बेरोजगारीने हाहा:कार; पण सरकारच्याच ७ लाख जागा रिक्त

By Naukari Adda Team


बेरोजगारीने हाहा:कार; पण सरकारच्याच ७ लाख जागा रिक्त, Unemployment haha: cars; But only 5 lakh seats of government are vacant

बेरोजगारीने हाहा:कार; पण सरकारच्याच ७ लाख जागा रिक्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावीत, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील गुंतवणूक आणि वाढ कॅबिनेट समितीने दिले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार केंद्रात सध्या ७ लाख पदे रिक्त आहेत. एकीकडे देशात बेरोजगारीचा आकडा वाढत आहे, तर दुसरीकडे सरकारी पदेच रिक्त आहेत. त्यामुळे मोदी सरकारने आता तातडीने या जागा भरण्यासाठी पाऊले उचलली आहेत.

कॅबिनेट कमिटीने सर्व मंत्रालये आणि विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जावा, असे निर्देश २३ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या बैठकीनंतर दिले. यानंतर डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग म्हणजेच डीओपीटीने सर्व मंत्रालयांच्या सचिवांना पत्र जारी केलं आहे.

जम्मू-काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही: भारत

कॅबिनेट कमिटीच्या आदेशानुसार जागा भरण्यासाठी आतापर्यंत डीओपीटीने काय पाऊले उचलली याबाबतची माहिती सरकारला प्रत्येक महिन्याच्या पाचव्या दिवशी मिळणार आहे. यानुसार पहिला अहवाल ५ फेब्रुवारी २०२० रोजी मिळण्याची शक्यता आहे. २०१४ पासून कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने कमी झाली आहे, तर पदे मंजूर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. दुसरीकडे या जागाच भरलेल्या नसल्यामुळे तब्बल ७ लाख जागा रिक्त झाल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये सरकारच्या वतीनेच संसदेत याबाबत माहिती देण्यात आली होती.

संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, १ मार्च २०१८ पर्यंत एकूण मंजूर असलेल्या ३८ लाख जागांपैकी ३१.१८ लाख जागा भरलेल्या आहेत. २०१४ नंतर मंजूर पदांची संख्या १.५७ लाखांनी वाढली आहे, जी त्याअगोदर ३६.४५ लाख होती. २०१४ मध्ये एकूण ३२.२३ लाख केंद्रीय कर्मचारी सेवेत होते. २०१८ पर्यंत हा आकडा घसरून ३१.१८ लाखांवर आलाय.

‘भारतच धर्मनिरपेक्ष; पाक, अमेरिका धर्माधिष्ठित’

रेल्वेकडून सर्वात जास्त रोजगार दिले जातात. सरकारी आकडेवारीनुसार रेल्वेत १ मार्च २०१८ पर्यंत अडीच लाख जागा रिक्त होत्या. याशिवाय जवळपास १.९ लाख जागा संरक्षण (नागरी क्षेत्र) विभागात रिक्त आहेत. जवळपास सर्वच मंत्रालयांमध्ये सरकारी पदे रिक्त आहेत.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Unemployment haha: cars; But only 5 lakh seats of government are vacant

By Naukari Adda Team


Unemployment haha: cars; But only 5 lakh seats of government are vacant


New Delhi: The Cabinet Committee on Investment and Growth chaired by Prime Minister Narendra Modi has directed that all vacant posts in the central government be filled up as soon as possible. According to government data, there are currently 5 lakh vacancies in the center. On the one hand the unemployment figures are rising in the country, on the other hand the government positions are empty. Due to this, the Modi government has now taken steps to fill these seats quickly.

The Cabinet Committee directed that a timely program be taken to fill the vacant posts of all the ministries and departments immediately after the meeting on December 9. Subsequently, the Department of Personal and Training ie DoPT has issued a letter to the secretaries of all the ministries.

No need for J&K intermediaries: India

The government will get information on the steps taken by the DOPT so far on the fifth day of each month to fill the seats, as per the order of the Cabinet Committee. Accordingly, the first report is likely to be received on February 7. The number of employees has decreased steadily since the year 2, while the number of employees has been approved. On the other hand, due to the fact that these seats were not filled, about 3 lakh seats have been vacated. It was reported in Parliament in November on behalf of the government.

According to the data submitted to Parliament, as of March 1, 8 lakh seats have been filled out of the total sanctioned total of 5 lakh seats. After that, the number of approved posts has increased by 1.5 lakhs, which was 5.5 lakhs earlier. There were a total of 1.5 lakh central employees in the service. The figure has come down to 8.5 lakhs till 6.

'India is secular; Pak, US fanatic '

Most jobs are provided by rail. According to government data, as of March 1, 2 lakh seats were vacant on the railway. In addition, about 1.5 lakh seats are vacant in the Defense (Urban Areas) section. Government positions are vacant in almost all ministries.
 
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda