वयाच्या 25 व्या वर्षी आस्तिक कुमार पाण्डेय झाले आयएएस 

By Naukari Adda Team


वयाच्या 25 व्या वर्षी आस्तिक कुमार पाण्डेय झाले आयएएस , At the age of 25, the believer Kumar Pandey became IAS

वयाच्या 25 व्या वर्षी आस्तिक कुमार पाण्डेय झाले आयएएस 

बीडचे जिल्हाधीकारी आस्तिक कुमार पांण्डेय यांची उत्त्ंग भरारी

 

 

 

शाळेत असतांना एका कलेक्टर साहेबांचे भाषण ऐकले, त्यांचा रूबाब अन मागे पुढे धावणारी यंत्रणा पाहीली आणि बस...आपनही कलेक्टरच व्हायचे असे स्वप्न पाहीले.. तासनतास वाचनाची आवड, आई-वडिलांनी दिलेले संस्कार, घरातील शैक्षणिक वातावरण अशा परिस्थितीत आपल्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतांना त्या तरूणाच्या वाट्याला अनेकवेळा मोठा संघर्षही आला. तर अनेक परिक्षेत अपयश आल्यामुळे दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची, डोळ्यात फक्त आयएएस होण्याचे स्वप्न होते. जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश हे त्या तरूणाला माहीत होते. बारावीला असतांनाच सात वर्षात आपल्याला आयएएस कसे होता येईल याची कोणाच्याही मार्गदर्शना शिवाय प्लॅनिंग केली.दिवसाची रात्र अन रात्रीचा दिवस करूण खुप अभ्यास केला स्वताहाला इतके झोकुन दिले की पाच वर्ष कोणत्या नातेवाईकाच्या कार्यक्रमाला का कोणाच्या मयतीला सुद्धा जाता आले नाही.ऐवढा अभ्यास करूनही दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परिक्षा देवुन पदरी अपयशच आले. मात्र आलेल्या अपयशाने खचुन न जाता बस मनगटात स्वप्न जिवंत करण्याची, पंखात बळ निर्माण करण्याची लाथ मारीन तिथ पाणी काढण्याची जिद्द ठेवली. 16 ते 18 तास पुन्हा जोमाने अभ्यास केला .जिद्द आणि प्रचंड मेहनतीवर 2010 युपीएससी परिक्षेत देशातुन 74 वा रँक तर मुलाखतीत देशातुन तीसरा क्रमांक मिळवुन आयएएस होवुन असामान्य यशाला गवसणी घालुन आपल्या कर्तृत्वाची मुद्रा ज्यांनी उमटवली ते आहेत बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधीकारी आस्तिक कुमार पांण्डेय. वयाच्या पंचवीसाच्या वर्षी युपीएससी परीक्षेचा गड सर करूण जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करणारे आस्तिक कुमार पांण्डेय यांची यशोगाथा जितकी रोमहर्षक आहे तीतकीच संघर्षमय आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाईला आदर्श आणि प्रेरणा देणारी आहे.बीडचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत असतांना उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळत आह

.                      उत्तरप्रदेश अवध क्षेत्रमधील गोंडा जिल्हा येथील अस्तिक कुमार पांण्डेय हे मुळचे रहीवाशी . मात्र त्यांचा परिवार हा उत्तरप्रदेश मध्ये लखनऊ येथे वास्तव्यास आहे. वडिल ऱ्हदयराज पांण्डेय हे पोलिसात फौजदार या पदावर नौकरीला आहेत. आस्तिक कुमार यांना दोन बहीणी असुन त्या सद्या शिक्षीका आहेत. एक लहान भाऊ त्यांचे एमबीए पर्यंत शिक्षण झाले असुन ते सद्या चांगल्या पदावर नौकरीला आहेत. आई कल्पणा या गृहीणी आहेत. फौजदार झाल्यानंतर त्यांच्या वडीलांची बाराबनकी जिल्ह्यात पहीली पोस्टींग होती तेथेच आस्तिक कुमार यांचा जन्म झाला. त्यानंतर 1987 मध्यधे वडीलांची बदली ही सुलतान पुरमध्ये झाली. 1987 ते 1991 पर्यंत आई-वडिलां सोबत सुलतान पुरमध्ये आस्तिक कुमार यांचे लहानपण गेले. ज्या ठिकाणी वडिलांची बदली होईल तेथे पोलीस कॉलनीमध्ये राहायला जायचे कधी या जिल्ह्यात तर कधी त्या जिल्ह्यात असा प्रवास सुरू झाला. सुलतानपुरमध्ये असतांना पोलीस कॉलनीमधील कमला विद्यामंदीर पब्लीक स्कुल येथे त्यांचे प्राथमीक शिक्षण झाले. प्राथमीक शिक्षण घेत असतांना अस्तिक कुमार अभ्यासात अतीशय हुशार, आणि शांत स्वाभावाचे व चाणाक्ष बुद्धीचे होते. आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि घरातील शैक्षणीक वातावरणात त्यांची जडण- घडण झाली. 1991 मध्ये वडिलांची बदली नेपाळ सीमेवर असेल्या बेहराईच जिल्ह्यातील भीनगा येथे असलेल्या कोतवाल पोलिस तहसील येथे झाली. मागासलेला भाग होता. 1992 ते 1997 पर्यंत भीनगा पोलिस कॉर्टर येथील उच्च प्राथमीक विद्यालय भीनगा येथे 6 वी ते 8 पर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर येथेच असलेल्या हुकुमसिंग इंटर कॉलेज मध्ये नऊवी व दहाविचे शिक्षण झाले. दहावीला चांगले गुण मिळाल्या नंतर आयोध्या मधील फैजाबाद येथील गव्हरमेंट इंटर कॉलेज मध्ये 11 वी 12 वी साठी प्रवेश घेतला व कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहुन शिक्षण पुर्ण केले. बारावी नंतर आता पुढे काय करायचे असा प्रश्न पडला. मीत्र इंजीनिअरींगची तयारी करत होते आणि वडिलांचीही इच्छा होती की आपल्या मुलाने इंजीनिअर व्हावे. त्यासाठी त्यांनी इंजिनिअर होण्याचे ठरविले. 2001 पासुन इंजिनिअरिंगचे क्लासेस सुरू केले. जुन ते डिसेंबर पर्यंत क्लासेल केले. मात्र अभ्यासक्रम अवघड आहे आपल्याला झेपत नाही म्हणून त्यांनी इंजिनिअरींग न करता बीए करण्याचे ठरविले. कारण त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा दे वुन आयएएस व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी प्लानींग केली होती. की आपल्याला सात वर्षात आयएएस व्हायचे आहे. अलहाबाद विश्ववीद्यालय इन्व्हरसिटी मध्ये बीए साठी प्रवेश घेवुन हिंदी व इतीहास विषयात 2004 मध्ये प्रथम श्रेणीत बीए उत्तीर्ण झाले. त्यानंतर मध्यकालीन विषयात पोस्ट ग्रॅजवीशन पुर्ण केले. यामध्ये त्यांना विद्यापीठातुन गोल्ड मेडल मिळाले. डिसेंबर 2006 मध्ये जीआरएफ, युजीसी, नेटची परीक्षा दिली. जीला राष्ट्रीय पात्रता परिक्षा म्हणतात. त्यानंतर 2007 मध्ये इतीहास विषयात पीएचडी केली. त्यानंतर अलाहाबाद विश्वविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून नौकरी लागली. त्यानंतर दिल्ली विश्व विद्यालयात प्राध्यापक म्हणून नौकरी केली. 2007 ते 2010 पर्यंत तीन ठिकाणी नौकरी केली. याच काळात आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा द्यावी असा त्यांनी विचार केला व त्या दृष्ठीने अभ्यासाची तयारी सुरू केली. दोन वेळा त्यांच्या पदरी निराशा आली. दुसऱ्या प्रयत्नात यावेळी मात्र त्यांना11 व्या नंबरवर वेटींगवर ठेवन्यात आले. त्यांची 2010 मध्ये अशीस्टन्ट कमान्डन्ट ऑफ पुलीस म्हणून सशस्त्र सिमा बल येथे निवड झाली आणि प्रशिक्षणासाठी ते निघुन गेले. आता आपण परीक्षा द्यायची नाही जे यश मिळाले त्यावर समाधान मानुन पूढे प्रवास करू असे ठरवीले. याच वेळी आस्तिक कुमसार यांचा जिलग मित्र अनुप दुवेदी यांचा फोन आला तुझ्याकडे अजुन बावीस दिवस आहेत परत परिक्षा दे मात्र त्यांनी याला नकार दिला. त्यानंतर मित्राच्या आग्रहका खातीर 22 दिवस अभ्यास करूण पुन्हा परीक्षा दिली प्रचंड मेहनत व सलग बौद्धीक कौशल्याच्या बळावर ते तीसऱ्या प्रयत्नात आयएएसची परिक्षा उत्तीर्ण झाले. देशात 74 वा रँक मिळवुन मुलाखतीत त्यांनी देशातुन तीसरा क्रमांक मिळवीला. ऑगस्ट 2011 मध्ये आयएएस मध्ये आल्यानंततर 2012 पर्यंत उत्तराखंड येथील मसुरी येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून तीन महीने काम केले. त्यानंतर तीन महीने नाशिक येथे ट्रेनींग घेतली. त्यानंतर परत मसुरी मध्ये जावुन फेसटु मध्ये प्रशिक्षण घेतले. यामध्ये परदेशात जावुन अभ्यास दौरा केला. त्यानंतर ऑगस्ट 2013 मध्ये कळवण जि. नाशीक येथे अदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून दीड वर्ष काम केले. त्यानंतर 2015 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव येथे दोन वर्ष काम केले. 25 एप्रिल 2017 मध्ये अकोला येथे प्रथम जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.अकाला येथे असतांना त्यांनी आपल ्या कामाच्या माध्यमातुन एक वेगळा ठसा उमटवला. त्यानंतर बीड येथे फेब्रुवारी 2019 पासुन जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

 

अशी केली युपीएससीची तयारी

मुळातच अस्तिक कुमार पांण्डेय यांना वाचनाची प्रचंड आवड आहे.आपल्याला आयएएस व्हायचे हे त्यांनी शाळेत असतांनाच ठरवीले होते. स्वप्न त्यांनी शाळेत असतांना पाहीले. 12 वी पासुनच त्यांनी आपल्या करिअरची प्लॅनिंग केली होती. आयएएस पदापर्यंत प्रवास कसा करायचा याचे योग्य नियोजन केले होते.आणि आयएएस झालो नाही तर काय याचेही त्यांनी नियोजन केले होते. शालेय व महाविद्यालयीन जिवनात विविध प्रकारचे साहित्य वाचले. सुमारे तीनशे ते चारशे पानांचे पॉकेट बुक्स कादंबरी ते केवळ एका दिवसात वाचुन काढायचे. त्यांनी रामायण, महाभारत, विष्णुपुराण, तुलसी रामायण अशा धार्मिक ग्रंथाचेही वाचन केले. याच वाचनाच्या छंदाचा त्यांना युपीएससी परिक्षेत प्रचंड फायदा झाला. 24 तासातील सुमारे 14 ते 16 तास ते वाचन करत असत. विशेष म्हणजे त्यांनी चक्क 10 वषापुर्वीची पेपर व पुस्तकांची रद्दी खरेदी करूण त्यांचे पानन पान वाचुन काढले.या रद्दीतील पुस्तकामुळे यापुर्वी आयएएस, आयपीएस झालेल्या अधिकाऱ्यांच्या छापुन आलेल्या मुलारखतींची व त्यांच्या मनोगतांची अनेक पारायणे केली. त्यानंतर दिल्ली येथे क्लासेस लावले. युपीएससी परिक्षेच्या त्यांनी एवढा ध्यास घेतला होता की सुमारे पाच वर्ष ते कोणा नातेवाईकांच्या शुभकार्याला गेले नाहीत किंवा अंत्यविधीसाठीही जावु शकले नाहीत. अभ्यासाच्या या प्रचंड व्यासंगामुळेच आपण या पदापर्यंत पोहचलो असल्याची भावना पांण्डेय व्यक्त करतात.

 

 मीत्राच्या त्या फोनमुळेच मी आज आयएएस आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा विद्यार्थ्यांची कसोटी पणाला लावणारी असते. अनेकजण यश न मिळाल्याने नाईलाजाने या परिक्षेतुन माघार घेत असतात. अस्तिक कुमार हे सुद्धा याला अपवाद नव्हते.दोन वेळेस परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांनी पूढे परि क्षा देण्याचा विषय संपवुन टाकला.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी मध्ये अशीस्टन्ट कमान्डन्ट म्हणून निवड झाल्यामुळे तीकडेच रूजु व्हायचे त्यांनी नक्की केले होते.मात्र यापुर्वी च्या दोन्हीं परिक्षेमध्ये त्यांनी अत्यंत चांगले गुण मि ळवि ले असल्याची बाब त्यांचे मित्र.अपुन देवुदी यांनी हेरली होती. एक दिवस त्यांनी अस्तिक कुमार यांना सहज फोन केला त्यावेळी अस्तिक कुमार यांनी आपण यापुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार नसल्याचे त्यांना सांगितले.एवढेच नव्हे तर मी संरक्षण प्रबोधीनी मध्ये रूजु होणार असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी मित्र अनुप दुवेदी यांनी आस्तिक कुमार असेच मध्येच प्रयत्न सोडुन देवु नका, पुढची मुख्य परिक्षा 22 दिवसांवर आलेली आहे, 22 दिवस म्हणजे कमी कालावधी नाही, मनात आले तर तुम्ही ही परिक्षा नक्कीच उत्तीर्ण व्हाल अशी उमेद त्यांच्यात निर्माण केली. मित्राच्या आग्रहाखातर आस्तिक कुमार यांनी 22 दिवस परिश्रम पुर्वक अभ्यास करूण अखेर ही परीक्षा उत्तीर्ण केलीच. जर मीत्र अनुप दुवेदी यांनी आस्तिक कुमार यांना फोनवरूण सल्ला दिला नसता तर ते आयएएस झालेच नसते, हे ते अभीमानाने नमुद करतात. 

 

 अनेकांकडुन मिळाली प्रेरणा

 आस्तिक कुमार पांण्डेय हे लहान पणापासुनच आस्तिक चिारांचे आहेत . त्यांच्यावर गुरूजनांचा मित्रपरिवारांचा मोठा प्रभाव आहे. वडिल पोलिसात फौजदार असल्याने अनेक ठिकाणी बदल्या व्हायच्या. शाळेत असतांना कलेक्टर एसपी यांना वारंवार पाहण्याचा योग आला. घरात शैक्षणीक वातावरण होते. सहावीला असतांना शिक्षण उदयराज मिश्रा यांचे खुप मार्गदर्शन लाभले. एक दिवस शाळेत असतांना 15 ऑगस्ट दिवशी त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत आले होते. त्यांचे भाषण एकले, त्यांचा रूबाब त्यांना मिळणारा मान सन्मान,मागे पुढे धावणारी यंत्रा या गोष्टी त्यांच्या मनात कोरल्या गेल्या आनी आपनही जिल्हाधिकारीच व्हायचे असा त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला. आणि यातुनच त्यांना आयएएस होण्याची प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. 

बीडच्या तरूणाईला आस्तिक कुमारांचा सल्ला

बीडचे लोक खुप चांगले आहेत. केवळ शिक्षणानेच माणसाच्या जिवनात मोठे परिवर्तन घडते. शिक्षण ही एक अशी शिढी आहे की त्याची पायरी चढुन स्वताहाबरोबर समाजालाही त्याचा मोठा फादा होतो. शिक्षणामुळे आजपर्यंत अनेकांच्या जिवनात मोठे परिवर्तन झाल्याचे अनेक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. आजची पिढी ही मोबाईल इंटरनेट यामध्ये आपला वेळ वाया घालवत आहेत. वेळेचे महत्व ओळखा जिवनाचा अमुल्य वेळ वाया घालवु नका स्वताहाचे ध्येय निश्चीत करून त्याला परिश्रमाची जोड देवुन स्वताहाला झोकुन द्या यश नक्कीच मिळेल. विशेष म्हणजे कोणतेच काम कमी समजु नका त्यातुन आपले वेगळेपण सिद्ध करा. (आस्तिक कुमार पांण्डेय, जिल्हाधिकारी बीड )

 

 अशी केली होती प्लॅनींग -

आस्तिक कुमार यांना बारावीत कमी गुण मिळाल्यामुळे इंजिनिअरिंगला जाता आले नाही.त्यांनी स्वताहाचे आत्मपरिक्षण केले.की आपल्याला आयएएस व्हायचे आहे.इंजिनिअर झालो नाही तर आठ वर्ष वाया जातील बीए केले तर सात वर्षात आयएएस होण्याची शक्यता जास्त आहे हे आळखले आणी 2001 पासुन प्लॅनींग केली.तीन वर्षीत बीए होईल दोन वर्षीन एम ए होईल,आणि दोन वर्ष युपीएससीचर अभ्यास करू,आयएएस झालो नाही तर प्राध्यापक तर होवु शकतो अशी प्लॅनीहंग केली आणि ते यशस्वी झाले. 

 

बीडमध्येही उल्लेखनीय कामगिरी 

 जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांण्डेय यांचा एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून उल्लेख केला जातो.बीडचे जिल्हाधिकारी म्हणून कारभार पाहतांना उल्लखनीय कामगिरी आहे. जिल्ह्यातील तिव्र दुष्काळाबाबतची भुमीका योग्य पद्धतीने निभावत आहेत.प्रत्येका ला पिन्याचे पाणी मिळावे यासाठी विशेष प्रयत्न आहेत.जनावरांसाठी छावण्या,पंतप्रधान पीक विमा वाटप, पाण्याचे टँकर,तसेच 900 विहीरींना मंजुरी दिली आहे.त्याचप्रमाणे 33 कोटी वृक्षलागवटीचे टार्गेट असल्याचे त्यांनी सांगितले.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


At the age of 25, the believer Kumar Pandey became IAS

By Naukari Adda Team


At the age of 25, the believer Kumar Pandey became IAS

Beed, District Collector of Beed, Kumar Pandey

While in school, he listened to the speeches of a collector and saw the driving mechanism behind him and dreamed to be a bus collector. He loved to read, his father and his parents, the environment of the home as he walked towards his goal. There was a big struggle for the young man at times. While many tests failed, the rope would be like a broken kite, in the eyes only dream of IAS. The bigger the struggle, the bigger the young man knew. Even when I was in twelfth, I planned seven years without any guidance from anyone. How did I study night and day night and night, so much so that I could not even go to any relatives for five years. The failure of the UPSC examination was unsuccessful. However, without fail, he resolved to bring the dream to life in the bus wrist, force the fan to draw water there. Repeated study for 16 to 18 hours .Regarding hard work and hard work, the 74th rank in the 2010 UPSC Examination and the third highest rank in the country by interviewing the IAS by extraordinary achievement. The success story of the believer Kumar Pandey who fulfilled his dream of becoming the Collector of UPSC examination at the age of twenty-five is just as exciting and inspiring to the young man who is preparing for the struggle and competition examination.

General Chat Chat Lounge Astik Kumar Pandey, a resident of Gonda district in Uttar Pradesh's Awadh area. However, his family is based in Lucknow in Uttar Pradesh. Elder Rhodai Pandey is a police officer. Attik Kumar has two sisters and is a teacher at present. As a younger brother, he got his MBA and is currently in good standing. Mother is a housewife of imagination. After becoming a criminal, his father was the first posting in Barabanki district where the believer Kumar was born. Then in mid-1987, the transfer of the father was made to Sultan Pura. From 1987 to 1991, the parents of Astik Kumar passed away with their parents in Sultanpur. The journey started in this district and sometimes in that district where the father would transfer to the police colony. While in Sultanpur, he got his primary education at Kamala Vidyamandir Public School in the police colony. At the time of elementary education, Astik Kumar was extremely talented in study, and had a calm temperament and clever intellect. The parents' rituals and the educational environment at home were enriched. In 1991, the father was transferred to the Kotwal police tahsil located at Bhienga in Behraich district on the Nepal border. Was the backward part. From 1992 to 1997, he got his education from 6th to 8th at Bhenga, a higher elementary school at Bhienga Police Cort. After that, HukumSing Inter College where I was studying for the 9th and 10th. After completing the tenth grade, he joined Government Inter College at Faizabad in Ayodhya for 11th and 12th and completed his education in a college hostel. After the twelfth there was a question of what to do next. Mitra was preparing for engineering and his father also wanted his son to be an engineer. He decided to become an engineer. Starting engineering classes since 2001. Classified from June to December. But the syllabus is difficult because you do not bother, so they decided to do BA without engineering. Because they wanted to become IAS by examining the Central Public Service Commission. He had planned for this. That you want to be an IAS in seven years. He completed his first BA in Hindi and History in 2004 with admission to BA in Allahabad University University. He then completed a post-graduation in medieval subject. He received a Gold Medal from the University. Examination of GRF, UGC, NET in December 2006. This is called the National Eligibility Test. Then in 2007 he did his PhD in History. After that I got a job as an associate professor at Allahabad University. He then worked as a professor at Delhi University. From 2007 to 2010 he worked in three places. It was during this period that he decided to give the UPSC examination of the Central Public Service Commission and started the study with that view. On two occasions, he had depression. In the second attempt, however, he was placed at number 11 on the waiting list. He was selected as an Assistant Commandant of Police in 2010 at the Armed Boundary Force and left for training. Now that we do not want to take the exam, we have decided that we will go ahead with our satisfaction. At the same time, Anup Dwivedi, a friend of the believer Kumarasar, got the call. You still have twenty-two days to return the exam. He then spent 22 days studying and re-examining for the sake of a friend. On the strength of persistent intellectual and persistent intellectual skills,

 

So did UPSC preparations

Basically, Astik Kumar Pandey has a keen interest in reading. He decided that he wanted to become an IAS while he was in school. He dreamed while he was in school. He had been planning his career since the 12th. He had planned well how to travel to the IAS post. And he had planned what to do if IAS did not. I read a wide variety of literature in school and college life. About three hundred to four hundred pages of pocket book novels read it in just one day. He also read religious texts like Ramayana, Mahabharata, Vishnupuran, Tulsi Ramayana. He had a huge advantage in the UPSC exam. He used to read for about 14 to 16 hours in 24 hours. Specifically, he purchased the paper and book junk from 10 years ago and read it from his home page. He then started classes in Delhi. During the UPSC examination, he had decided that for about five years he could not go to a relative's house or attend a funeral. Pandey expresses the feeling that he has reached this position because of his immense interest in study.

Because of that friend's phone, I am today's IAS.

The Central Public Service Commission Examination tests the students. Many people withdrew from this test due to their lack of success. Astik Kumar was also no exception. After failing the exam in two days, he finished the position. The matter of his being a friend Harel was s. One day when he made a simple call to Astik Kumar, Astik Kumar told him that he would no longer appear for the Central Public Service Commission examination. At this time friend Anup Dwivedi did not give up trying in the same manner as the believer Kumar. According to the advice of a friend, the believer Kumar passed the test after 22 days of diligent study. If Mitra Anup Dwivedi had not advised Aastik Kumar over the phone, he would have just mentioned that he would not have become IAS.

 

 

Inspiration from many

The believer, Kumar Pandey, has been a believer since early childhood. They have a great influence on the family of the Gurus. Since the elder was a policeman, there were many transfers. While in school, it was common to see Collector SP frequently. The house had an educational atmosphere. In the sixth year, Udayraj Mishra received much guidance from education. One day while at school, the district collector came to the school on the 15th of August for the program. His speech alone, his demeanor, the dignity he received, the back-and-forth instruments were engraved in his mind and he determined to be his own collector. And that's what inspired them to become IAS.

The believer's advice to the youth of Beed

The people in Beed are very good. It is through education alone that a great change in a person's life takes place. Education is such a discipline that following its footsteps, along with Swatah, it also benefits the community. We have seen many examples of the many changes in the lives of many due to education. Today's generation is wasting their time on the mobile internet. Recognize the Importance of Time Do not waste precious time in your life, set goals for yourself and push yourself to work hard. What is special is that you do not underestimate any work and prove yourself different. (Aastik Kumar Pandey, Collector Beed)

This was how the planning -

Astik Kumar did not go to engineering due to low marks in Class XII. He did his self-examination. Do you want to become an IAS. BA in the year will be a two year MA, and will study for two years in UPSCure, if not IAS then Prof If a plenihanga that can hovu and they were successful.

Notable performance in the bead too

District Collector Astik Kumar Pandey is referred to as an officer of duty. He said that the role of acute drought in the district is well underway. Special efforts are underway to get drinking water for every person.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda