ग्रामसेवक 1395 पदांची भरती २०२०

By Naukari Adda Team


ग्रामसेवक 1395  पदांची भरती २०२०, Gramsevak Bharti 2020

ग्रामसेवकांच्या अभावी गावगाड्याला ब्रेक!

 

नाशिक : ग्रामपंचायतीला सरकारने थेट निधी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक बळ वाढले आहे. या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. पण, जिल्ह्यातील १,३८५ ग्रामपंचातीमध्ये ग्रामसेवकांचे ४२८ पदे रिक्त आहेत. त्यात मंजुरपदांपैकी असेलली संख्या ही १३४ आहे. त्यामुळे काही ठिकाणी ग्रामसेवकाला दोन ग्रामपंचायतीचा पदभार देण्यात आला आहे. या अतिरिक्त भारामुळे गावाचा विकास कसा करणार हाच खरा प्रश्न आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायतीची संख्या वाढली. पण, ग्रामसेवक पदाची संख्या मात्र २००१ च्या पॅटर्न प्रमाणेच आहे. त्यामुळे ही दरी थेट ४२८ पर्यंत वाढली आहे. काही ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत व छोट्या ग्रामपंचायत असल्यामुळे या संख्येत काही घट होवू शकते. तरीही मोठ्या प्रमाणात हे पदे रिक्त राहतात. त्यासाठी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. विस्तार अधिकारी यांचे १४ पदे मंजुर असून, त्याची संख्या पाच आहे. तर ग्रामविकास अधिकारी यांचे ५८ पदे मंजूर असून, १९ रिक्त आहे. तर ग्रामसेवकाचे १,०१९ पदे मंजूर असून, रिक्त पदाची संख्या ११० आहे.

ग्रामपंचायतील थेट केंद्र सरकारकडून १४ व्या वित्त आयोगाकडून २२५ कोटीच्या आसपास निधी दरवर्षी येतो. तर ‘पेसा’मधून राज्य सरकारकडून ५० ते ५५ कोटी रुपये मिळतात. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन मंडळाकडून जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थ क्षेत्र विकास निधी, सर्वसाधारण व आदिवासी विकास निधीतून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. त्याचप्रमाणे खासदार व आमदार निधीचे काम वेगळे असते. या सर्व निधीचा योग्य वापर व्हावा व त्यावर नियंत्रण राहणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामसेवक हा सरकारचा प्रतिनिधी येथे सक्षम असणे गरजेचे आहे. पण, १३८५ ग्रामपंचायत असतांना मंजूर पदे ही १०९१ आहे. त्यामुळे येथेच २९४ पदाचा फरक आहे. त्यात मंजूर पदातही १३४ पदे रिक्त आहेत.

चार वर्ष भरती नाही

नोव्हेंबर २०१५ मध्ये ग्रामसेवकांची भरती झाली. पण, त्यानंतर चार वर्षे ही भरती झाली नाही. त्यात अनुकंपा तत्त्वावर असलेल्या पदातून ७ ग्रामसेवक भेटले. पण, तरी ही संख्या कमीच राहिली. ग्रामसेवकांबरोबरच येथील कर्मचाऱ्यांची संख्याही कमीच आहे. त्याकडेही सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे.

तरी होते शुक्रवारी तपासणी

जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र परदेशी ग्रामसेवकांची संख्या कमी असली तरी त्यातून समन्वय साधत असतात. दर शुक्रवारी त्यांनी ग्रामपंचायती तपासणी उपक्रमही हाती घेतला आहे. आतापर्यंत १,३८५ पैकी ७५० ग्रामपंचायतीची तपासणी त्यांनी केली आहे.

ग्रामपंचायत वाढल्या पण, त्या तुलनेत ग्रामसेवक कमी आहे. तरीही आम्ही कमी संख्येतही सर्व कामे चोखपणे पार पाडत आहोत. दर शुक्रवारी आम्ही ग्रामपंचायतीची तपासणी करतो. आतापर्यंत ७५० ग्रामपंचायतीची तपासणी केली आहे. पदे मंजूर करण्यासाठी आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहोत.

सौर्स : मटा


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Gramsevak Bharti 2020

By Naukari Adda Team


Gramsevak Bharti 2020

Nashik: Gram Panchayat's financial strength has increased due to the government's decision to give direct funding to the Gram Panchayat. There is a need for competent authorities to control this financial transaction. However, there are 8 posts of Gramsevak vacancies in 5,3 gram panchayats in the district. The number of sanctioned posts is 4. Therefore, in some places the village service has been given the charge of two gram panchayats. The question is how to develop the village due to this extra burden.

The number of gram panchayats in the district increased. However, the number of Gramsevak posts is similar to the pattern of 1. Therefore, the rate has been increased to three straight. In some places, due to the group Gram Panchayat and small Gram Panchayat, this number may decrease. However, these positions remain largely empty. This question needs to be taken seriously. The extension officer has sanctioned 5 posts and the number is five. While 8 posts of Rural Development Officer have been approved, 19 are vacant. However, the number of vacant posts is 5, while the posts of the Gram Seva are approved.

About Rs 3 crore comes from the Central Finance Commission of the Gram Panchayat every year, about Rs 3 crore annually. So from 'Paisa', the state government gets Rs 5-8 crores. Likewise, District Planning Board receives large amount of money from public benefit, civic amenities, pilgrimage development fund, general and tribal development fund. Similarly, the functions of MPs and MLAs are different. All these funds need to be properly utilized and controlled. For this, a representative of the government is required to be able here. However, the sanctioned position is 499 when there is a Gram Panchayat. So here is the difference of the position of 1949. There are 8 vacancies in the approved post.

No four year recruitment

On November 7, the village volunteers were recruited. However, he did not recruit for four years thereafter. In it, 4 Gramsevaks met from the position of compassion. However, the numbers remained small. Apart from the village workers, the number of employees here is small. The government needs to look into that too.

There were inspections on Friday though

Zilla Parishad's Gram Panchayat Officer Ravindra Pardesi Gramsevakas are co-ordinated with a small number of villages. He has also taken up the gram panchayat investigation program every Friday. So far, he has examined 5 out of 5 gram panchayats.

Gram Panchayat has increased, but it is less than that. Yet we are carrying out all the tasks in small numbers. Every Friday we inspect the Gram Panchayat. So far 1 gram panchayat has been inspected. We are pursuing at the government level to approve positions.

Source: Matta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda