MPSC SEBC खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ

By Naukari Adda Team


MPSC SEBC खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ,  MPSC Exam 2021

MPSC SEBC खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ

 

MPSC SEBC खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ-एसईबीसी’च्या ज्या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गाकरिता अर्ज केला, मात्र विहित वयोमर्यादा ओलांडली, त्या विद्यार्थ्यांकरिता एक दिलासादायक बातमी आहे. अशा विद्यार्थ्यांच्या जाहिरातीतील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना देय असलेल्या वयोमर्यादा व परीक्षा शुल्काबाबतची सवलत कायम ठेवावी व त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य सरकारने एमपीएससी आयोगाला दिल्या.

नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे मराठा समाजातील काही उमेदवार आरक्षणामुळे पात्र ठरले असतील तरी मुलाखतीनंतरच पुढील प्रक्रिया पार पडेल.

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेताच एमपीएससीलाही भरतीप्रक्रियेसंदर्भात गुरुवारी सूचना पाठविल्या आहेत. यानुसार आता एमपीएससीच्या रखडलेल्या पूर्व व मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी ‘एसईबीसी’ वर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गातून लाभ घेता येईल.

एमपीएससीला पत्र पाठवून ‘एसईबीसी’ वर्गाकरिता राखीव असलेली पदे खुल्या व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) रूपांतरित करून निकाल, मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षांचे निकाल सुधारित केल्यानंतर केवळ नव्याने पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्याच मुलाखती, परीक्षा व शारीरिक चाचणी घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. ज्या उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रलंबित आहे, त्यांच्यासाठी सुधारित निकालानुसार ती घेण्यात यावी, अशा सूचनाही सरकारने एमपीएससीला केल्या आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MPSC Exam 2021

By Naukari Adda Team


Benefit of 10 per cent reservation for MPSC SEBC open category candidates 10 per cent reservation benefit for MPSC SEBC open category candidates - This is good news for SEBC candidates who have applied for the open category but have exceeded the prescribed age limit. The state government has directed the MPSC Commission to maintain the age limit and examination fee waiver payable to the backward classes as per the provisions in the advertisement of such students and take further action accordingly. Newly qualified candidates are advised to be interviewed. As a result, some candidates from the Maratha community may be eligible due to reservation, but the next process will be completed only after the interview. As soon as the state government decided to give the benefit of 10 per cent reservation to the economically weaker sections in education and government jobs to the Maratha community, instructions were also sent to the MPSC regarding the recruitment process on Thursday. According to this, now the candidates selected from the ‘SEBC’ category for the stalled pre and main examinations and interviews of the MPSC will be able to avail the benefits from the open and EWS category. The state government has instructed the MPSC to convert the posts reserved for SEBC category into open and economically backward category (EWS) and conduct interviews, examinations and physical tests only for the newly qualified candidates after revising the results, interviews and physical test results. The government has also instructed the MPSC to conduct the physical test for the candidates who are pending, as per the revised results.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda