राज्यात २० एप्रिलपासून शासकीय मेगाभरती

By Naukari Adda Team


राज्यात २० एप्रिलपासून शासकीय मेगाभरती, Govt Youth dreams to be fulfilled: Agency appointment by April 1

राज्यात २० एप्रिलपासून शासकीय मेगाभरती

तरुणांची होणार स्वप्नपूर्ती : १५ एप्रिलपर्यंत एजन्सी नियुक्ती

 

सोलापूर, ता.१०: राज्यातील शासकीय विभागांतील रिक्त पदांची संख्या आता दोन लाखांवर पोचली आहे. थेट जनतेशी संबंधित गह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांत सर्वाधिक रिक्त पदे आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय मेगाभरतीची तारीख निश्चित झाली असून १५ एप्रिलपर्यंत खासगी एजन्सी नियुक्त करून २० एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात होणार आहे. एक लाख एक हजार पदांची आरक्षण पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने  राज्यातील ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलकडे अर्ज केले. मात्र, मेगाभरतीला  प्रत्यक्षात मुहूर्त लागलाच नाही आणि  विद्यार्थ्यांची तब्बल १३० कोटींहून अधिक रक्कम अडकून पडलो. आता महाविकास आघाडी सरकार महापरीक्षा पोर्टल बंद करून खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाआयटी विभागाच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. महाआयटी विभागातर्फे 'आरएसपी' (रिक्वेस्ट ऑफ प्रपोजल) प्रसिद्ध केली जाणार असून देशातील एका सक्षम अशा एजन्सीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत.  राज्य सरकारच्या निर्देशानुसार १५ एप्रिलपर्यंत राज्यातील शासकीय मेगा भरती साठी एक एजन्सी नियुक्ती केली जाणार आहे. तत्पूर्वी, राज्याच्या सामान्य प्रशासनाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामध्ये महाभरतीची प्रक्रिया कशी राहणार, त्यावर नियंत्रण कोणाचे असणार याबद्दल स्पष्टीकरण दिले जाणार आहे. 

-------------------------------------------

राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाआयटीतर्फे शासकीय महाभरती साठी सक्षम अशी खासगी एजन्सी नियुक्त कली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांत निविदा (आरएसपी) प्रसिद्ध केली जाणार असून १५ एप्रिलपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागातर्फे शासकीय महाभरती कशी राबवायची, याबाबत परिपूर्ण परिपत्रक निघेल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मेगाभरतीला सुरवात होईल.

- अजित पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाआयटी, मुंबई

----------------------------------------

 

ठळक बाबी...

* मेगाभरतीनंतर राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी द्यावे लागणार नऊ हजार कोटी

* सामान्य प्रशासन (जेईडी) विभाग ठरविणार १० एप्रिलपर्यंत शासकीय मेगाभरतीचे नियोजन

* शासकीय रिक्त पदांच्या भरतीसाठी १५ एप्रिलपर्यंत महाआयटीतर्फे नियुक्त केली जाणार खासगी एजन्सी

* महापरीक्षा पोर्टलकडील ३५ लाख विद्यार्थ्यांचा डाटा महाआयटीला सुपूर्द

* गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी व पशुसंवर्धन, महसूल विभागातील सर्वाधिक पदांची भरती

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Govt Youth dreams to be fulfilled: Agency appointment by April 1

By Naukari Adda Team


Govt

Youth dreams to be fulfilled: Appointment by April 1

Solapur, Dist: The number of vacancies in the government departments has now reached two lakh. Directly related to the population, the most vacant positions are in the fields of public health, social justice, water resources, agriculture and animal husbandry, revenue and forestry, women and child development. Against this backdrop, the official mega recruitment date has been fixed. Reservation verification of one lakh one thousand posts has also been completed. The then Fadnavis government took an estimate of the financial position of the state and decided to recruit 3 thousand posts. In order to fulfill the dream of a government job, more than 500,000 students from the state have applied to the Examination Portal. However, the Megabharatis did not have to be realistic and more than 200 million students were trapped. Now, the government leading the development decided to close the examination portal and take the test through private agencies. Accordingly, all the processes are being completed on the battlefield through MaHIT department. The RSP (Request of Proposal) will be released by the MaHIT department and proposals will be sought from a competent agency in the country. According to the directive of the state government, an agency will be appointed for the government mega recruitment in the state till April 1. Earlier, a circular would be issued by the general administration of the state. It will explain how the process of Mahabharata will be, who will have control over it.

-------------------------------------------

As per the directive of the state government, a private agency capable of governing Mahabharatis will be appointed by the MahaIT. The tender (RSP) will be released in two days and all the process will be completed by April 1st. In the meantime, a complete circular will be issued on how the General Administration Department will implement the Government Mahabharata. The mega-recruitment will begin from the third week of April.

- Ajit Patil, Chief Executive Officer, Mahait, Mumbai

----------------------------------------

Highlights ...

Nine thousand crore general administration (JED) departments to be paid annually from the state treasury after the mega recruitment. And Animal Husbandry, Revenue Most posts recruited following section


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda