तरुणांनो, तयार राहा! 'ही' आयटी कंपनी यंदा तब्बल एक लाख भारतीयांना देणार नोकरी

By Naukari Adda Team


तरुणांनो, तयार राहा!

तरुणांनो, तयार राहा! 'ही' आयटी कंपनी यंदा तब्बल एक लाख भारतीयांना देणार नोकरी

 

नवी दिल्ली, 29 जुलै : कोरोनामुळे (Corona) देशभरात लॉकडाउन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले. या स्थितीचा एकूणच अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. परिणामी अनेकांना आपला रोजगार किंवा नोकऱ्या (Latest Jobs) गमवाव्या लागल्या आहेत. त्यातच नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले अनेक युवक रोजगार किंवा नोकरीच्या शोधात आहेत. अशा बेरोजगार युवकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कॉग्निझंट ही अमेरिकन आयटी कंपनी (IT Company Cognizant) यंदा भारतातल्या एक लाख जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.

कॉग्निझंट कंपनीच्या या नियोजनाचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'नं दिलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जूनपर्यंतच्या तिमाही अखेरीपर्यंत या कंपनीने जगभरातल्या 3 लाखांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. कंपनीचे सीईओ ब्रायन हम्फरिज यांनी सांगितलं, की 2021च्या अखेरपर्यंत कंपनी सुमारे 1,00,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखत आहे. याशिवाय सुमारे 1,00,000 असोसिएट्सना कंपनीकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कॉग्निझंट 2021 मध्ये नव्या पदवीधरांना (Fresh Graduates) नोकरी देण्याचा विचार करत आहे. तसंच 2022मध्ये नव्या 45,000 पदवीधरांना जॉब ऑफर देण्यासाठी योजना आखत आहे. 

कंपनीला कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरच्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचं कंपनीच्या व्यवस्थापनाला वाटत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात या पदांसाठी नव्या उमेदवारांची गरज आहे. याबाबत ब्रायन हम्फरिज यांनी सांगितलं, की कंपनीने काही महिन्यांपूर्वी पॉलिसी शिफ्टची (Policy Shift) घोषणा केली आहे. कंपनी आता क्वार्टरली प्रमोशन सायकलचा स्रोत उपलब्ध करून देणार असून, त्याशिवाय जॉब रोटेशन आणि रि-स्किलिंग इनिशिएटिव्हवरही विचार करीत आहे. 2019 पासून कंपनीने विलीनीकरणासाठी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खर्च केला आहे.

कॉग्निझंट कंपनीने आतापर्यंत भारतातल्या 2 लाख जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सीईओ ब्रायन हम्फरिज यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना मदत मिळावी यासाठी आणि आधुनिक व्यवसायासाठी कंपनी भागीदारीच्या माध्यमातून वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत उद्दिष्ट ठेवलेल्या गुंतवणुकीद्वारे आपलं पाऊल अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कंपनीचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर जेन सिग्मंड यांनी सांगितलं, की ग्राहकांच्या मोठ्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने पदभरती (Recruitment) क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, कंपनीला यापुढे मनुष्यबळात गुंतवणूक करायची आहे.

जून महिन्यापर्यंतच्या तिमाहीत कंपनीला 41.8 टक्के नफा झाला आहे. यामुळे कंपनीची एकूण कमाई 512 दशलक्ष डॉलर म्हणजेच 3,801 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यंदा किमान एक लाख लोकांना नोकरी देऊ, अशी आशा कंपनीला आहे. जून 2020मध्ये कंपनीची कमाई 361 दशलक्ष डॉलर होती. त्यामुळे 2021 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 10.2 टक्क्यांवरून 11.2 टक्क्यांवर पोहोचला होता. ही असमान्य कामगिरी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीचा महसूल 14.6 टक्क्यांनी वाढून 4.6 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. एक वर्षापूर्वी हा आकडा 4 अब्ज डॉलर होता, असं कॉग्निझंट कंपनीकडून सांगण्यात आलं.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


IT Company Cognizant

By Naukari Adda Team


Young people, get ready!

This IT company will provide jobs to over one lakh Indians this year New Delhi, July 29: Corona has imposed lockdowns across the country. This situation has adversely affected the economy as a whole. As a result, many have lost their jobs or Latest Jobs. In addition, many young people who have just completed their education are looking for employment. This news is important for such unemployed youth. Cognizant, an American IT company, is planning to provide job opportunities to one lakh people in India this year. The news of this planning of Cognizant Company has been given by 'TV Nine Hindi'. By the end of the June quarter, the company employed more than 3 million people worldwide, according to the company. Brian Humphries, the company's CEO, said the company plans to employ about 100,000 people by the end of 2021. In addition, about 100,000 associates will be trained by the company. Cognizant plans to hire fresh graduates in 2021. It also plans to offer job offers to 45,000 new graduates in 2022. The management of the company feels that the company needs junior and middle level manpower. New candidates are needed for these posts not only in India but all over the world. Brian Humphries said that the company has announced a policy shift a few months ago. The company will now provide the source of the quarterly promotion cycle, as well as consider job rotation and re-skilling initiatives. Since 2019, the company has spent more than 2 2 billion on mergers. Cognizant has so far provided employment to 2 lakh people in India. The company has performed well in the second quarter, according to CEO Brian Humphries. The company strives to strengthen its foothold by targeting investments in a rapidly growing market through partnerships to help more customers and modern business. Jane Sigmund, chief financial officer of the company, said that the company has decided to increase its recruitment capacity to meet the growing demand of the customers and the company no longer wants to invest in manpower. The company had posted a 41.8 per cent profit for the June quarter. As a result, the company's total revenue reached 12 512 million, or Rs 3,801 crore. The company hopes to employ at least one lakh people this year. The company had revenue of 1 361 million in June 2020. As a result, the company's revenue rose to 11.2 per cent in 2021 from 10.2 per cent. The company says this is an unusual performance. The company's revenue rose 14.6 per cent to 4.6 billion. The figure was हा 4 billion a year ago, according to Cognizant.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda