राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंतची २६८३ पदे रिक्त

By Naukari Adda Team


राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंतची २६८३ पदे रिक्त, 2683 posts vacant from Medical Officer to Director in the State

राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंतची २६८३ पदे रिक्त

 

 बीड : राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालक अशी ९ हजार ३७९ पदे आहेत. पैकी तब्बल २ हजार ६८३ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही पदे भरण्यासह पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याऐवजी शासन ठरावीक लोकांच्या हितासाठी निवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविण्यात ‘इंटरेस्ट’ दाखवित आहे.

 राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंत तब्बल ८ वेगवेगळी पदे आहेत. यात  आरोग्य संचालकांसह अतिरिक्त संचालक, सहायक संचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. यात सर्वच पदांच्या जागा रिक्त असल्याचे दिसत आहे.

मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाने पात्र असतानाही अधिकाऱ्यांना पदोन्नती दिलेली नाही. त्यातच सोमवारी एका आदेशाने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील केवळ ३० अधिकाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना दिलेली आहे; परंतु निवड मंडळ व पदोन्नतीने भरावयाच्या आणखी ६० जागा रिक्त आहेत. मंडळाने केवळ अर्ज मागविले आहेत; परंतु त्यावर निर्णय घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अशी आहेत रिक्त पदे..

  • आरोग्य संचालक २ पैकी १ रिक्त
  • अतिरिक्त संचालक ३ पैकी २
  • सहायक संचालक ११ पैकी ७
  • उपसंचालक २३ पैकी ११
  • जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग २८१ पैकी १४८
  • जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग ६४३ पैकी ३९६
  • विशेष तज्ज्ञ ६२७ पैकी ४७९
  • वैद्यकीय अधिकारी गट अ ७७८९ पैकी १६३९

एकूण ९३७९ पैकी २६८३ रिक्त


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


2683 posts vacant from Medical Officer to Director in the State

By Naukari Adda Team


2683 posts vacant from Medical Officer to Director in the State

Beed: There are 9,379 posts from medical officer to director in the state. Out of which 2 thousand 683 posts are vacant. Instead of filling these posts and giving promotions to eligible officers, the government is showing interest in raising the retirement age to 62 for the benefit of certain people. There are 8 different posts in the state from medical officer to director. These include the Director of Health, Additional Director, Assistant Director, Deputy Director, District Health Officer, District Surgeon, Specialist, Medical Officer. It seems that all the posts are vacant. For the past several years, the health department has not promoted officers even though they are eligible. In addition, an order has been issued on Monday to promote only 30 officers of the district health officer cadre; But there are 60 more vacancies to be filled by selection board and promotion. The board has only invited applications; But decisions on it are being ignored. These are the vacancies. Health Director 1 out of 2 vacancies 2 out of 3 additional directors 7 out of 11 Assistant Directors 11 out of 23 Deputy Directors 148 out of 281 District Health Officers District Surgeon Cadre 396 out of 643 Specialists 479 out of 627 1639 out of 7789 Medical Officers Group A. Out of total 9379, 2683 are vacant


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda