coronavirus : रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

By Naukari Adda Team


coronavirus : रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड,  coronavirus: Railway bumper recruits during Corona crisis, choose to be interviewed directly

 

coronavirus : कोरोनाच्या संकटादरम्यान रेल्वेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

 

 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. देशातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेनेही कोरोनाचा सामना  करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी रेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण रेल्वेमध्ये 600 पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या सर्व पदांवर कुठल्याही लेखी परिक्षेशिवाय थेट भरती होणार आहे. 

 

या भरतीप्रक्रियेमध्ये डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी जागा भरल्या जातील. या भरती प्रक्रियेमधून भरल्या जाणाऱ्या जागांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.  डॉक्टर्स 72 जागा, नर्सिंग स्टाफ 120 जागा, लॅब असिस्टंट 24, रेडिओग्राफर 24 पदे, हॉस्पिटल अटेंडेंट 120 जागा, हाऊस किपिंग असिस्टंट 240 जागा. 

रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार डॉक्टर्सच्या पदांसाठी 15 एप्रिल, नर्सिंग स्टाफसाठी 16 एप्रिल आणि लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी पदांसाठी 17 एप्रिल रोजी थेट मुलाखती होतील.  विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. यानुसार 18 ते 50 ही वयोमर्यादा आहे. योग्य आणि पात्र उमेदवारांनी योग्य कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


coronavirus: Railway bumper recruits during Corona crisis, choose to be interviewed directly

By Naukari Adda Team


coronavirus: Railway bumper recruits during Corona crisis, choose to be interviewed directly


New Delhi - Corona virus outbreak has created a serious crisis in the country. All the governing and administrative systems in the country are trying to fight against Corona. Meanwhile, Indian Railways has also tightened its waist to face Corona. For this, recruitment for various medical posts has been announced in Railways. More than 600 posts have been applied for Southern Railway. All of these positions will be directly filled without any written examination.

In this recruitment process, vacancies will be filled for doctors, nursing staff, lab assistant, radiographer, hospital attendant, housekeeping assistant. Following are the details of the seats to be filled from this recruitment process. Doctors 72 seats, Nursing Staff 120 seats, Lab Assistant 24, Radiographer 24 positions, Hospital Attendant 120 seats, House Keeping Assistant 240 seats.

According to a notification issued by the Railways, live interviews will take place on April 15 for the post of doctors, April 16 for the nursing staff and April 17 for the lab assistant, radiographer, hospital attendant, housekeeping assistant etc. Different age ranges have been set for different positions. The age range is 18 to 50. It is urged that suitable and qualified candidates should come for interview with proper documents.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda