MSBTE च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

By Naukari Adda Team


MSBTE च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल, Changes in the schedule of practical and written examinations of MSBTE

MSBTE च्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

 

 नाशिक-  सध्याची करोनाची स्थिती पाहता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) दुसरी घटक चाचणी आणि उन्हाळी परीक्षेंतर्गत घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या कालावधीत बदल केला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबरपासून सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. सम सत्रांचा शैक्षणिक कालावधीही बदलण्यात आला आहे.

'एमएसबीटीई'ने इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनजमेंट, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा २२ जून ते ३ जुलैदरम्यान, तर ऑनलाइन लेखी परीक्षा १३ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. संबंधित परिक्षांचा निकाल ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यात लागणार असून, विद्यार्थ्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणासंदर्भातील माहिती वेगळ्या परिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे. तंत्रशिक्षण मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांचे नवीन शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. हे बदल सर्व विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून द्यावेत, तसेच संस्था स्तरावरील परीक्षेचे आयोजन करताना वेळापत्रकातील कालावधी तंतोतंत पाळावा. असा आदेश 'एमएसबीटीई'चे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी महाविद्यालयांना दिला आहे.

याचसोबत एमएसबीटीई अंतर्गत येणाऱ्या विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या द्वितीय सत्रातील चौथ्या, सहाव्या आणि आठव्या सेमिस्टरचा कालावधी हा २५ मार्च ते १९ जून ठरविण्यात आला आहे. द्वितीय सत्रातील दुसऱ्या सेमिस्टरचा कालावधी ३० मार्च ते १९ जून असेल, तर वार्षिक पॅटर्नचा कालावधी १७ ऑगस्ट २०२० ते १९ जून २०२१ असा निश्चित करण्यात आला आहे. या सत्रातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा १४ ते १६ जूनदरम्यान घेण्यात येणार आहे. याच कालावधीत फार्मसीच्या विद्यार्थ्यांची तिसरी वर्ग चाचणीदेखील घेण्यात येणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Changes in the schedule of practical and written examinations of MSBTE

By Naukari Adda Team


Changes in the schedule of practical and written examinations of MSBTE

 

Nashik: In view of the current situation in Corona, the Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) has changed the duration of practical and written examinations to be conducted under the second component test and summer examination. It has been announced that the new academic year will start from September one. The academic duration of even sessions has also been changed. MSBTE has changed the schedule of summer examinations for Engineering, Pharmacy, Hotel Management, Surface Coating Technology courses, according to which the practical examination will be held from June 22 to July 3, while the online written examination will be held from July 13 to August 3. The results of the examinations will be released in the fourth week of August and the information regarding the industrial training of the students will be released through a separate circular. It has also been announced that the new academic year of various courses implemented by the Board of Technical Education will start from September 1. These changes should be brought to the notice of all students, and the schedule should be strictly observed while conducting examinations at the institution level. This order was issued by the Secretary of MSBTE, Dr. Mahendra Chitlange has given to colleges. In addition, the period of 4th, 6th and 8th semesters of the second session of various technical education courses under MSBTE has been fixed from 25th March to 19th June. The second semester of the second semester will run from March 30 to June 19, while the annual pattern will run from August 17, 2020 to June 19, 2021. The online examination of the students of this session will be held from 14th to 16th June. The third class test of pharmacy students will also be conducted during the same period.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda