लंडनमधील वकीलीची नौकरी सोडुन सामान्यांचे अश्रु पुसण्यासाठी हर्ष पोद्दार झाले आयपीएस

By Naukari Adda Team


लंडनमधील वकीलीची नौकरी सोडुन सामान्यांचे अश्रु पुसण्यासाठी हर्ष पोद्दार झाले आयपीएस, IPS is happy to quit the job of a lawyer in London

लंडनमधील वकीलीची नौकरी सोडुन सामान्यांचे अश्रु पुसण्यासाठी हर्ष पोद्दार झाले आयपीएस

बीडचे नुतन पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा प्रेरणादाई प्रवास

 

आवडीचे क्षेत्र निवडल्यानंतर कठोर परिश्रम अन् शैक्षणिक ज्ञानाच्या बळावर परदेशात जावुन लाखो रूपयांचे पॅकेज मिळवुन ऐषोआरामात जिवन जगणारे अनेकजण पाहावयास मिळतात. देश आणि सर्वसामान्यांसाठी काही करण्याची भावना त्यांच्यात सहसा दिसत नाही. मात्र आयपीएस हर्ष पोद्दार याला अपवाद ठरले आहेत. लंडनमधील जागतीक पातळीवरच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातुन कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले, नामांकीत वकील झाले अन् अंतराष्ट्रीय पातळीवर आपले करीअर घडवीले. एकीकडे लाखो रूपयांचे पॅकेज, सर्व सुखसुविधा हात जोडुन उभ्या असतांना असे मिळालेले करिअर सोडन्याचा कोणी स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही. स्वताचे करीअर घडले यातुन सामान्य माणसांचे अश्रु आपण पुसु शकत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकत नाही अशा विचारांनी अस्वस्थ झालेल्या हर्ष पोद्दार यांनी सेटल झालेले करीअर सोडले आणि देशाची व सामांन्याची सेवा करण्यासाठी भारतीय नागरी सेवेत येण्याचे ठरवीले अन्‌ भारतात येवुन युपीएससी परिक्षेत पहील्याच प्रययत्नात आयपीएस झाले. मुळात त्यांना प्रशासकीय सेवेत जान्याची इच्छा होती मात्र पोलिस सेवा सुद्धा सामान्य माणसाच्या कामी येवु शकते, अनेकदा सामान्य माणुस पोलिस यंत्रणेबाबत अनभीज्ञ असतो .पोलिसां विषयी त्याच्या मनात अनामीक भीती असते. हे चित्र बदलन्यासाठी त्यांनी पोलिस सेवेतच करिअर करण्याचे निश्चीत केले. आपली ही नौकरी नसुन तो सेवाभाव आहे याच वृत्तीने ते काम करत असतात. यावुर्वी त्यांनी विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवीला आहे. बीड येथील त्यांची कारकीर्दही अशीच राहील यात शंका नाही. नव्या पिढीतील उच्च शिक्षण घेणाऱ्या व करिअर करू इच्छीणाऱ्या तरूणाईसाठी हर्ष पोद्दार हे युथ आयकॉन ठरू शकतात. त्यांच्याशी दै.झुंजार नेताने साधललेला हा मुक्त संवाद........

                           कोलकत्ता येथील एका मध्यमवर्गीय कुटूंबात हर्ष पोद्दार यांचा जन्म झाला. वडिल उद्योजक तर आई गृहीणी. कोलकत्ता येथील मार्टिनीयर फॉर बॉईज स्कुल मध्ये येथे त्यांचे शिक्षण झाले. आपल्या मुलाचे उज्वल भवीष्य घडावे असे प्रत्येक आई­-वडिलांचे स्वप्न असते असेच स्वप्न हर्ष पोद्दार यांच्या आई-वडिलांनी देखील पाहीले होते. विशेष म्हणजे हर्ष यांनी ते स्वप्नही पूर्णही करूण दाखवीले. शालेय जिवनापासुनच शिक्षणात अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे असलले हर्ष यांना अभ्यासाबरोबरच भाषणाची व वादवीवाद स्पर्धेची प्रचंड आवड आहे. प्रत्येक स्पर्धेत अवर्जुन सहभागी होवुन पहीला नंबर मिळवीने ही त्यांची विशेषता. बारावी झाल्यानंतर तेव्हा अभियांत्रीकीकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असायचा हे पाहुन हर्ष यांनाही वाटले की, आपनही अभियांत्रीकीला प्रवेश घ्यावा. मात्र त्यांच्या मनामध्ये वेगळाच विचार होता. इतरांचे अनुकरण करूण आपनही त्याच क्षेत्रात करिअर करायचे हे त्यांच्या मनाला पटले नाही. आपल्याला कशात करिअर करायचे हे महत्वाचे असते. त्यामुळे हर्ष यांची विधी क्षेत्रात आवड असल्याने यामध्येच करिअर करण्याचे ठरवीले अन् यातुनच त्यांच्या विजनाला एक वेगळी दिशा मिळाली. कोलकत्ता येथील प्रसिद्ध असलेल्या नॅशनल लॉ स्कुल येथुन कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे कायद्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केला. राष्ट्रीय स्तरावर नॅशनल लॉ स्कुलसाठी स्पर्धा परिक्षा घेतली जाते. प्रचंड अभ्यासाच्या जोरावर हर्ष यांनी या परिक्षेत घवघवीत यश मिळवील्या नंतर जगभरातल्या बारा नामांकीत विद्यापीठातुन कायद्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी बोलावणे आले. यावेळी त्यांनी जगप्रसिद्ध असलेल्या लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाची निवड केली. या शिक्षणासाठी त्यांना ब्रिटीश सरकारच्या वतीने दिली जाणारी ब्रिटिश शिवनींग शिष्यवृत्ती मीळाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातुन अंतराष्ट्रीय व घटनात्मक कायद्याचे पदव्युतर शिक्षणही घेतले. शिक्षणाचा कालावधी संपल्या नंतर लंडन येथीलच असलेल्या प्रसिद्ध क्लीफर्ड चान्स या लॉ फर्ममध्ये कॉर्पोरेट वकीलीची नौकरी करायला सुरवात केली. हर्ष यांचे विधी क्षेत्रात अंतराष्ट्रीय पातळीवरचे करीअर घडले, लाखो रूपयांचे पॅकेजही मिळायचे. सर्व प्रकारच्या सुखसुविधा हात जोडुन उभ्या होत्या मात्र ही नौकरी करत असतांना ते नेहमी अस्वस्थ असायचे. आपल्या कामाच्या माध्यमातुन समाजावर कोणताही प्रभाव पडत नाही, सामान्य माणसांच्या अडचणी दुर करूण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येतम नाही. करिअर तर घडले परंतु आपण मिळविेलेले ज्ञान देशाच्या कामी यावे समाजातील तळागाळातील लोकांची सेवा घडावी, त्यांच्या अडी-आडचणी सोडविन्यात जे समाधा आहे ते समाधान त्यांना या नौकरीत मिळत नव्हते. जिथे देशाची धोरणे ठरली जातात अशा क्षेत्रात काम करावे लागेल म्हणजे लोकांशी आपण जोडले जाऊ असे त्यांना वाटले आणि अखेर हर्ष यांनी भारतीय नागरी सेवेत येण्याचे ठरवीले. अखेर 2010 मध्ये त्यांनी लंडन सोडले व केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या ( युपीएससी) परिक्षेची तयारी सुरू केली. परदेशातील मोठी नौकरी सोडुन परत आल्यानंतर कोणाच्याही आई-वडिलांना नक्कीच न पटणारी ही बाब आहे. मात्र हर्ष यांच्या आईवडिलांनी उलट प्रोत्साहन देण्याचे काम केले. एक वर्ष युपीएससी परिक्षेची तयारी करूण पहील्याच प्रयत्नात ते आयपीएस झाले. पुढे हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोलिस अकादमी येथे प्रशिक्षणा दरम्यान दिव्यांगांसाठी त्यांनी कार्यशाळा घेतली. पहीली नियुक्ती ही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर येथे सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून झाल्यानंर तेव्हा त्यांनी तरूणाईशी संवाद साधणारा महाराष्ट्र पोलिस युथ पार्लमेंट हा प्रकल्प राबवीला. या माध्यमातुन 42 हजार पेक्षा जास्त युवक युवती या अभियानाशी जोडले गेले. त्यानंतर हा प्रकल्प प्रत्येक परिक्षेत्रात राबविन्यात आला. यातुन आयपीस हर्ष पोद्दार हे पोलिस दलात चर्चेत आले. भारतीय पोलिस सेवेत त्यांचे उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यानंतर हर्ष यांनी नाशीक मधील मालेगाव येथे अपर पोलिस अधिक्षक म्हणून काम केले. मालेगावसारख्या अत्यंत संवेदनशील शहरातील त्यांची कामगिरी तर राज्यभर चर्चेचा विषय ठरली. तेथील गुन्हेंगारीला लगाम लावन्याचे कामही त्यांनी केले. तर उडान या सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन मिळाले. पोलिस हा फक्त कायदा व सुव्यवस्था यांच्यापुरता ने ठेवता समाजोपयोगी प्रकल्पातुन पोलिसांना जनते समोर सादर करण्याच मोठे काम ते करत आहेत त्यानंतर नागपुर येथे पोलिस उपायुक्त म्हणून काम केल्यानंतर आता बीड मध्ये ते पोलिस अधिक्षक म्हणून काम करत असतांना त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातुन बीडकरांच्या मनावर एक वेगळी छाप निर्माण करत आहेत.
----------- 
प्रशिक्षणा दरम्यान दिव्यांग मुलांसाठी कार्यशाळा

हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोलिस अकादमी मध्ये प्रशिक्षणाना दरम्यान हर्ष लॉ सोसायटीचे सचिव होते. त्यांच्या प्रशिक्षकांनी द्‌ष्टीदोष असणाऱ्या दिव्यांगाच्या बाबतीत कायद्याचा मसुदा बनवायला सांगितले. हर्ष हे दिव्यांगा मध्ये गेले त्यांच्यासाठी एक कार्यशाळा घेतली. त्यांचे प्रश्न काय आहेत अडचणी काय आहेत हे समजावुन घेतल्या. आणि यातुनच तो बनलेला कायद्याचा मसुदा वरिष्ठ पातळीवर स्वीकारला गेला. 
----------
पहील्याच प्रयत्नात झाले आयपीएस

वकिलीची नौकरी सोडुन भारतीय नागरी सेवेत येण्याचा निर्णय हर्ष यांनी घेतला. एक वेगळे करिअर निर्माण करन्याचे अव्हान त्यांच्यापुढे होते. युपीएससी परिक्षेत सहजासहजी यश मिळत नाही. तीन चार वेळा प्रयत्नानंतर यश मिळते मात्र हर्ष यांनी अभ्यासाचे योग्य .नियोजन यामुळे पहील्याच प्रयत्नात युपीएससी परिक्षेत यश मिळवुन आयपीएस झाले.
----------- 
तरूणांनो देशसेवेसाठी पूढे या

एकविसाव्या शतकातील प्रगतशील अशा भारत देशात आपण जन्मालो हे आपले भाग्यच समजावे लागेल. प्रत्येक क्षेत्रात आज अनेक संधी आहेत त्या ओळखा आणि आपल्या जिवनाचे सोने करा. मात्र आपले करीअर घडल्या नंतर देशाला समाजाला विसरू नका महानगरा पुरता देश मर्यादीत नसुन खऱ्या अर्थाने आपला देश ग्रामीण भागात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामी येवुन देशसेवसाठी पूढे या.(हर्ष पोद्दार,पोलिस अधिक्षक बीड)
-------
यशामध्ये आई-वडिलांचा मोठा वाटा
शिक्षण घेवुन मोठे व्हावे हे आई-वडिलांचे नेहमी स्वप्न होते. शालेय जिवना पासुन ते लंडन पर्यंतच्या प्रवासामध्ये तसा अनेक व्यंक्तीचा माझ्यावर प्रभाव आहे. अनेकांचे मार्गदर्शनही लाभले आहे. जर सांगायचेच झाले तर माझ्या यशामध्ये आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षणात कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासु दिली नाही, किंवा तु हे कर, ते करू नको असा आग्रही कधी धरला नाही. तुला कशामध्ये करीअर करायचे आहे ते कर असे त्यांचे नेहमी सांगणे असायचे. विशेष म्हणजे मी परदेशातील वकीलीची नौकरी सोडुन भारतीय नागरी सेवेत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मला विरोध न करता उलट पाठिंबाच दिला. युपीएससीची मुख्य परिक्षा दोन महीन्यावर आली असतांना वडिलांचे निधन झाले आणि आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळा अशा वेळी माझ्या आईने मला मोठी शक्ती दिली. आज वडिल असते तर आयपीएस झालेल्या आपल्या मुलाच्या अंगावर खाकी वर्दी पाहुन त्यांचा उर अभिमाने नक्कीच भरूण आला असता. मात्र ते आज नाहीत हे माझे दुर्देव आहे असे हर्ष पोद्दार यांनी सांगितले.
---------
महाराष्ट्र युथ पार्लमेंट प्रकल्पातुन हजारो तरूणांशी संवाद

विद्यार्थी आणि युवकापर्यंत आपण पोहचले पाहीजे, दहशदवाद, गुन्हेंगारी यावर त्यांच्याशी संवाद साधला पाहीजे त्यामुळे औरंगाबाद येथे असतांना हर्ष यांनी हा प्रकल्प राबवीला. तत्कालीन पोलिस महासंचालकांनी
औरंगाबाद येथे या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. यावेळी हर्ष यांनी 14 ते 18 वयोगटातील तरूणाईला यामध्ये लक्ष्य केले. शाळा महाविद्यालयांना यामध्ये सहभागी करूण दहशदवाद, गुन्हेंगारी हा विषय देवुन त्यांना बोलते केले आणि यावर मार्ग काय हे त्यांनी सांगावे असे त्यांना सुचविले. शाळा महाविद्यालयातुन विद्यार्थी तरूणांनी यात सहभागी होवुन आपापली मते मांडली. या माध्यमातुन हजारो तरूणांशी संवाद साधला गेला. वरिष्ठांनी या प्रकल्पाची दखल घेवुन औरंगाबा पुरता हा प्रकल्प मर्यादीत न ठेवता नाशिक, कोल्हापुर, नांदेड या परिक्षेत्रात हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविन्यात आला यातुन 42 हजार तरूण बोलते झाले आणि पूढे अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यत हा प्रकल्प पोहचला.
-------
बीडमध्ये या मुद्दयावर करणार काम

शेतीविषयावरील वादाची प्रकरणे
बालगृन्हेंगारी रोखणे
महीलांवरील अत्याचार रोखणे
पोलिस प्रशासनाला शिस्त लावणे
राजकीय गुन्हेंगारीला आळा बसवीणे
गुन्हेंगारीला लगाम लावणे

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


IPS is happy to quit the job of a lawyer in London

By Naukari Adda Team


PS is happy to quit the job of a lawyer in London

Beed's inspiring journey by Newton Police Superintendent Harsh Poddar

 

After choosing the area of ​​interest, many of the people who live in luxury are able to see the benefits of hard work and educational knowledge abroad and get a package of millions of rupees. They often do not feel the need to do anything for the country and the people in general. However, IPS Harsha Poddar has been the exception. After graduating with a law degree from Oxford University in London, became a renowned lawyer and made his career internationally. On the one hand, with the package of millions of rupees, with all the comforts of hands, no one would even dream of giving up such a career. Unhappy that he could not wipe the tears of ordinary people from his own career, he could not put a smile on his face, Harsha Poddar left his settled career and decided to come to India in civil service to serve the country and its people. Originally he wanted to go into administrative service but the police service can also serve the common man, often the common man is unaware of the police system .He has anonymous fears about the police. To change this picture, he decided to pursue a career in the police service. It is not your job but the service that they are doing. He has made his mark in various places. There is no doubt that his career at Beed will remain the same. Harsh Poddar can be a youth icon for a young generation of higher education and career aspirants. This open dialogue with the brave leader ........

Harsh Poddar was born in a middle class family in Kolkata. The father is the entrepreneur and the mother is the housewife. He was educated at the Martineer for Boys' School in Kolkata. Harsh Poddar's parents also dreamed that every parent dreams of having a bright future for their child. In particular, Harsha also fulfilled that dream. Aslee Harsha, who is very intelligent and intelligent in her education from school life, has a keen interest in speech as well as debate and debate. Their specialty is by participating in every competition and getting first number. Harsha also noticed that there was a greater burden of engineering towards the students after the twelfth, that you too should get admission in engineering. But they had a different mind. They did not want to imitate others and pursue a career in the same field. What matters is how you want a career. Thus, Harsha's interest in the field of law, as he decided to pursue a career in it, gave his victory a different direction. I got a law degree from the famous National Law School in Kolkata. Subsequently, he started his pursuit of a Masters in Law. Competition exams are conducted at National level for National Law School. After a huge amount of success, Harsh came to this post to call for a Masters of Law from twelve reputed universities around the world. At this time he chose the world renowned Oxford University in London. He received a British Sewing Scholarship on behalf of the British Government for this education. He also received a Masters in International and Constitutional Law from the University of Oxford. At the end of his education, he started working as a corporate lawyer at a famous London-based law firm, Clifford Chance. Harsh had an international career in the field of law and also received millions of rupees. All kinds of comforts were made by joining hands but when doing this job they were always uncomfortable. There is no effect on the society through our work, the problems of ordinary people cannot be removed and smiles can be seen on their faces. Careers can happen, but the knowledge we gain should serve the people of the country and serve the people at the grassroots level. They are not satisfied with the solutions they have to solve their problems. They have to work in the areas where the policies of the country are decided and they want to be connected with the people and eventually Harsh decided to join the Indian civil service. He finally left London in 2010 and started preparing for the Central Public Service Commission (UPSC) exam. This is certainly not something that anyone's parents would like to see after returning from a big job abroad. But Harsha's parents did the opposite. After one year preparing for the UPSC exam, he became IPS. Later, he conducted workshops for the handicapped while training at the National Police Academy in Hyderabad. When the first appointment was made as Assistant Police Superintendent at Vaijapur in Aurangabad district, he implemented the Maharashtra Police Youth Parliament, a dialogue with the youth. Through this medium, more than 42,000 youths joined the mission. The project was then implemented in every area. From this, IPS Harsh Poddar was discussed in the police force. His Own in the Indian Police Service

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda