मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारीला

By Naukari Adda Team


मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारीला, Mumbai University Convocation Ceremony on 1st February

मुंबई विद्यापीठाचा २०२० चा शैक्षणिक वर्षाचा दीक्षान्त समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न होणार आहे. यासाठी प्रथम सत्र २०२० मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी) नाव अचूक यावे म्हणून मराठी (देवनागरी) नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०२१ पासून ते २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील तपासणीसाठी उपलब्ध

सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील अचूक आहे का हे पहावे असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक आहे. या लिंक दुरुस्तीसाठी २२ जानेवारीपासून अॅक्टिव्ह होतील. महाविद्यालयांनी लॉगइन आयडी आणि पासवर्ड देऊन लिंक ओपन करावी. विद्यार्थ्यांसाठीही करेक्शनची स्वतंत्र लिंक आहे.

 

 

सोर्स : म.टा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mumbai University Convocation Ceremony on 1st February

By Naukari Adda Team


The convocation ceremony of the University of Mumbai for the academic year 2020 will be held on February 1, 2021. For this, in order to ensure that the Marathi (Devanagari) name is correct on the degree certificate of the students who have passed the examinations of various degree and postgraduate courses conducted by the university in the first session 2020, to avoid possible errors in the Marathi (Devanagari) name, the details of the students are available at www.mu.ac.in. On the website It is being made available for inspection from 22nd January 2021 to 27th January 2021 till 5 pm.

Details of Marathi (Devanagari) name on the degree certificate are available for investigation

All the students and colleges should visit the website of the university and see if the details of their Marathi (Devanagari) name are correct, appealed the Director of the Board of Examinations and Assessment of the University, Dr. Vinod Patil has done it. There is a separate link on the website for colleges and students. These links will be activated for repairs from January 22. Colleges should open the link by giving the login ID and password. There is also a separate link for correction for students.

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda