10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार? राज्य शिक्षण मंडळाची मोठी घोषणा

By Naukari Adda Team


10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार? राज्य शिक्षण मंडळाची मोठी घोषणा, When will the 10th and 12th results be announced

पुणे, 23 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यातच 10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार याची सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहून होते. अखेर, राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेचा अंदाज स्पष्ट करण्यात आला आहे.

12 वीचा निकाल 15 जुलै दरम्यान तर 10 वीचा निकाल 30 जुलैपर्यंत लागेल, अशी माहिती राज्य मंडळ अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली आहे.

सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान ही माहिती देण्यात आली.

 

कोरोना परिस्थितीमुळे  पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्यातच विलंब झाला होता. याआधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचं संकेत दिले होते.

महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. 12वीची परीक्षा पूर्ण झाली होती. मात्र, 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे.

असे पाहा निकाल

निकालासाठी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा. या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाका. तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता. mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येतील.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


When will the 10th and 12th results be announced

By Naukari Adda Team


Pune, June 23: Corona virus has spread in Maharashtra. Therefore, the exams have been postponed. All the students and parents were waiting for the results of 10th and 12th. Finally, the date of the verdict has been clarified by the State Board.

The result of 12th will be between 15th July and the result of 10th will be till 30th July, informed State Board President Shakuntala Kale.

The information was given during a video conference with Chief Minister Uddhav Thackeray and Education Minister Varsha Gaikwad on Monday.

The Corona situation was the biggest delay from taking the paper to the investigation. Earlier, Education Minister Varsha Gaikwad had hinted that the results of Class X would be released in the last week of July.

In Maharashtra, about 17 lakh 65 thousand 898 students have appeared for the matriculation examination this year. The 12th exam was over. However, the 10th geography paper remained. It was later canceled. It was also a big challenge for the government to check the papers. But now the work is nearing completion and is in its final stages.

Look at the results

Go to the official website mahresult.nic.in for results. Click on the results link on this website. Then enter your seat number, registration number and date of birth etc. Your result will flash on the screen. You can also download the results. Results can also be viewed on mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda