पालकांनो तुमचा मुलांसाठी एवढे वाचा दहावी : परीक्षा केंद्रावर जाताना 6 गोष्टी लक्षात ठेवा

By Naukari Adda Team


पालकांनो तुमचा मुलांसाठी एवढे वाचा दहावी : परीक्षा केंद्रावर जाताना 6 गोष्टी लक्षात ठेवा, 6 things to remember when going to the exam center

दहावी : परीक्षा केंद्रावर जाताना 6 गोष्टी लक्षात ठेवा

हाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. राज्यातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा 03 मार्च ते 23 मार्चपर्यंत होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. 9045 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश असणार आहे. कॉपी आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मार्च 2020 पासून 80 गुणांची लेखी 20 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे. 10 वीची परीक्षा देण्यासाठी गेल्यावर्षी पेक्षा यंदा 65 हजार 25 विद्यार्थी संख्या जास्त असल्याचंही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने(exam center) माहिती दिली आहे.

8 विभागीय मंडळांमध्ये आणि पुण्यासह राज्य मंडळाच्या ऑफिसमध्ये अशा 10 हेल्पलाईन 24 तास उपलब्ध असणार आहेत. तिथे आपण परीक्षांशी संबंधित तक्रार नोंदवू शकता. मंगळवारी सकाळच्या सत्रात 11 ते 2 या वेळेत प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी भाषाचे पेपर असणार आहे. तर दुपारच्या सत्रात 3 ते 6 या वेळेत जर्मन आणि फ्रेंचचा पेपर होणार आहे. परीक्षेआधी शाळांकडे देण्यात आलेलं वेळापत्रक ग्राह्य धरावं अशी सूचनाही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं देण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रावर(exam center) जाण्याआधी या गोष्टी विसरू नका

1. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणि आयडी कार्ड परीक्षा केंद्रांवर घेऊन यावे. परीक्षेच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रात उपस्थिती राहाणं आवश्यक आहे.

2. विद्यार्थ्यांना वेळेआधी 10 मिनिटं उत्तर पत्रिका देण्यात येतील. त्यावर बारकोड आणि इतर माहिती विद्यार्थ्यांनी भरायची आहे.

3. पेपर मिळाल्यानंतर तो व्यवस्थित तपासून घ्यावा. काही शंका असल्यास परीक्षा केंद्रातील शिक्षकांना त्यासंदर्भात विचारावे.

4. परीक्षागृहात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा कागद घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.

5. मोबाईल, पुठ्ठ्याचे रायटींग पॅड, कागदाचे कपटे इत्यादी गोष्टी सोबत घेऊन जाण्यास परवानगी नाही. विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तक आणि तत्सम गोष्टी आधीच बाहेर ठेवून याव्यात.

6. कॉपी पकडल्यास विद्यार्थ्यावर लाल शेऱ्यासह कारवाई करण्यात येणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


6 things to remember when going to the exam center

By Naukari Adda Team


Tenth: 6 things to remember when going to the exam center
The Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board examinations for Class X will begin from Tuesday. 17 lakh 65 thousand 898 students from the state will take the exam. The exam will be held from March 03 to March 23. Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan have been organized through nine divisional boards. 9045 handicapped students will also be included. To prevent copying and other inappropriate forms, 273 heavy teams have been deployed across the state. From March 2020, a written test of 80 marks will be conducted on 20 marks. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has informed that this year 65 thousand 25 students are more than this year to appear for the 10th examination.

Such helplines will be available 24 hours in 8 divisional boards and offices of the State Board including Pune. There you can report the exam related. The first language will be the Marathi, Hindi, Urdu, Gujarati, Kannada, Tamil, Telugu, Malayalam, Sindhi, Bengali, Punjabi, Punjabi language papers from 11 am to 2 am in the morning session. The German and French papers will be held in the afternoon session from 3 to 6. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has also been advised to ensure that the schedule given to schools before the examination is acceptable.

Do not forget these things before going to the exam center

1. Students should bring the hall ticket and ID card to the examination centers. It is important to be present at the examination center for half an hour before the exam.

2. Students will be given answer sheets 10 minutes ahead of time. Students have to fill in the barcode and other information on it.

3. After getting the paper, it should be checked properly. If there is any doubt, the teacher at the exam center should ask about it.

4. It is strictly forbidden to carry any kind of food or paper in the examination hall.

5. Carrying mobiles, cardboard writing pads, paper cloths etc. is not allowed. Students should keep their books and similar items in advance.

6. If the copy is seized, the student will be prosecuted with a red note.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda