कचऱ्यापासून 600 ड्रोनची निर्मिती, भारतीय तरुणाला जगभरातून निमंत्रण

By Naukari Adda Team


कचऱ्यापासून 600 ड्रोनची निर्मिती, भारतीय तरुणाला जगभरातून निमंत्रण, Production of 600 drones from waste, inviting Indian youth from around the world

बंगळुरु : कर्नाटकमधील एनएम प्रतापने ई-कचऱ्याच्या मदतीने तब्बल 600 ड्रोन तयार (NM Pratap create drone by E garbage) केले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच ड्रोन वैज्ञानिक म्हणून त्याला नवी ओळख मिळालेली आहे. त्याच्या कलागुणांमुळे जगभरातील अनेक देशामधून त्याला ड्रोन बनवण्याचे निमंत्रणही (NM Pratap create drone by E garbage) मिळाले आहे.

प्रतापला वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदाच ड्रोनमुळे ओळख मिळाली. त्याने ड्रोन चालवण्यापासून ती खोलून रिपेअरिंग करण्यास सुरुवात केली. 16 वर्षाच्या वयात प्रतापने असे ड्रोन तयार केले जे उडवू शकता येते आणि त्यातून फोटोही काढता येत होते. विशेष म्हणजे हे ड्रोन त्याने कचऱ्यापासून तयार केले होते.

“मी स्वत: हे बनवायला शिकलो”, असं प्रतापने सांगितले. इंडिया टाईम्सच्या रिपोर्टनुसार, प्रतापने एका अशा प्रोजेक्टवर काम केले आहे. ज्यामध्ये सीमा सुरक्षासाठी टेलीग्राफी, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी ड्रोन बनवणे, विना पायलेटचे प्लेन, ऑटो पायलट ड्रोन इतर गोष्टींचा समावेश आहे.

प्रतापने हॅकिंगच्या बचावासाठी क्रिप्टोग्राफीचेही काम केले आहे. कर्नाटकमध्ये पूर आला तेव्हा प्रतापने तयार केलेल्या ड्रोनची तेथील सरकारला मोठी मदत मिळाली होती. प्रतापला आता 87 देशातून निमंत्रण आले आहे. इंटरनॅशनल ड्रोन एक्सपो 2018 प्रतापला अलबर्ट आइंस्टाइन इनोवेशन गोल्ड मेडलने सन्मानितही करण्यात आले आहे.

प्रतापने आयआयटी बॉम्बे आणि आयआयएससीमध्ये लेक्चरही दिले आहे. सध्या तो डीआरडीओच्या एका प्रोजेक्टवर काम करत आहे. प्रताप ड्रोन तयार करताना नेहमी कमीत कमी ई-कचरा निर्माण करतो. तुटलेले जुने ड्रोन, मोटर, कॅपसीटरसह इतर वस्तूंनी तो ड्रोन तयार करतो.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Production of 600 drones from waste, inviting Indian youth from around the world

By Naukari Adda Team


Bengaluru: NM Pratap from Karnataka has created over 600 drones with the help of e-waste. His outstanding performance has earned him praise from all levels. He is also known as a drone scientist. He has also been invited to create a drone from many countries around the world because of his artistry.

Pratap was first introduced at age 14 with a drone. He started repairing the drone by deepening it. At the age of 16, Pratap created a drone that could fly and even take photos. Notably, this drone was created from waste.

"I learned to make it myself," Pratap said. According to the India Times report, Pratap has worked on one such project. These include telegraphy for border security, making drones for traffic management, planes without pilots, auto pilot drone, among other things.

Pratap has also done cryptography to defend hacking. When the floods hit Karnataka, Pratap's drone was a big help to the government. Pratap has now received invitation from 87 countries. International Drone Expo 2018 Pratap has also been honored with the Albert Einstein Innovation Gold Medal.

Pratap also lectured at IIT Bombay and IISc. He is currently working on a project of DRDO. Pratap always produces the least amount of e-waste when creating a drone. It produces drones with broken old drones, motors, capacitors and other objects.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda