एमपीएससीची जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करा

By Naukari Adda Team


एमपीएससीची जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करा, Republished The MPSC Advertisement

एमपीएससीची जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सरकारच्या स्तरावरून भटक्या जमाती ‘ड’ प्रवर्गासाठी २ टक्के आरक्षण असूनही पोलिस उपनिरीक्षक पदाच्या एकूण ६५० जागांच्या भरतीत एकही जागा राखीव ठेवलेली नाही. यातील इतर पदांसाठीही भटक्या जमातींसाठी दोन आणि एकच जागा देण्यात आल्याने या प्रवर्गातील परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

या जाहिरातीतील त्रुटी दूर करून नव्याने सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. आमदार नरेंद्र दराडे यांनीदेखील यासंबंधीचे निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना देऊन ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करण्यात मागणी केली आहे. भटक्या जमाती ‘ड’ प्रवर्गासाठी २ टक्के आरक्षण सर्वच भरती प्रकियेत क्षेत्रात दिले जाते. हा नियम लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी लागू असून, यापूर्वी त्यानुसार जाहिराती निघत भरती झालेली आहे. या जाहिरातीत सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याचे ६७ पदे भरावयाची असताना त्यासाठी नियमानुसार भटक्या जमातीच्या प्रवर्गासाठी दोन जागा राखीव ठेवलेल्या आहेत. राज्य कर निरीक्षक पदासाठी एकच जागा आरक्षित आहेत. गृह विभागाच्या अखत्यारित राजपत्रित पोलिस उपनिरीक्षक गट ‘ब’ पदाच्या ६५० पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये भटक्या जमाती प्रवर्गासाठी दोन टक्के जागा राखीव ठेवणे नियमानुसार आवश्यक होते. मात्र, एकही जागा राखीव ठेवली नसल्याने विद्यार्थी नाराजी व्यक्त करीत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आमदार दराडे यांनी ही मागणी लावून धरली असून, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी भेट घेऊन याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारने जातीजमातींसाठी आरक्षण दिले आहे असून पदभरती होणे आवश्यक आहे. सर्व घटकांना नियमाने न्याय मिळायला हवा. पण, ‘ड’ प्रवर्गासाठी एकही जागा नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करून भरती प्रक्रियेसाठी तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. त्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करणार असल्याचे आमदार दराडेंनी म्हटले आहे.

तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?

या जाहिरातीमध्ये अनुसूचित जातीसाठी ८५, जमातीसाठी २४, विमुक्त जाती ‘अ’ साठी २९, भटक्या जमाती ‘ब’ प्रवर्गासाठी ३० तर ‘क’ प्रवर्गासाठी २ आणि इतर मागासवर्गीयांसाठी १४२, विशेष मागास प्रवर्गसाठी तेरा, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयांसाठी ८५ यानुसार मागासवर्गीयांसाठी एकूण ४७५ तर खुल्या प्रवर्गासाठी १७५ अशा जागा राखीव ठेवलेल्या आहेत. शिवाय त्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू आणि अनाथ यांच्यासाठीदेखील आरक्षित जागांची विभागणी जाहिरातीत केली आहे. मात्र, भटक्या जमाती प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही, असा सवाल गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

सौर्स : मटा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Republished The MPSC Advertisement

By Naukari Adda Team


Republished The MPSC Advertisement


This advertisement has just been released by Maharashtra Public Service Commission. In this, there is no reservation in the recruitment of three posts of Deputy Inspector General of Police, despite a 5% reservation for the stray tribe 'D' from the government level. Other students have also expressed their displeasure at the students preparing for the exams in this category as two and one seats have been given for the wandering tribes.

Students are also demanding that the advertisement be corrected and the newly released ad be released. MLA Narendra Darade has also issued a statement to Home Minister Anil Deshmukh, Home Minister Satej Patil and demanded that the advertisement be re-released. For the wandering tribe 'D' category, 5% reservation is provided in all recruitment process areas. This rule is applicable for Public Service Commission exams, as per this the advertisements have been recruited in the past. In this advertisement, two posts have been reserved for the wandering tribe as per the rules for filling the posts of Assistant Cell Officer. Only one reserve is reserved for the post of State Tax Inspector. Advertisement for the post of Gazetted Police Deputy Inspector Group 'B' has been released by the Home Department. In this, it was necessary as a rule to reserve two per cent seats for the wandering tribes. However, students have expressed resentment as no seats were reserved.

Against this backdrop, MLA Darade has kept up the demand, meeting with Home Minister Satej Patil and pointing to this. The government has given reservation to the caste groups and it is necessary to get a post. All elements should get justice by the rule. However, since there is no place for the 'D' class, it is unfair to the students who have been studying for the recruitment process for many years. MLA Darade has said that his hard work will be pursued at the government level to get justice.

What about preparing students?

The advertisements include 2 for SC, 3 for Tribes, 19 for Free Tribes 'A', 2 for 'Wanderer' Category 'B' category, 2 for 'C' category and 3 for other Backward Classes, 13 for Special Backward Class, 3 for Backward Classes for Social and Educational Backward Class. There are 5 such reserved seats for open category. In addition, it is divided into reserved seats for the general public, women, players and orphans. However, the students who have been preparing for the examination for the past several years have been asked the question that no place has been reserved for the stray tribe.

Source: Matta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda