नीट आणि जेईई- मेन्स परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

By Naukari Adda Team


 नीट आणि जेईई- मेन्स परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर,  Neat and JEE-Mains exam dates finally announced

 'नीट' आणि 'जेईई-मेन्स' परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर

मुंबई : ‘नीट’ (NEET) आणि ‘जेईई-मेन्स’ (JEE-Mains) परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. ‘जेईई-मेन्स’ परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान घेतली जाणार असून वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ परीक्षा 26 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने वेळापत्रकाची घोषणा केली. 

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज (मंगळवार 5 मे) घोषणा केली . ‘कोरोना’च्या संकटकाळात देशभरातील सर्वच परीक्षा पुढे ढकलल्यामुळे वैद्यकीय प्रवेश इच्छुक उमेदवारांवर अनिश्चिततेच होतं.

केंद्र सरकारने 16 मार्चपासून देशभरातील विद्यापीठे आणि शाळा बंद करण्याची घोषणा केली होती. 24 मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने नीट आणि जेईई परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या.

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी) अर्थात ‘नीट’ परीक्षा रविवार 26 जुलै रोजी होणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यापूर्वी 5, 7, 8 आणि 11 एप्रिलला नियोजित असलेली ‘जेईई मेन्स’ 2020 परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता याही तारखा बदलल्या आहेत. ‘जेईई-मेन्स’ आता 18, 20, 21, 22 आणि  23 जुलै या दिवशी होईल. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित नाही. 

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रलंबित परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असंही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल  यावेळी म्हणाले.

मुंबई


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Neat and JEE-Mains exam dates finally announced

By Naukari Adda Team


'Neat' and 'JEE-Mains' exam dates finally announced

Mumbai: Dates for NEET and JEE-Mains exams have finally been announced. The JEE-Mains exam will be held from July 18 to 23 and the NEET exam for medical admission will be held on July 26. The schedule was announced by the Union Ministry of Manpower Development.

Manpower Development Minister Ramesh Pokhriyal 'Nishank' made the announcement today (Tuesday, May 5). The postponement of all examinations across the country during the Corona crisis has created uncertainty for candidates seeking medical admission.

The central government had announced closure of universities and schools across the country from March 16. A nationwide lockdown was announced on March 24. Neat and JEE exams were also postponed due to increased lockdown due to increasing prevalence of corona virus.

The National Eligibility Entrance Test (NEET) for medical courses across the country will be held on Sunday, July 26.

The National Testing Agency (NTA) had earlier postponed the ‘JEE Mains’ 2020 exam scheduled for April 5, 7, 8 and 11 till the last week of May. But now these dates have also changed. The JEE-Mains will now take place on July 18, 20, 21, 22 and 23. The JEE advance exam will be held in August and its date is yet to be decided.

A decision on the pending examinations for Class X and XII of the CBSE Board will be taken soon, said Union Manpower Development Minister Dr. Ramesh Pokhriyal said this time.

Mumbai


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda