१०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी

By Naukari Adda Team


१०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी , Opportunity to see 100 meritorious students on Republic Day

देशभरातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे संचलन पाहण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण मंत्रालयाने रविवार २४ जानेवारी रोजी ही माहिती दिली आहे. शिक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटनुसार 'देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या बॉक्समधून थेट प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहण्याची संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना भेटण्याचीही संधी मिळणार आहे.'

हे विद्यार्थी शालेय तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील आहेत. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या २०२० या शैक्षणिक वर्षाच्या दहावी आणि बारावीच्या टॉपर्ससह विविध विद्यापीठे आणि यूजी, पीजी कोर्सेसच्या टॉपर्सचा या १०० विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. या विद्यार्थ्यांना परेड पाहिल्यानंतर प्रोत्साहन प्रमाणपत्रेही देण्यात येणार आहेत. दुसरीकडे, पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या १०० विद्यार्थ्यांपैकी ५० जण उर्वरित उच्च शिक्षण संस्थांमधील आहेत.

मागील वर्षीदेखील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सीबीएसई बोर्डाच्या टापर्स आणि विद्यापीठांच्या टॉपर्स अशा एकूण १०५ विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी देण्यात आली होती.

मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना महामारीमुळे आवश्यक त्या खबरदारीसह मोटारसायकल स्टंट आदि प्रजासत्ताक दिनाच्या संचलानाचे आकर्षण असणारे कार्यक्रम यंदा समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. शिवाय प्रेक्षकांची संख्याही घटवून २५ हजार पर्यंत करण्यात आली आहे. शौर्य पुरस्कार मिळवणारी मुले आणि अन्य पुरस्कार प्राप्त मंडळींनाही यंदाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.

 

 

सोर्स : म.टा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Opportunity to see 100 meritorious students on Republic Day

By Naukari Adda Team


100 meritorious students from all over the country will get a chance to see the Republic Day movement. The Ministry of Education has given this information on Sunday, January 24. According to a tweet from the Ministry of Education, 'meritorious students from across the country will be given the opportunity to watch the Republic Day procession live from the Prime Minister's box. Union Education Minister Dr. students. I will also get a chance to meet Ramesh Pokhriyal Nishank.

These students are from school as well as higher education sector. According to the Ministry of Education, the 100 students include toppers of CBSE board for the 10th and 12th academic year 2020, toppers of various universities and UG, PG courses. These students will also be given incentive certificates after watching the parade. On the other hand, according to PTI, 50 of the 100 students are from the rest of the higher education institutions.

Last year too, a total of 105 students, including CBSE board toppers and university toppers, were given the opportunity to witness the Republic Day celebrations.

According to ministry officials, Republic Day activities, including motorcycle stunts with the necessary precautions due to the Corona epidemic, have not been included this year. Besides, the number of spectators has also been reduced to 25,000. Children who received the gallantry award and other award-winning congregations were not included in this year's 72nd Republic Day Parade.

 

 

 

Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda