कृषी विभागात ९ हजार रिक्त पदे

By Naukari Adda Team


कृषी विभागात ९ हजार रिक्त पदे, Krushi Vibhag Bharti 2020

राज्यातील कृषी विभागात नऊ हजार पदे रिक्त 

अधिक्षकांच्या 62 खुर्च्या रिकाम्या : 2017 पासुन  लिपिकांची पदोन्नती थांबली 

 नागपूर : कृषी हा भारताचा कणा असला तरी या महत्त्वाच्या विभागामध्ये राज्यात नऊ विविध संवर्गातील हजार पदे रिक्त आहेत. मंत्रालयीनस्तरापासून तर विभागीयस्तरापर्यंत सर्वच ठिकाणी पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने कृषी विभागातील कामावर ताण पडत आहे.  

एकूण पदांच्या ३३ टक्के पदे रिक्त आहेत.

राज्य शासनाच्या कृषी विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर पदे २७ हजार ५०२ आहेत. त्यातील महत्वाची मानली जाणारी सुमारे नऊ हजार पदे मागील तीन वर्षांपासून सरकारने भरलेली नाही किंवा पदोनतीही केली नाही. यामुळे अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत.

प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे पद महत्वाचे मानले जाते. मंत्रालय स्तरावर या पदभरतीसंदर्भात अधिकार असतात. कृषी विभागात ही तीन पदे मंजूर असली तरी एकही पद भरलेले नाही. अशीच काहीशी स्थिती प्रशासन अधिकाऱ्यांची आहे. ही ११ पदे मंजूर असून, फक्त ७ पदे भरलेली आहेत. चार पदे रिक्त आहेत. सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या ४४ पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. या तीनही संवर्गाची पदे भरण्याचे अधिकार मंत्रालय स्तरावर असतात. नागपूर, अमरावती,  औरंगाबाद, लातूर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि ठाणे या आठही विभागस्तरावर लिपिक संवर्गात ३,३४३ पदे आहेत. प्रत्यक्षात १०१७ पदे रिक्त आहेत. या पदोन्नतीही २०१७ पासून थांबल्या आहेत.
 

आश्वासन मिळाले पूर्तता नाही

ही रिक्त पदे भरण्यासंदर्भात डिसेंबर-२०१९ च्या हिवाळी अधिवेशनात कृषी सहसंचालक, कृषी विभागाचे प्रधान सचिव आणि आयुक्तांना निवेदन दिले. वस्तुस्थिती समजावून सांगितली. जानेवारी महिन्यातच पदोन्नतीचे आदेश काढू, असे आश्वासन मिळाले होते. मात्र अद्यापही पूर्तता झाली नाही.

 

                      -मुकुंद पालटकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Krushi Vibhag Bharti 2020

By Naukari Adda Team


Nine thousand posts vacant in the agriculture department of the state

62 vacancies for superintendent vacancies: Clerical promotion stopped from 2017

Nagpur: Though agriculture is the spine of India, there are thousands of vacancies in nine different sections of the state in this important section. Due to the vacancies at the ministry level and at the departmental level, the work of the agriculture department is under stress.

4% of the total posts are vacant.

The total sanctioned posts of officers and employees in the agriculture department of the state government are 6 thousand. About nine thousand positions considered important among them have not been filled or promoted by the government for the last three years. Because of this, the chairs of many office staff and staff are empty.

Senior Administrative Officer This post is considered important for administrative functioning. There are powers at the ministry level regarding this recruitment. Although these three positions are approved in the agriculture department, no post has been filled. Similar is the case with the administration officials. These 3 posts are approved and only 3 posts are filled. Four positions are blank. Three of the 4 posts of Assistant Administration Officer are vacant. The Ministry has the authority to fill the posts of all three classes. Nagpur, Amravati, Aurangabad, Latur, Pune, Kolhapur, Nashik and Thane have eight posts in the clerical division. Actually there are 3 vacancies. These promotions have also stopped at 2.


The assurance is not met

Regarding filling these vacancies, the Secretary of Agriculture, Principal Secretary of Agriculture Department and Commissioner made a statement at the winter session of December 29. The facts are explained. It was promised that we would remove the promotion order in January. But that has not been fulfilled yet.

-Mukund Paltkar, Chairman, Maharashtra State Department of Agriculture Clerk Cadre Organization.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda