MBBS आणि MD च्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

By Naukari Adda Team


MBBS आणि MD च्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती, MBBS & MD

MBBS आणि MD च्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एमबीबीएस (MBBS) आणि एमडीच्या (MD) इतर वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

 

मुंबई, 26 एप्रिल : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन लावण्यात आलं आहे. वाढती रुग्णसंख्या आणि राज्यातील गंभीर परिस्थिती पाहता अनेक परीक्षांच्या तारखा पुढे ढकल्यात आल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून एमबीबीएस (MBBS) आणि एमडीच्या (MD) इतर वर्षाच्या परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीची परीक्षा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावं यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय झाला अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. तसंच दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

CBSC बोर्डाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, तर दहावीची परीक्षा रद्द केली आहे. 12वीच्या परीक्षा कधी घ्यायच्या यासंदर्भातील निर्णय 1 जून नंतर घेण्यात येणार आहे.

देशातील बहुतेक बोर्डांनी आपल्या परीक्षा रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. केवळ CBSC, ICSE नाही तर देशभरातील एकूण सात राज्यातील शिक्षण मंडळांनी आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra), मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MBBS & MD

By Naukari Adda Team


MBBS and MD exams in the first week of June; Information of Medical Education Minister

 

MBBS and MD's other year examinations will be held from the first week of June, Medical Education Minister Amit Deshmukh has said.

 

Mumbai, April 26: Lockdown has been imposed in the state due to increasing prevalence of corona. In view of the increasing number of patients and the critical situation in the state, many examination dates have been postponed. MBBS and MD's other year examinations will be held from the first week of June, Medical Education Minister Amit Deshmukh has said. Meanwhile, Class 10 board exams have been canceled due to the growing number of corona patients. The 12th standard examination is likely to be held by the end of May. Rajesh Tope had informed that the Cabinet had unanimously decided to cancel the 10th board examination and promote the students. Also, there will be an internal assessment of the students of the 10th standard board and in this regard, detailed information will be released after discussing with the experts in the field of education, said the school education minister Varsha Gaikwad. The CBSC board has postponed the Class XII exams, while the Class X exams have been canceled. A decision on when to take the 12th exam will be taken after June 1. Most boards in the country have canceled or postponed their exams. Not only CBSC, ICSE but a total of seven state education boards across the country have postponed their exams. These include Maharashtra, Madhya Pradesh, Chhattisgarh, Punjab, Tamil Nadu, Himachal Pradesh and Rajasthan.

volume_up

content_copy

 

share

star_border


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda