फुल-हार विकणाऱ्याची मुलगी एमपीएससीत राज्यात तिसरी

By Naukari Adda Team

Mpsc success story

अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य सेवा परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. 20) लागला. या परीक्षेत अकोल्यातील वैशाली विलास सांगळे हिने राज्यात तिसरी येण्याचा बहुमान मिळविला आहे. अकोल्यातील उमरी परिसरात राहणारे विलास सांगळे हे घरोघरी जाऊन हार-फुलाची विक्री करतात. त्यांची मुलगी गुणवंतांच्या यादीत आल्याने उमरी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव यांनी जाहीर केलेल्या निकालात वैशालीने राज्यात तिसरी येण्याचा मान मिळवला असला, तरी वैशालीला या निवडीची अपेक्षा नसून ती वर्ग एक अधिकारी पदाच्या अपेक्षेत आहे. अल्पभूधारक असलेल्या विलास सांगळे यांची दुसरी कन्या नेहा ही देखील संगणकीय अभियांत्रिकीमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. उमरी परिसरातील सावित्रीबाई फुले या शाळेतील वैशालीने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. वैशालीला तिच्या यशात आई-वडिलांसह तिचे काका आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एमपीएससीच्या यशस्वी गुणवंत उमेदवारांची यादी गुरुवारी (ता.20) जाहीर झाली. या उमेदवारांना वर्ग दोनच्या निरीक्षक प्रमाणित शाळा संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अधीक्षक सांख्यिकी अधिकारी या पदावर सरळ सेवा भरती होणार आहे.

संदर्भ-सकाळ .

Like our Facebook page for jobs updates

Article in English

Mpsc success story

By Naukari Adda Team

See this ad in english इथे क्लिक करा

Mpsc success story

अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य सेवा परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. 20) लागला. या परीक्षेत अकोल्यातील वैशाली विलास सांगळे हिने राज्यात तिसरी येण्याचा बहुमान मिळविला आहे. अकोल्यातील उमरी परिसरात राहणारे विलास सांगळे हे घरोघरी जाऊन हार-फुलाची विक्री करतात. त्यांची मुलगी गुणवंतांच्या यादीत आल्याने उमरी परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव यांनी जाहीर केलेल्या निकालात वैशालीने राज्यात तिसरी येण्याचा मान मिळवला असला, तरी वैशालीला या निवडीची अपेक्षा नसून ती वर्ग एक अधिकारी पदाच्या अपेक्षेत आहे. अल्पभूधारक असलेल्या विलास सांगळे यांची दुसरी कन्या नेहा ही देखील संगणकीय अभियांत्रिकीमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. उमरी परिसरातील सावित्रीबाई फुले या शाळेतील वैशालीने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. वैशालीला तिच्या यशात आई-वडिलांसह तिचे काका आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एमपीएससीच्या यशस्वी गुणवंत उमेदवारांची यादी गुरुवारी (ता.20) जाहीर झाली. या उमेदवारांना वर्ग दोनच्या निरीक्षक प्रमाणित शाळा संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, अधीक्षक सांख्यिकी अधिकारी या पदावर सरळ सेवा भरती होणार आहे

संदर्भ-सकाळ .

Like our Facebook page for jobs updates