परीक्षेबाबत अंतिम निर्णय कुलपतींचाच; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By Naukari Adda Team


परीक्षेबाबत अंतिम निर्णय कुलपतींचाच; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, The final decision on the examination rests with the Chancellor; Governor

परीक्षेबाबत अंतिम निर्णय कुलपतींचाच; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

मुंबई : विद्यापीठ परिक्षांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ताठर भूमिका घेतली आहे. परीक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा अनपेक्षित आणि प्रथेला धरून नाही. शिवाय, या निर्णयाचे परिणाम आणि कायदेशीर बाबींचा सर्वंकष विचार झालेला नाही, असे सांगतानाच कुलपतीच परीक्षांबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्रच मंगळवारी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षा आणि शैक्षणिक वर्षाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरुंची समिती नेमली होती. या समितीने ६ मे रोजी आपला अहवाल विभागाच्या सचिवांना सादर केला आहे. हा अहवाल अजूनही कुलपती या नात्याने कुलपतींना सादर करण्यात आलेला नाही. विशेष म्हणज,े व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील सर्व कुलगुरूंनी आपापल्या परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती, याची आठवणही राज्यपालांनी करुन दिली. परिक्षेबाबत या समितीच्या अहवाल आपल्याला सादर झाल्यानंतरच या अहवालातील सर्व शिफारशी अथवा काही स्वीकारून निर्देश जारी केले जातील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.


मुख्यमंत्री ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची केलेली घोषणा ही पदवी परीक्षेबाबतच्या मुलभूत सुत्राला हरताळ फासणारी आहे. एकाच प्रकारची पदवी मिळविण्यासाठी दोन प्रकारचे, वेगवेगळे नियम असू शकत नाहीत. एकाने परिक्षा द्यायची आणि दुसऱ्याने सरासरीच्या आधारे पदवी मिळवायची, असा भेद करता येणार नाही. परीक्षेला पर्यायी प्रक्रिया ठरविता येणार नाही, असेही राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केले.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी अशा विविध शाखांतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित व्यवसायातील मंडळात नोंदणी करावी लागते. परीक्षा झाली नाही तर या संस्था अशा विद्यार्थ्यांना स्वीकारणार नाहीत. त्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यता येईल, याकडेही राज्यपालांनी लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतिक्षा
राज्यपाल हे राज्यातील विद्यापीठांचे कुलपतीदेखील आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाशी संबंधित सर्व निर्णयांचे अंतिम अधिकार हे कुलपतींकडे आहेत. याच कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून विद्यापीठ परिक्षांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे काय उत्तर देतात याची प्रतिक्षा आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The final decision on the examination rests with the Chancellor; Governor's letter to the Chief Minister

By Naukari Adda Team


The final decision on the examination rests with the Chancellor; Governor's letter to the Chief Minister


Mumbai: Governor Bhagat Singh Koshyari has taken a firm stand on university exams. Chief Minister Uddhav Thackeray's announcement to cancel the exam was unexpected and not in keeping with the norm. He further added that the final decision on the examinations would be taken by the Chancellor while stating that the results of the decision and legal issues have not been considered comprehensively. A letter in this regard was sent to the Chief Minister on Tuesday.

A committee of all vice-chancellors was appointed by Higher and Technical Education Minister Uday Samant on the occasion of Corona's examinations and academic year. The committee has submitted its report to the secretary of the department on May 6. This report has not yet been submitted to the Chancellor as Chancellor. In particular, the governor reminded that all the vice-chancellors of the state had expressed their readiness to take their respective exams in the meeting held by video conference. "After the committee's report on the examination is submitted to us, all the recommendations in the report or some of them will be accepted and instructions will be issued," Governor Koshyari said.


The announcement made by Chief Minister Thackeray to cancel the examination is a blow to the basic principle of degree examination. There can be no two different, different rules for getting the same degree. It is not possible to distinguish between one who takes the exam and the other who gets the degree on average. The governor also said in his letter that the examination could not be decided as an alternative procedure.

Students in various disciplines like medical, engineering, law have to register with the relevant business board after completing the course. These institutions will not accept such students if the examination is not held. The governor has also pointed out that it will endanger the future of the students.

Awaiting CM's reply
The governor is also the chancellor of state universities. According to the Maharashtra University Act, the Chancellor has the final say in all decisions relating to the University. The final decision regarding university examinations will be taken subject to the provisions of this Act. He has clarified this in the letter. Now we are waiting for the answer of Chief Minister Thackeray.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda