370 हटवल्यानं असे होणार बदल झेंडा, हक्क, अधिकार, कायदे,भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू.. जम्मू काश्मीरमध्ये या अकरा गोष्टी बदलणार

By Naukari Adda Team


370 हटवल्यानं असे होणार बदल झेंडा, हक्क, अधिकार, कायदे,भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू.. जम्मू काश्मीरमध्ये या अकरा गोष्टी बदलणार, 370 scrapped will change the flag, rights, rights, laws, new cricketers in India. These eleven things will change in Jammu and Kashmir.

370 हटवल्यानं असे होणार बदल
झेंडा, हक्क, अधिकार, कायदे,भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू.. जम्मू काश्मीरमध्ये या अकरा गोष्टी बदलणार

स्पर्धा परीक्षाच्या दुर्ष्टीकोनातून हे आर्टिकल फार  महत्वाचे आहे. आज ३७० आणि ५ अ रद केलेल्या मुळे काय झालेनवीन कोणते बदल होणार आहेत याची संपूर्ण माहिती

गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमधील 370 कलम हटवण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 मध्ये बदल करण्याची शिफारस केली असून 35 ए रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आता कलम 370 रद्द झाल्यास काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा राहणार नाही. या निर्णयाने जम्मू काश्मीरपासून लडाख वेगळं होईल. तसेच काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्र शासित प्रदेश अस्तित्वात येतील.

आतापर्यंत भारताच्या संविधानाअंतर्गत जम्मू काश्मीरचं स्वतंत्र संविधान आहे. केंद्र सरकार आणि काश्मीरचे राजे हरिसिंग यांच्यात 26 ऑक्टोंबर 1947 मधअये विलीनीकरणाचा करार झाला होता. यानुसार जम्मू काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा आणि विशेष अधिकार मिळाले होते.

१)जम्मू काश्मीरचे वेगळे संविधान राहणार नाही

कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा अंतर्गत देण्यात आलेले वेगळे संविधान रद्द होऊन तिथे भारतीय संविधान लागू होईल.

२)नागरिकत्व
स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नसल्यानं दुहेरी नागरिकत्वाचा विषय संपुष्टात येईल. 
कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना राज्याचे आणि भारताचे अशी दोन नागरिकत्व बहाल करण्यात आली होती. त्यामुळे कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरी लोकांकडे केवळ भारताचे नागरिकत्व असेल.

३)मालमत्तेचा हक्क
अन्य राज्यातील नागरिकांना आता जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करता येईल, गुंतवणूक करता येईल.
कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमध्ये फक्त स्थानिकांना मालमत्ता, जमीन खरेदी विक्रीचा अधिकार होता. 

४)वेगळा झेंडा
जम्मू-काश्मीरला या पुढे वेगळा झेंडा असणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये या पुढे केवळ भारताचा तिरंगाच फडकवला जाईल.

५)मूलभूत अधिकार
कलम ३७० मुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांना देशातील इतर नागरिंकाना मिळणारे अधिकार मिळत नव्हते. जम्मू काश्मीरमधील नागरिकांना काही अधिकारांपासून वंचित रहावे लागत होते. केवळ मालमत्तेसंदर्भात आणि राज्यातील अधिकार त्यांना होते. मात्र कलम ३७० रद्द झाल्यास त्यांना इतर भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व अधिकार मिळतील.

६)वेगळे कायदे
कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकत्व, मालमत्तेचा हक्क आणि मूलभूत अधिकारांसंदर्भात भारतीय कायद्यांऐवजी वेगळे कायदे अस्तित्वात होते. कलम ३७० रद्द झाल्यानंतर हे कायदे आणि नियम संपुष्टात येऊन तेथे भारतीय कायदा लागू होईल.

७)केंद्राचे नियंत्रण
राज्यावर आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा अधिकार मिळेल.
कलम ३७० मुळे केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा हक्क नव्हता. मात्र आता हा कलम रद्द झाल्यास केंद्र जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणी आणि इतर निर्णय बाकी राज्यांप्रमाणेच घेऊ शकते.

८)भौगोलिक बदल
जम्मू-काश्मीरचे विभाजन होऊन जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार होणार. जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या राज्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल.

९)लडाख
आतापर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा हिस्सा असणारा लडाखचा प्रदेश हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती.

१०)केंद्राचे कायदे
कलम ३७० मुळे केंद्राला सतत जम्मू-काश्मीर सरकारच्या परवाणग्या घ्याव्या लागत असे. सुरक्षा, परराष्ट्र संदर्भातील निर्णय, आर्थिक आणि संपर्क क्षेत्राशील नियम वगळता इतर कोणत्याही कारणासाठी केंद्राला राज्य सराकराची परवाणगी घ्यावी लागायची. मात्र आता ३७० रद्द झाल्यानंतर संसद या प्रदेशामध्ये कोणताही कायदा लागू करु शकते. यामध्ये अगदी प्रदेशाच्या सीमा ठरवण्यापासून ते नामांतरणापर्यंत सर्वच गोष्टींचा समावेश होतो.

11)  आता भारताला मिळतील नवीन क्रिकेटपटू
या निर्णयामुळे आता भारताला नवीन क्रिकेटपटू मिळू शकतील, असे म्हटले जाऊ लागले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे आता लडाख हा केंद्रशासित प्रदेश झाला आहे. त्यामुळे आता लडाख क्रिकेट संघटना आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर त्यांचा संघही आता रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळू शकतो. सध्याच्या घडीला रणजी स्पर्धेत 37 संघ खेळत आहे. पण यापुढे 38वा संघ रणजी स्पर्धेत दिसतला तर नवल वाटायला नको.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


370 scrapped will change the flag, rights, rights, laws, new cricketers in India. These eleven things will change in Jammu and Kashmir.

By Naukari Adda Team


370 scrapped will change this
Flag, rights, rights, laws, new cricketers will get India .. Eleven things will change in Jammu and Kashmir

For the past several years, the question of deleting 370 sections in Kashmir is going to get in the way. In Parliament, Home Minister Amit Shah has proposed a change in section 370 and proposed repealing 35A. Now if section 370 is repealed, Kashmir will no longer have the status of a special state. With this decision, Ladakh will be different from Jammu and Kashmir. Also, two Union Territories - Kashmir and Ladakh - will come into existence.

So far under the Indian constitution, Jammu and Kashmir has a separate constitution. A merger agreement was signed between the Central Government and Raja Harisingh of Kashmir on 26 October 1947. Accordingly, Jammu and Kashmir had the status and privileges of the autonomous state.

1) Jammu and Kashmir will not have a separate constitution

After the repeal of Article 370, the separate Constitution given under special status to the State of Jammu and Kashmir will be repealed and the Indian Constitution will apply there.

2) Citizenship
The absence of autonomous state status would end the issue of dual citizenship.
According to Article 370, citizens of Jammu and Kashmir were granted two such citizenship of state and India. Therefore, after the clause is abolished, the Kashmiri people will have Indian citizenship only.

3) Property rights
Citizens of other states can now buy property, invest in Jammu and Kashmir.
According to Article 370, only the locals in Jammu and Kashmir had the right to buy property, land and sell it.

4) Different flag
Jammu and Kashmir will have no other flag. Only the tricolor of India will be flown further in Jammu and Kashmir.

5) Fundamental Rights
Due to Article 370, the citizens of Jammu and Kashmir did not get the rights of other citizens of the country. The citizens of Jammu and Kashmir have been denied certain rights. They own the rights only to property and to the state. However, if Section 370 is repealed, they will have the same rights as any other Indian citizen.

6) Different laws
According to Article 370, separate laws exist in Jammu and Kashmir instead of Indian laws regarding citizenship, property rights and fundamental rights. After the repeal of Article 370, these laws and rules will be terminated and the Indian law will apply there.

7) Control of the center
The state will have the right to impose a financial emergency.
The Central Government was not entitled to declare a financial emergency in Jammu and Kashmir because of Article 370. But if this clause is canceled, the Center can take financial emergency and other decisions in Jammu and Kashmir just like the rest of the states.

8) Geographical changes
Jammu and Kashmir will be divided and Jammu and Kashmir and Ladakh will be formed. Jammu and Kashmir will have a cabinet but this state will have the status of a Union Territory.

9) Ladakh
Until now, Ladakh, which is part of Ladakh Jammu and Kashmir, will be a non-union territory. There has long been a demand for the people of Ladakh to be given the status of a Union Territory.

10) Laws of the Center
Due to Article 370, the Center had to constantly obtain permits from the Government of Jammu and Kashmir. The Center had to obtain a State Government License for any reason other than security, foreign-related decisions, financial and communication sectors. However, after the cancellation of the law, Parliament can enforce any law in the region. It covers everything from the border delineation to the transition.

11) India will get new cricketers now
With this decision, it is said that India will get new cricketers now.
With the government's decision, Ladakh has now become a union territory. So now you can see Ladakh Cricket Association. At the same time, his team can now play in Ranji Cricket. At present, 37 teams are playing in Ranji Trophy. But if the 38th team appears in the Ranji Trophy, don't be surprised.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda