फेब्रुवारीपासून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया

By Naukari Adda Team


फेब्रुवारीपासून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया, RTE Admission 2020 Apply Online

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. यावर्षी आरटीई प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आले असून त्यानुसार आता 25 शाळांमधील 25 टक्के जागांसाठी राज्यातून तीन ऐवजी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाणार आहे. तर शाळांमध्ये आरटीईनुसार उपलब्ध जागांऐवढीच प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे.

शिक्षण अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळेमध्ये 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांमुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार यावर्षीही राज्याच्या प्राथमिक शिक्षक संचालकांनी 18 जानेवारी रोजी परिपत्रक काढले असून या परिपत्रकात आरटीई प्रवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आरटीई प्रवेशप्राप्त 2019-2020 च्या ऍटो फॉरवर्ड केलेल्या शाळांची नोंदणीची गटशिक्षणाधिकारी स्तरावरुन पडताळणी केली जाणार आहे. तसेच 11 ते 29 फेब्रुवारी दरम्यान पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. तर 11 ते 12 मार्च दरम्यान राज्यस्तरावर लॉटरी काढण्यात येणार आहे.

लॉटरी काढल्यानंतर 16 मार्च ते 3 मार्च दरम्यान प्रवेश मिळालेल्या पालकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्‍चित करुन घेणे गरजेचे आहे. 13 ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. 24 ते 29 एप्रिल दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी कालावधी दिला आहे. 6 ते 12 मे दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे.

तर 18 ते 22 मे दरम्यान चौथ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत. यावर्षीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही राज्यस्तरावरुन राबवण्यात येणार असून शाळेतील रिक्‍त जागेच्या संख्येनुसारच रिक्‍त जांगाची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे हे यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर कागदपत्र पडताळणीसाठी समिती स्थापन करायची आहे. त्यामुळे, यावर्षीची प्रवेश प्रक्रिया लवकर आणि अपेक्षित वेळेत पार पडण्यासाठी मदत होणार आहे.

कागदपत्रे ऑनलाइन भरावी लागणार
आरटीईमधून प्रवेशासाठी पालकांना प्रवेशासाठी आवश्‍यक ते सर्व कागदपत्र ऑनलाईन भरावी लागणार आहेत. आरटीई प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची माहिती गट शिक्षणाधिकारी दालनाबाहेरील नोटीस बोर्ड वर लावण्यात येणार आहे.

पुणे – बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गतच्या (आरटीई) 25 टक्‍के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा फेब्रुवारीत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार असून प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. यंदा काही नवीन नियमांचीही अंमलबजावणी करावी लागणार आहे.

“आरटीई“ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता मिळविण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पत्र पाठविण्यात आले होते. त्यास शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. प्रवेशाबाबत उपसचिव राजेंद्र पवार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यासाठी प्राथमिक बैठका सुरू झाल्या आहेत. येत्या 16 जानेवारी रोजी “एनआयसी’तील अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असून यात प्रवेशाचे वेळापत्रक, पूर्वतयारी, तांत्रिक अडचणींवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

दरवर्षी प्रवेशासाठी तीन टप्प्यांत लॉटरी काढण्यात येत होती. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया शाळा सुरू झाल्या तरी चालूच राहत होती. मागील वर्षात प्रवेशासाठी चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी पालकांना सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य शाळांमधील प्रवेशाच्या जागा रिक्‍तच पडल्या होत्या. आता मात्र एकादाच लॉटरी काढण्यात येणार आहे. उपलब्ध जागांसाठी लॉटरी काढून त्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ठराविक कालावधीसाठी मुदत देण्यात येणार आहे. जेवढ्या उपलब्ध जागा आहेत तेवढ्या जागांसाठी विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादीही तयार करण्यात येणार आहे. लॉटरीतील प्रवेशाच्या जागा रिक्‍त राहिल्यास प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. येत्या मे अखेरपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही शासनाकडून जारी करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा
पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवावी. त्यामुळे नंतर धावपळ उडणार नाही. प्रवेशासाठी आधी शासनमान्यता प्राप्त शाळांची व उपलब्ध जागांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


RTE Admission 2020 Apply Online

By Naukari Adda Team


The process is set to begin in February 2020 this year for admission to 25% reserved seats under the Children’s Free and Compulsory Education Rights Act (RTE). Lottery will be removed in one phase for entry and a waiting list will also be prepared. This year, some new rules will also have to be implemented. Under RTE, free education is provided to the students of the weaker sections and the underprivileged. The online admissions process is implemented for this. A letter was sent from the Office of the Director of Primary Education seeking approval to implement the admissions process for the academic year 2020-21. It has also been approved by the government. Deputy Secretary Rajendra Pawar has also issued important guidelines on admission.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda