केंद्राचा निर्णय! UPSC शिवाय प्रशासकीय अधिकारी व्हा

By Naukari Adda Team

केंद्राचा निर्णय! UPSC शिवाय प्रशासकीय अधिकारी व्हा, government mulls lateral entry in top bureaucracy application asked for joint secretary post of 10 departments

आता यूपीएससीशिवाय अधिकारी बना

नवी दिल्ली: 

सरकार दरबारी प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी यूपीएससीची परीक्षा देण्याची आता काहीच गरज नाही. खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आता सरकारी सेवेत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करता येणार आहे. यूपीएससी शिवाय प्रशासकीय अधिकारी होण्याबाबतची बहुप्रतिक्षित 'लॅट्रल एन्ट्री' अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या खाजगी कंपनीतील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

रविवारीच ही अधिसूचना आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगसाठीची मार्गदर्शक तत्वेही जारी करण्यात आली आहेत. त्यानंतर सरकार आता सेवा नियमातही बदल करणारा आहे. या अधिसूचनेनुसार खासगी क्षेत्रातील वरिष्ठांची केंद्रातील विविध खात्यात संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ३ वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांनी चांगली कामगिरी बजावल्यास त्यांच्या नियुक्तीचा कालावधी वाढवून ५ वर्षापर्यंत केला जाणार आहे. या पदावर संबंधित अधिकाऱ्यांना किती वर्षापर्यंत ठेवायचे याची मर्यादा निश्चित केलेली नाही. पण नियुक्तीचं वय किमान ४० वर्ष ठेवण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच पगार आणि भत्ते देणार असून केंद्राच्या संयुक्त सचिवांना मिळतो तेवढाच पगार त्यांना देण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवांना जे नियम लागू आहेत, तेच नियम या बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना लागू राहणार आहेत. कॅबिनेट सचिवांची समिती या अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन त्यांची केंद्र सरकारात नियुक्ती करणार आहे. या पदासाठी पदवीधर असणे आणि कोणत्याही कंपनीत १५ वर्षाचा कामाचा अनुभव असण्याची अट ठेवण्यात आली आहे. सरकारने इच्छुकांकडून ३० जुलैपर्यंत अर्ज मागवले आहेत.

आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

government mulls lateral entry in top bureaucracy application asked for joint secretary post of 10 departments

By Naukari Adda Team

आता यूपीएससीशिवाय अधिकारी बना

नवी दिल्ली: 

सरकार दरबारी प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी यूपीएससीची परीक्षा देण्याची आता काहीच गरज नाही. खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आता सरकारी सेवेत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करता येणार आहे. यूपीएससी शिवाय प्रशासकीय अधिकारी होण्याबाबतची बहुप्रतिक्षित 'लॅट्रल एन्ट्री' अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या खाजगी कंपनीतील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

रविवारीच ही अधिसूचना आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगसाठीची मार्गदर्शक तत्वेही जारी करण्यात आली आहेत. त्यानंतर सरकार आता सेवा नियमातही बदल करणारा आहे. या अधिसूचनेनुसार खासगी क्षेत्रातील वरिष्ठांची केंद्रातील विविध खात्यात संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. ३ वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती केली जाणार असून त्यांनी चांगली कामगिरी बजावल्यास त्यांच्या नियुक्तीचा कालावधी वाढवून ५ वर्षापर्यंत केला जाणार आहे. या पदावर संबंधित अधिकाऱ्यांना किती वर्षापर्यंत ठेवायचे याची मर्यादा निश्चित केलेली नाही. पण नियुक्तीचं वय किमान ४० वर्ष ठेवण्यात आलं आहे. या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच पगार आणि भत्ते देणार असून केंद्राच्या संयुक्त सचिवांना मिळतो तेवढाच पगार त्यांना देण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या संयुक्त सचिवांना जे नियम लागू आहेत, तेच नियम या बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना लागू राहणार आहेत. कॅबिनेट सचिवांची समिती या अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊन त्यांची केंद्र सरकारात नियुक्ती करणार आहे. या पदासाठी पदवीधर असणे आणि कोणत्याही कंपनीत १५ वर्षाचा कामाचा अनुभव असण्याची अट ठेवण्यात आली आहे. सरकारने इच्छुकांकडून ३० जुलैपर्यंत अर्ज मागवले आहेत.

Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.

नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda