सरकारची खास योजना, देतात मोफत ट्रेनिंग आणि 8 हजार रुपये

By Naukari Adda Team


Government special plan, free training and 8 thousand rupees

Skill Development Plan - तरुणांमधली हुशारी पारखून त्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण देणं, हा उद्देश आहे.

 

 

मुंबई, 22 जून : भारत सरकारनं तरुणांना पुढे जाण्यासाठी खास योजना तयार केलीय. तरुणांमधली हुशारी पारखून त्यांना व्यवसायाचं प्रशिक्षण देणं, हा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत मिळू शकते. या ट्रेनिंगची फी सरकार स्वत: भरतं. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. देशाची प्रगती तरुणांवर अवलंबून असते. त्यासाठीच आहे पंतप्रधान कौशल्य विकास योजना. याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याबद्दलच जाणून घेऊ या.

या योजनेचा मुख्य उद्देश्य

ज्या लोकांचं शिक्षण कमी झालंय त्यांना रोजगार मिळावा म्हणून सरकार हे ट्रेनिंग देतंय. या योजनेत सरकारकडून तरुणांना 8 हजार रुपये दिले जातात. कोर्स पूर्ण झाला की सरकार एक सर्टिफिकेट देतं. ते अख्ख्या देशात वापरता येतं.

या योजनेअंतर्गत तीन महिने, सहा महिने आणि वर्षाच्या अंतरावर रजिस्ट्रेशन करावं लागतं. यात दिलं जाणारं प्रशिक्षण सेक्टर स्किल काउन्सिल आयोजित करते. त्यानंतर उमेदवार उत्तीर्ण झाले की सरकारी प्रमाणपत्र आणि स्किल कार्ड दिलं जातं. त्यामुळे त्यांना नोकरी मिळणं सोपं जातं.

 

या योजनेसाठी कसा करायचा अर्ज?

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेसाठी अर्जदाराला आपलं नाव नोंदवावं लागतं.

आपलं नाव, पत्ता आणि ईमेल यांची माहिती भरावी लागते. त्यानंतर अर्जदाराला ज्या एरियात ट्रेनिंग घ्यायचं असेल त्याची निवड करावी लागेल.

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध कोर्स

या योजनेत कंस्ट्रक्शन, इलेक्ट्राॅनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसोसिंग, फर्निचर, फिटिंग, हँडिक्राफ्ट, जेम्स, ज्वेलरी आणि लेदर टेक्नाॅलाॅजी असे एकूण 40 कोर्सेस आहेत. यात तरुणांना प्रशिक्षित  करून व्यवसाय सुरू करण्यालायक बनवलं जातं.

या कोर्ससाठी लागणारी कागदपत्रं

यात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड, दोन पासपोर्ट साइज फोटोज् आणि कुटुंबातल्या एका सदस्याचं आधारकार्ड लागतं.

 

Like our Facebook page for jobs updates

Article in English

Government special plan, free training and 8 thousand rupees

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

Government special plan, free training and 8 thousand rupees

Skill Development Plan - It is aimed at training young people through their skills in business.


Mumbai, June 22: The Indian government has devised a special plan to go ahead with the youth. The goal is to train the youngsters in the youth and train them professionally. Therefore, they can get help to get employment. The government automatically fills up this training fee. The number of young people in India is high. The country's progress depends on the youth. That's why the Prime Minister's skill development plan Very few people know about it. Let's learn about it.

The main purpose of this scheme

The government has given training to people who have lost their education. In this scheme 8 thousand rupees are given to the youth by the government. Once the course is completed, the government gives a certificate. They can be used in the whole country.

Under this scheme, registration has to be done for three months, six months and years. The Training Sector Skills Council will be organized by this. After that the candidate passes that government certificate and skill card is given. So they find it easier to get a job.

How to apply for this scheme?

The applicant has to register his name for the Prime Minister's Skill Development Plan.

You need to fill in your name, address and email details. Then the area where the applicant wants to take training is to be selected.

Various courses under the Prime Minister's Skill Development Plan

There are a total of 40 courses in construction, electronics, and hardware, food processing, furniture, fittings, handicrafts, gems, jewelery and leather technology. In this, young people are trained and trained to start a business.

Documents required for this course

To get access, you need Aadhar card, two passport size photographs and Aadhar card for one of the family members.

Like our Facebook page for jobs updates