महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार स्मार्ट कार्ड; 'हे' होतील फायदे

By Naukari Adda Team


महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार स्मार्ट कार्ड;

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणार स्मार्ट कार्ड; 'हे' होतील फायदे

 

अमरावती: परदेशात अथवा राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संपर्कात राहून कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व त्यांचा वेळही वाया जातो. विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 'स्मार्ट कार्ड' देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 'विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी देश-विदेशात जाताना दस्तऐवजाचं मोठ ओझं सोबत घेऊन फिरावं लागतं. सतत महाविद्यालयाच्या संपर्कात राहावे लागतं. त्यामुळं अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्याचा विचार सुरू आहे,' असं सामंत यांनी सांगितलं.
 

'स्मार्ट कार्ड'मध्ये विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीपासून ते सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षापर्यंतची सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे असणार आहेत. त्याशिवाय, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, विविध परीक्षा, ब्लॉगचे विषय, विद्यार्थी कल्याणाच्या योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी सरकारी पातळीवर विचारविनिमय व नियोजन करण्यात येत असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


College students will get smart cards; There will be benefits

By Naukari Adda Team


College students will get smart cards; There will be benefits

Amravati: In order to participate in various competitions abroad or at the national level, students have to stay in touch with the college and complete the paperwork. As a result, students face many difficulties and their time is wasted. The state's higher and technical education department has taken an important decision to overcome this problem of students. He made the announcement while addressing the graduation ceremony of Sant Gadge Baba Amravati University as the chief guest. 'Students have to carry a heavy load of documents with them when they go abroad for academic work. You have to stay in touch with the college constantly. This leads to many problems. To overcome these problems, we are thinking of giving smart cards to students, 'said Samant. The 'smart card' will contain all the documents and certificates of the students from class X to the current academic year. In addition, students will get information about scholarships, various exams, blog topics, student welfare schemes at a click. Higher Education Minister Uday Samant informed that discussions and planning are being done at the government level for this.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda