राज्यातील ५ लाख युवकांना अप्रेंटीसशीपची संधी

By Naukari Adda Team


 राज्यातील ५ लाख युवकांना अप्रेंटीसशीपची संधी, Apprenticeship opportunity

खुशखबर! राज्यातील ५ लाख युवकांना अप्रेंटीसशीपची संधी

 

Apprentice scheme: करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (Maharashtra Apprenticeship Promotion Scheme – MAPS) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत चालू वर्षात राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यामध्ये १ लाख युवकांना अप्रेंटीसशीपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन मिळेल,, अशी माहितीही त्यांनी दिली.

या योजनेसंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना उपयोगी पडतील अशा ७१५ व्यवसायांना ही योजना लागू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

मलिक म्हणाले की, करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम करुन प्रत्येक हाताला काम देणे हे शासनाचे ध्येय आहे. राज्यातील किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी व अनुभव उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहित करुन पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राप्त होतील.
 उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याबरोबरच राज्यातील युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मधील तरतुदीनुसार पारंपरिक व नवीन उद्योगक्षेत्रांमध्ये उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल. मुलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस (Basic Training Provider) प्रति प्रक्षिणार्थी प्रशिक्षण खर्च प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. तसेच ज्या मुलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस केंद्र शासनाकडून प्रशिक्षण प्रतिपूर्ती मिळणार नाही अशा संस्थांना प्रशिक्षण खर्च रक्कम प्रतिपूर्ती देखील प्रति प्रशिक्षणार्थी मिळेल.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Apprenticeship opportunity

By Naukari Adda Team


Good news! Apprenticeship opportunity to 5 lakh youth in the state

Apprentice scheme: It has been decided to implement Maharashtra Apprenticeship Promotion Scheme (MAPS) with the objective of providing employment and training to the youth of the state to reduce the rising unemployment created against the backdrop of Corona. Under this, apprenticeship opportunities will be provided to 1 lakh youth in various industries and establishments in the state in the current year. The objective is to provide employment and training to 5 lakh well-educated unemployed youth in the next five years, said Skills Development, Employment and Entrepreneurship Minister Nawab Malik. Under this scheme, the trainee candidates will get 75 per cent of the scholarship payable or a maximum of Rs 5,000 less, he said. A government decision regarding this scheme has been issued recently. He said that the scheme has been implemented for 715 businesses which will benefit the factories in the industrial sector. Malik said the outbreak of the corona virus has led to a sharp rise in unemployment at present. In such a situation, the aim of the government is to provide employment to the youth of the state. New Maharashtra Apprentice Promotion Scheme is being implemented to provide employment and self-employment opportunities and experience to the youth who have passed at least 10th standard in the state. Under this scheme, 5 lakh well-educated unemployed youth will be trained in five years by encouraging establishments for recruitment of apprentice candidates. They will also get employment and self-employment opportunities. The need of the hour is to create skilled manpower required by the industry as well as to train the youth of the state and make them employable. In Government, Semi-Government and Private Establishments, as per the provisions of the Apprenticeship Act, 1961, training will be imparted to the candidates in traditional and new industries for a specified period. Reimbursement of training costs per trainee will be admissible to the Basic Training Provider. Also, the training institutes which do not get basic training reimbursement from the central government will also get reimbursement of training expenses per trainee.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda