यूपीएससीची परीक्षा लॉकडाउन संपल्यावरच

By Naukari Adda Team


यूपीएससीची परीक्षा लॉकडाउन संपल्यावरच, UPSC Exam will be held after the Lockdown

यूपीएससीची परीक्षा लॉकडाउन संपल्यावरच

आयोगाच्या वेबसाइटवर अपडेट Upsc Website Updates – सर्व परीक्षा, मुलाखती आणि भरती मंडळाच्या संदर्भात आयोगाचा कोणताही महत्त्वाचा निर्णय तातडीने आयोगाच्या वेबसाइटवरवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर (३ मे) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे आणि मुलाखतींचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती यूपीएससी प्रशासनाने दिली आहे. नागरी सेवा २०१९ या परीक्षेच्या व्यक्तिमत्त्व चाचणीच्या नव्या तारखांसोबतच नागरी सेवा २०२० (प्राथमिक), अभियांत्रिकी सेवा (मुख्य) आणि भूगर्भशास्त्र सेवा (मुख्य) या परीक्षांचे परिस्थितीनुसार वेळापत्रक नव्याने प्रसिद्ध करण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे, अशी घोषणा यूपीएससी प्रशासनाने बुधवारी केली.

करोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने बुधवारी एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भरती मंडळात जेथे उमेदवार आणि सल्लागारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे गरजेचे असल्याने, अशा सर्व मुलाखती, परीक्षांच्या तारखांचे पुनरावलोकन केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ३ मेनंतर उर्वरित नागरी सेवा २०१९ व्यक्तिमत्व चाचणीच्या नवीन तारखांसंदर्भात निर्णय घेतला जाईल.

नागरी सेवा -२०२० (प्राथमिक), अभियांत्रिकी सेवा (मुख्य) आणि भूगर्भशास्त्र सेवा (मुख्य) परीक्षेच्या तारखांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. सध्याची बदलती परिस्थिती पाहता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदलाची आवश्यकता असल्यास त्याबाबत यूपीएससीच्या वेबसाइटवर याबाबत सूचित केले जाईल. एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा, भारतीय वित्तीय सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा २०२० पुढे ढकलण्याची घोषणा यापूर्वी केली आहे. सीएपीएफ परीक्षा २०२० च्या तारखादेखील यूपीएससी वेबसाइटवर सूचित केल्या जातील. राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (एनडीए-१) परीक्षा पुढील माहिती मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एनडीए-२च्या परीक्षेचा निर्णय हा १० जून, २०२० रोजी नव्या अधिसूचनेसाठी निश्चित करण्यात येईल.

सौर्स – मटा

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


UPSC Exam will be held after the Lockdown

By Naukari Adda Team


UPSC Exam will be held after the Lockdown

Updates to the Commission's website Upsc Website Updates - Any important decision of the Commission regarding all examinations, interviews and recruitment boards will be made available immediately on the Commission's website. Therefore, the administration has requested to visit the website.

After the lockdown period (May 7), the Central Public Service Commission's examinations and interviews are scheduled, the UPSC administration said. In addition to the new dates for the Personality Test of Civil Service-29, the Civil Service-1 (Primary), Engineering Services (Main) and Geological Services (Main) tests are being revised to update the schedule accordingly, the UPSC administration announced on Wednesday.

The Central Public Service Commission had convened a special meeting on Wednesday to review the situation arising out of corona. The meeting decided that all such interviews would be reviewed in the recruitment boards, as the candidates and advisors would have to travel from one place to another. Following the second phase of the lockdown, the remaining civil services will be decided on the new 90 personality test dates after May 7.

The dates for the Civil Service-1 (Primary), Engineering Services (Main) and Geological Services (Main) examinations were announced earlier. In view of the current changing circumstances, if there is any change in the schedule of this exam, it will be indicated on the UPSC website. The announcement of the postponement of the Combined Medical Services Examination, Indian Financial Services and Indian Statistical Services Examination 2 has been announced earlier. The dates of the CAPF Exam 3 will also be indicated on the UPSC website. The National Defense Academy (NDA-2) exam has been postponed until further information. The decision for the NDA-2 examination will be decided on June 7, 2008 for the new notification.

Source - Matta


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda