गुड न्यूज : सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा

By Naukari Adda Team


गुड न्यूज : सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा, Good News: Government employees are now five days a week

गुड न्यूज : सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा

 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्यद्री अतिथीगृहावर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी बैठक घेतली होती. अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, डॉ. सोनाली कदम, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

महासंघाच्या वतीने कुलथे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यात केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. ४५ मिनिटे वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करावा, त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितलं होतं.

या प्रस्तावावर बुधवारी (12 फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळानं पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. या निर्णयाची अमलबजावणी महिना अखेरीस म्हणजेच 29 फेब्रवारीपासून करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ महत्त्वाचे निर्णय

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पाच दिवसांचा आठवडा. 29 फेब्रुवारीपासून अमलबजावणी

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता ” “बहुजन कल्याण विभाग” करण्यात आलं.

बाल न्याय निधी गठीत करण्यास मान्यता. त्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली.

राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Good News: Government employees are now five days a week

By Naukari Adda Team


Good News: Government employees are now five days a week


The state government, led by Uddhav Thackeray, has given great good news to state government employees. The Thackeray government has finally approved the demand of government employees for the past several years to do a five-day week. The decision was taken at a meeting of the state cabinet held today. The decision will be implemented from February 29.

A few days ago, Chief Minister Uddhav Thackeray had a meeting at Sahyadri Guesthouse regarding the questions of government officials and employees. Chief Advisor to the Officers Federation Overall, Chairman Vinod Desai, General Secretary Vinayak Lahade, Dr. Senior officials of Sonali Kadam, as well as Urban Development Minister Eknath Shinde, Additional Chief Secretary of the General Administration Sitaram Kunte, Additional Home Secretary Sanjay Kumar, Additional Chief Secretary Manoj Sonic, Finance Secretary Nitin Gadre, Principal Secretary to Chief Minister Vikas Kharge were present. The Chief Minister had suggested that the meeting should be held for five days a week.

On behalf of the Federation, Kulthe had made various demands of the officers and staff. It also demanded that the Center should have five days a week in the state. At that time, Chief Minister Thackeray favored a five-day week. Thackeray had said that a proposal would be taken soon, extending it by 5 minutes, excluding essential services and submitting a proposal that would not have any effect in terms of functioning.

The proposal was discussed at a Cabinet meeting on Wednesday (February 12). The Cabinet then approved the decision to take five days a week. The decision will be implemented by the end of the month ie February 29th.

Cabinet important decisions

Five days a week for government officials and staff. Implementation from February 29th

Other Backward Classes, Social and Educational Backward Classes, Free Tribe Wandering Tribes and Special Backward Classes Welfare Department are now renamed as "Bahujan Welfare Department".

Consent to set up child justice funds. A provision of Rs 2 crore has been made for this.

Decision to organize various cultural events during the Diamond Festival of the State.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda