CBSE Board 12th Exams: कोणत्या आधारे लागणार 12वीचा रिझल्ट, वाचा डिटेल्स

By Naukari Adda Team


CBSE Board 12th Exams: कोणत्या आधारे लागणार 12वीचा रिझल्ट, वाचा डिटेल्स, CBSE Board 12th Exams

CBSE Board 12th Exams: कोणत्या आधारे लागणार 12वीचा रिझल्ट, वाचा डिटेल्स

नवी दिल्ली, 2 जून : सीबीएसईच्या 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा (CBSE board 12th Exams) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पालकांना ही चिंता आहे की प्रिलीम परीक्षा, वर्गातील वर्तन, इंटर्नल असेसमेंट यापैकी कशाच्या आधारे आता 12 वीचा निकाल लागणार आहे. जर प्रिलिममधील गुणांच्या (Prelim exam) आधारे निकाल लागला, तर विद्यार्थ्यांना कमी टक्के, गुण मिळतील. कारण विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी आणखी कसून अभ्यास करावा म्हणून शाळेतील शिक्षक प्रिलिमचे पेपर कडक तपासतात. पण कुठलातरी एकच निकष गृहित धरून विद्यार्थ्यांचे गुण ठरवले जाणार नसून ते ठरवताना 3 ते 4 वेगवेगळे निकष (Parameters) लक्षात घेतले जातील असं शिक्षणतज्ज्ञांचं मत आहे.

एल्कॉन ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक आणि शिक्षणतज्ज्ञ (Educationalist) अशोक पांडेय म्हणाले, ‘सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दलची संदिग्धता कमी झाल्यामुळे मुलं आणि पालकांवरील ताण कमी होईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरवर (Career) मोठा परिणाम होईल अशा अफवा पसरायला नकोत. जरी परीक्षा रद्द झाली असली तरीही विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे याबद्दल निर्णय घेण्यासाठी सीबीएसईला थोडा वेळ द्यायला हवा जेणेकरून ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य निर्णय घेऊ शकतील.’

आता अशी शक्यता व्यक्त होत आहे, की 3 ते 4 पॅरॅमीटर्सवर हा निकाल लावला जाईल. कुठल्याही एका पॅरॅमीटरचं वेटेज एकूण निकालाच्या 10 ते 15 टक्के असू शकतं. या प्रिलिमचे मार्क गृहित धरले जाऊ शकतात. शाळेत बोर्डाच्या नावाने केलेल्या असाइनमेंट (Assignment) किंवा प्रोजेक्ट (Project) तसंच प्रॅक्टिकलला (Practical exam) मिळालेले मार्कही एक पॅरॅमीटर असू शकतो.

त्याचबरोबर विद्यार्थ्याने मागच्या तीन वर्षांत मिळवलेल्या गुणांच्या आधारेही त्यांचे मार्क ठरवले जाऊ शकतात. एखादी शॉर्ट असेसमेंट टेस्टही घेतली जाऊ शकते अर्थात ऑनलाइनच (online). अशाप्रकारे तीन ते चार असेसमेंटचा विचार करून विद्यार्थ्यांचा निकाल लावला जाऊ शकतो. विद्या बाल भवनचे संचालक डॉ. सतवीर शर्मा म्हणाले, ‘प्रिलिममधील गुणांचा समावेश निकालाच्या निकषांमध्ये केला जाणारच आहे. तसंच इंटर्नल असेसमेंटच्या आधारे पण रिझल्ट तयार केला जाऊ शकतो.’

महाराष्ट्रात मात्र राज्य बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षांबदद्ल अद्याप निर्णय झालेला नाही. तो एक-दोन दिवसांत होईल अशी आशा आहे. सीबीएसईच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 12 वीची परीक्षा रद्द केली जावी अशी पालकांची मागणी आहे. सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


CBSE Board 12th Exams

By Naukari Adda Team


CBSE Board 12th Exams: On what basis will the result of 12th be, read the details

New Delhi, June 2: It has been decided to cancel the CBSE board 12th Exams. After that, the parents are worried about the basis of the prelim exam, class behavior, internal assessment. If the result is based on the prelim exam, then the students will get less percentage. This is because the school teachers strictly check the prelim papers so that the students can study more thoroughly for the board exams. However, education experts are of the opinion that the marks of the students will not be decided on the basis of a single criterion but 3 to 4 different parameters will be taken into consideration while deciding it. Ashok Pandey, Director and Educationalist, Alcon Group of Schools, said, "The government's decision is welcome. Reducing ambiguity about students' futures will reduce stress on children and parents. Rumors that this decision will have a big impact on students' careers should not be spread. Even if the exam is canceled, the CBSE should be given some time to decide how to give marks to the students so that they can make the right decision on the advice of experts. ' It is now possible that the result will be based on 3 to 4 parameters. The weightage of any one parameter can be 10 to 15 percent of the total result. The marks of this prelim can be assumed. Assignment or project done in the name of the board in the school as well as the mark obtained in the practical exam can also be a parameter. Also, their marks can be determined based on the marks obtained by the student in the last three years. A short assessment test can also be taken, of course, online. In this way students can be judged by considering three to four assessments. The director of Vidya Bal Bhavan, Dr. Satveer Sharma said, "The marks in the prelim will be included in the results. Also, the result can be prepared on the basis of internal assessment. ' In Maharashtra, however, no decision has been taken yet regarding the 12th examination of the State Board. Hope it happens in a day or two. Parents are demanding cancellation of 12th standard examination in Maharashtra on the lines of CBSE. Everyone is watching what the government decides.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda