डोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह!

By Naukari Adda Team


डोंबिवलीची मुले बनवणार उपग्रह!, Dombivli children to build satellite!

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि 'स्पेस झोन ऑफ इंडिया'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज चॅलेंज, २०२१ स्पर्धेत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना डॉ. कलाम फाऊंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी दत्तक घेतले असून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. १९ जानेवारीला पुण्यातील हडपसर येथील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या उपग्रह बनविण्याच्या प्रकल्पात हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात स्पेस टेक्नोलॉजीबाबत जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नोलॉजीमध्ये विद्यार्थी योगदान देण्यासाठी तयार होतील, या अपेक्षेने डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनने १०० पेलोड उपग्रह बनवून हेलिअम बलून द्वारे अवकाशात नेण्याच्या प्रकल्पात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे. उपग्रह तयार करण्यापूर्वी स्पेस रिसर्च क्युब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय, त्याचे विविध भाग कोणते, त्यांचे कार्य कसे चालते, हेलियम बलून म्हणजे काय, उपग्रह बनविण्यासाठी कोणत्या वस्तूंचा वापर करतात, कोणते सेन्सर बसवतात, कोणते सॉफ्टवेअर वापरावे याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाद्वारे दिली जात आहे.

२५ ते ८० ग्रॅम वजनाचे उपग्रह बनवून ३५ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर हाय अल्टिट्युड सायंटिफिक बलूनद्वारे एका केसमध्ये असलेले उपग्रह स्थापित केले जातील. तर त्यातील कॅमेरा, पॅराशूट, जीपीएस ट्रेकिंग सिस्टीम मधून ओझोन, कार्बनडाय ऑक्साइड, हवेची शुद्धता, प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. उपग्रह बनविण्याच्या कृतीची जागतिक पातळीवर नोंद होणार असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. पालिकेचे १० विद्यार्थी एकाग्रतेने उपग्रह बनविण्याचे प्रशिक्षण घेत असून लवकरच एखाद्या उपग्रह बनविण्याच्या कामात कल्याण डोंबिवलीचे नाव अभिमानाने घेतले जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

सोर्स : म.टा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Dombivli children to build satellite!

By Naukari Adda Team


Dr. A. P. J. 10 students from Kalyan Dombivali Municipal Corporation schools have been selected for the Space Research Payload Cubes Challenge, 2021 organized by Abdul Kalam International Foundation and Space Zone of India. These students are Dr. Secretary of Kalam Foundation Milind Chaudhary has been adopted and is undergoing training. These students will participate in the satellite building project to be held on January 19 at Jayawantrao Sawant Engineering College, Hadapsar, Pune.

With the expectation that students will be curious about space technology in school life, students will be ready to contribute to space technology in the future. The APJ Abdul Kalam International Foundation has involved 100 schoolchildren in a project to build 100 payload satellites and launch them with helium balloons. Before building a satellite, students are given information about what is a space research cube type satellite, what are its different parts, how they work, what is a helium balloon, what materials are used to make a satellite, what sensors are installed, what software to use.

Satellites weighing 25 to 80 grams will be made and installed in a single case by high altitude scientific balloon at an altitude of 35,000 to 38,000 meters. The satellites will send ozone, carbon dioxide, air purity, pollution, air pressure and other information from the camera, parachute, GPS tracking system to the center of the earth. The work of making the satellite will be recorded globally and certificates will be given to the participating students. It is believed that 10 students of the municipality are training to make satellites with concentration and soon Kalyan Dombivali will be proudly named in the work of making a satellite.

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda