शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By Naukari Adda Team


शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, Emphasis should be placed on educational quality: Chief Minister Uddhav Thackeray

राज्यातील शाळांच्या गुणावत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी १५ जानेवारी रोजी दिले. शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन 2025 असे सादरीकरण आज शालेय शिक्षण विभागाच्यावतिने मुख्यमंत्र्यांच्या समोर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदी, परिक्षा मंडळाचे संचालक दिनकर पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्याचे शालेय शिक्षणाचे व्हिजन तयार करित असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता हा विषयावर अधिक लक्ष देण्यात यावे. आताच्या काळात व्यावसायिक शिक्षण महत्वपूर्ण ठरत असल्याने विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावे. शैक्षणिक आणि पायाभूत सुधारणा करण्यासाठी दरवर्षाचा कार्यक्रम तयार करावा आणि त्यासाठी दरवर्षी किती निधी लागेल याप्रमाणे तरतूद करण्यात यावी.

राज्यातील शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने शाळांमध्ये फेजवाईज इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावे. मुलांना सध्याच्या शिक्षण पद्धती बरोबरच नैसर्गिकरित्याही शिक्षण घेता येईल का या पद्धतीने शाळेची रचना करावी. यासाठी बोलक्या भिंती यासारखे उपक्रम राबवता येतील का हे सुध्दा पाहण्यात यावे, शाळेची इमारत हे शिक्षणाचे स्थान कसे होईल यासाठी पथदर्शी उपक्रम राबवावेत असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

शालेय शिक्षण विभागाच्या व्हिजन नुसार काम करताना तातडीने हाती घ्यावयाची कामे आणि दीर्घकालीन कामे याचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, तसेच या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कंपन्याचा शोध घेऊन सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत शालेय विकासासाठी काय करता येईल आणि त्यांना शासनाबरोबर कसे जोडले जाईल यासाठी विभागाने प्रयत्न करावा असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड यावेळी म्हणाल्या की, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि शिक्षणाची गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधांसाठी शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण रोखणे, ५ हजार आदर्श शाळांची निर्मिती करणे, शिक्षक भरती यासारखे उद्दिष्ट असलेले शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ चे सादरीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत आज करण्यात आले. परफॉर्मन्स ग्रेडिग इंडेक्समध्ये सुधारणा करण्यासाठी, शिक्षकांचे उत्तरदायित्व वाढविणे, शासन निर्णय, कायद्यांचे फेरनिरीक्षण व सुलभीकरण करणे, गुणवत्तेवर आधारीत मुख्याध्यापकांची भरती करणे यासारख्या उपाययोजना करणार असल्याची माहितीही सादरीकरणादरम्यान प्रा. गायकवाड यांनी दिली. 

 

सोर्स : म.टा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Emphasis should be placed on educational quality: Chief Minister Uddhav Thackeray

By Naukari Adda Team


On Friday, January 15, Chief Minister Uddhav Thackeray directed that a road map of school education in the state should be prepared by taking a district-wise review of the quality of schools in the state and planning the measures required for it. School Education Department's Vision 2025 was presented to the Chief Minister on behalf of the School Education Department today. He was talking at the time.

At this time, the school education minister Pvt. Varsha Gaikwad, Additional Chief Secretary Vandana Krishna, Education Commissioner Vishal Solanki, Maharashtra State Education Council Director Rahul Dwivedi, Board of Examiners Director Dinkar Patil and other senior officials were present. More attention should be paid to the subject. As vocational education is important nowadays, students should be guided in competitive examinations from the age of eight. An annual program should be prepared for educational and infrastructural improvement and provision should be made according to the amount of funds required for it every year.

It is important for schools in the state to use information technology. In view of this, phase wise internet facility should be made available in schools. The school should be designed in such a way that the children can learn naturally along with the present education system. Thackeray also said that it should be seen whether activities like talking walls can be implemented for this and pioneering activities should be implemented to make the school building a place of education.

According to the vision of the school education department, priority should be given to immediate work and long term work, as well as what can be done for school development under social responsibility by finding companies looking to work in this field and how to link them with the government. .

School Education Minister Pvt. Gaikwad said that there is a need to increase the budgetary provision of the school education department for the infrastructure required for universalization of education and enhancement of quality of education. The Department of School Education's Vision 2025 was presented today by the School Education Department with the objective of reducing the dropout rate of school children, creating 5,000 ideal schools, teacher recruitment. During the presentation, Pvt. Gaikwad gave.


Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda