खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार

By Naukari Adda Team


खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार, Good news! 17,000 vacancies will be filled in the health department

खुशखबर! आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार, राजेश टोपे यांची माहिती

 

मुंबई : कोरोनासोबत लढताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागातील १७ हजार रिक्त पदे लवकरच भरली जातील. यात डॉक्टरांपासून सर्व वर्गातील पदे जलदगतीने भरण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे यांनी मंगळवारी लॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. मुंबई वगळता राज्यात कुठेच बेडची कमतरता नाही. मुंबईतही साठ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असून महिनाभरात ही संख्या एक लाखावर नेण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. आता मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच अन्य पावसाळी साथ रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर आहे. नियुक्त्या आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समित्या बनवाव्यात, मुलाखतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

कोरोनाबाधितांबाबत सहानुभूती हवी
कोरोना विरूद्धच्या या लढ्यात शिक्षित व्हा, सजग व्हा पण माणुसकी घालवू नका. अनेक ठिकाणी संशयित रुग्ण किंवा अलगीकरणात असलेल्या व्यक्ती, परिवारांसोबत चुकीच्या वर्तनाची माहिती येत आहे. ही बाब चुकीची आहे. कोरोनाबाबत शिक्षित, सजग व्हा पण माणुसकी हरवू नका, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

मुंबईत केंद्रीय सुरक्षा बलाच्या ५ तुकड्या
राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १,३२८ वर गेली असून १२ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. अखेर, पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या राज्यभरात दाखल होत असून यापैकी मुंबईत ५ तुकड्या तैनात असतील. राज्य पोलीस दलात पावणे दोन लाखांच्या जवळपास पोलीस कार्यरत आहेत. लॉकडाउनच्या काळात विविध नियमांची अंमलबजावणी, बंदोबस्तासह विविध जबाबादारीचे ओझे पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे.

सोर्स - लोकमत

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Good news! 17,000 vacancies will be filled in the health department

By Naukari Adda Team


Good news! Rajesh Tope informed that 17,000 vacancies will be filled in the health department


Mumbai: While fighting with Corona, it is necessary to enable infrastructure in the health sector. For this, 17,000 vacancies in Public Health Department and Medical Education Department will be filled soon. Health Minister Rajesh Tope informed that instructions have been given to the department to fill all the posts from doctors as soon as possible.
Tope announced the fourth phase of the lockdown on Tuesday, as well as the corona. A large number of measures are underway against the backdrop of the corona. There is no shortage of beds anywhere in the state except Mumbai. Sixty thousand beds have also been provided in Mumbai and it is planned at the municipal level to increase this number to one lakh within a month. Now the pre-monsoon works need to be completed urgently. Preventive measures have been initiated for malaria, dengue and other rain-borne diseases. Emphasis is being laid on speedy completion of 17,000 vacancies in the health department. Additional committees should be formed if needed for appointments and recruitment, he said, adding that modern technology should be used for interviews.

Coronation needs empathy
Be educated in this fight against Corona, be vigilant but don’t waste humanity. In many places, suspected patients or persons in isolation are reported to have misbehaved with their families. This matter is wrong. Educate, be aware of Corona but don't lose humanity, appealed Rajesh Tope.

5 units of Central Security Force in Mumbai
The number of coronated police personnel in the state has gone up to 1,328 and 12 policemen have lost their lives. After all, to ease the pressure on the police, units of the Central Industrial Security Force and the Central Reserve Force are being deployed across the state, five of which will be deployed in Mumbai. About two lakh policemen are working in the state police force. During the lockdown, the police are burdened with various responsibilities, including enforcement of various rules and regulations. This has increased the stress on them.

Source - Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda