महाविद्यालये व विद्यापीठामंधील १५६० शिक्षकीय पदांना मान्यता

By Naukari Adda Team


महाविद्यालये व विद्यापीठामंधील १५६० शिक्षकीय पदांना मान्यता

 

मुंबई, दि. ९ ऑगस्ट - उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध महाविद्यालये तसेच विद्यापीठे यांमधील मंजूर पदांपैकी शिक्षकीय रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार १५६० शिक्षकीय पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.

      उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शिक्षकीय रिक्त पदे भरण्यासंदर्भातला प्रस्ताव उपसमितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. उपसमितीच्या शिफारशीनुसार १५६० पदे भरण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी रिक्त पदे भरण्याचा प्रश्नाचा पाठपुरावा वित्तमंत्री आणि सामान्य प्रशासन विभागाकडे केला होता.

      उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार खालीलप्रमाणे रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये १५ अकृषी व अभिमत विद्यापीठांमधील ६५९ पदे, शासकीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९७ पदे, नक्षलग्रस्त ५ महिला महाविद्यालयांमधील २९ पदे, शासकीय अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र (पदवी व पदव्युत्तर) मध्ये ३९८ पदे, अशासकीय अनुदानित अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र (पदवी व पदव्युत्तर) मध्ये १९२ पदे, अशासकीय अनुदानित वास्तुशास्त्रसाठी २५ पदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामधील ६० पदांना मान्यता दिली आहे. 

 

 

Like our Facebook page for jobs updates

Article in English

Recognition of 3 teaching posts in colleges and universities

By Naukari Adda Team


See this ad in english इथे क्लिक करा

(news)

Recognition of 3 teaching posts in colleges and universities

 

Mumbai, The. August 7 - The path to fill the vacant posts of the approved posts of various colleges and universities under Higher and Technical Education departments has been opened. According to the decision taken by the Department of Higher and Technical Education, three teaching posts will be filled soon.

The proposal to fill the teaching vacancies by the Higher and Technical Education Department was submitted at the sub-committee meeting. According to the subcommittee's recommendation, the department has decided to fill 6 posts. Minister of Higher and Technical Education Shri. Vinod Tawde had followed the question of filling vacant posts with the Finance Minister and General Administration Department.

The vacancies will be filled as per the decision taken by the Higher and Technical Education Department. Of these, 19 posts in 4 non-agricultural and renowned universities, 19 posts in Government College of Commerce and Science, 49 posts in Naxal-affected women colleges, 49 posts in Government Engineering and Pharmacology (degree and postgraduate), postgraduate and postgraduate and postgraduate degrees. In 1929 posts, 5 posts for Non-Government Aided Architecture, Dr. Babasaheb Ambedkar University has been approved for three posts.
 

 

Like our Facebook page for jobs updates