोजगार दिले जातील, असं एका अधिकाऱ्यांने सांगितलंय.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विजय कुमार यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मागील काही महिन्यांमध्ये कंपनीने अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. तसेच, लोकांचे डिजिटल सेवा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन HCL Technology आगामी काळात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीत 1,59,682 कर्मचारी कामावर होते. मागील तिमाहीमध्ये आम्ही एकून 12,422 जणांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यानंतर मधल्या काळात अनेकांनी राजीनामे दिले. त्यामुळे पुढच्या 4 ते 6 महिन्यांत 20 हजार जणांना काम देणार आहेत.” यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तसेच अनुभवी लोकांची निवड करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. मात्र आता सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत झाल्यानंतर बाजारात तेजी आली आहे. त्यामुळे HCL Technology कंनीच्या नफ्यामध्येसुद्धा चांगली वाढ झाली. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात HCL Technology या कपंनीला 26.7 टक्के जास्त फायदा झाल्याचं या कंपनीने सांगितलं आहे.

 

 

 

सोर्स : टीव्ही 9 मराठी


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


HCL to recruit 20,000 employees!

By Naukari Adda Team


The information and technology sector is booming due to the lockdown period and the government's current emphasis on online transactions. HCL Technology, a leading company in the field of information and technology, also saw a significant increase in revenue in the last quarter. Therefore, considering the increase in revenue and progress in this field, it will provide jobs to thousands of people in the near future.

Revenue has increased significantly in the last quarter. The company's net profit has increased by 31 per cent. According to the company, the profit is Rs 3,982 crore. The company's total revenue grew by 6.4 per cent to Rs 19,302 crore. Therefore, against this backdrop, the company will provide 20,000 new jobs in the near future, an official said.

The company's Chief Executive Officer (CEO) Vijay Kumar has given detailed information about this. He said, “The company has entered into a number of important agreements in the last few months. Also, people's use of digital services has increased. With all this in mind, HCL Technology is gearing up for a major recruitment drive in the near future. As of December 31, 2020, the company had 1,59,682 employees. In the previous quarter, we employed a total of 12,422 people. In the meantime, many resigned. So in the next 4 to 6 months, 20,000 people will be employed. ” Speaking on the occasion, he said that new and experienced people will be selected while recruiting the staff.

All transactions were stalled due to lockdown. But now that all transactions have been smooth, the market has picked up. As a result, HCL Technology also increased its profits. HCL Technology reported a 26.7 per cent increase in October compared to the September quarter.

 

 

 

Source: TV9 Marathi


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda