करोनाची भिती कायम; पुण्यात ५० टक्के शाळा उघडूनही उपस्थिती अत्यल्प

By Naukari Adda Team


करोनाची भिती कायम; पुण्यात ५० टक्के शाळा उघडूनही उपस्थिती अत्यल्प, Corona

‘लॉकडाउन’नंतर 'अनलॉक' झाले तरीही पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, सुमारे अकरा महिन्यानंतर अखेर पुणे जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारी सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्याच्या भागातील सुमारे ५० टक्के शाळा भरल्या असून शाळांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरु झाला. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता. मुलांना शाळेत सोडण्यास आलेले पालक शाळांमधील सुविधा पाहणी करण्यास विसरले नाहीत.
पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण ३ हजार ७५४ शाळा असून, त्यात ७ लाख १५ हजार ८३१ विद्यार्थी संख्या आहे. त्यामध्ये पुणे ग्रामीण भागातील तेरा तालुक्यांमध्ये १ हजार ७९४ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या ७९६ शाळामधून ५५ हजार ९ विद्यार्थी आहेत. तसेच खासगी ९९८ शाळामध्ये २ लाख ९२ हजार ९९२ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दौंड तालुका वगळता बारा तालुक्यांची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार एकूण १ हजार ६७० शाळांपैकी १ हजार १०५ शाळा बुधवारी सुरु झाल्या. त्यामध्ये एकूण २ लाख २९ हजार २६५ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी ५६ हजार

४५० विद्यार्थ्यांनी लॉकड़ाउननंतर प्रथमच शाळेत हजेरी लावली. ५० टक्के शाळा सुरु झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यींची उपस्थिती मात्र २५ टक्केच असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

 

सोर्स : म.टा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Corona's fears persist; Even after opening 50% schools in Pune, attendance is very low

By Naukari Adda Team


Even after the lockdown, students in grades five to eight had to wait for school to begin. However, after about eleven months, the fifth to eighth schools in Pune district finally started on Wednesday. On the first day itself, about 50 per cent of the schools in the Pune district were full and the children started chirping again. Happiness was flowing on the faces of the students as the school started. Parents who have dropped out of school have not forgotten to inspect the facilities in the schools.
There are a total of 3 thousand 754 schools in Pune city and district with 7 lakh 15 thousand 831 students. There are 1,794 schools in thirteen talukas of rural Pune. There are 55 thousand 9 students from 796 schools of Zilla Parishad. There are 2 lakh 92 thousand 992 students in 998 private schools. The Zilla Parishad Education Department received information about twelve talukas except Daund taluka. Accordingly, out of a total of 1,670 schools, 1,105 schools started on Wednesday. Out of the total 2 lakh 29 thousand 265 students, 56 thousand on the first day

450 students attended school for the first time after the lockdown. Although 50 per cent schools have been started, the attendance of students is only 25 per cent, said the education department officials.

 

 

 


Source: M.T.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021