महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती

By Naukari Adda Team


महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती, Recruitment of seven thousand posts in MSEDCL

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती करण्यात येणार आहे. याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या जागांची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तंत्रज्ञांच्या सात हजार पदांसाठीची निवड येत्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार जागांची भरती प्रक्रिया गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढील आठवड्यात या सर्व पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. यामुळे प्रलंबित निवड प्रक्रियेतील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

महावितरण कंपनीमध्ये जुलै २०१९ मध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या दोन हजार आणि विद्युत सहाय्यक पदाच्या पाच हजार अशा एकूण सात हजार पदांच्या सरळसेवा भरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली. यामध्ये २५ ऑगस्ट २०१९ रोजी उपकेंद्र सहाय्यक पदासाठी आयबीपीएस या संस्थेकडून परीक्षा घेण्यात आली आहे. तर विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षा न घेता केवळ दहावीच्या गुणानुक्रमानुसार निवड करण्यात येते. त्यानंतर या दोन्ही पदाच्या सात हजार जागांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया प्रलंबित आहे.

राज्यातील सुमारे दीड लाख आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या सात हजार जागांसाठी अर्ज भरलेले आहेत. मात्र गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याने उमेदवारांनी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व इतर वरिष्ठ संचालकांशी या प्रलंबित भरती प्रक्रियेबाबत नुकतीच चर्चा केली. 

त्यानंतर येत्या आठवड्याभरात विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या सात हजार जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. डॉ. राऊत यांच्या आदेशामुळे राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून महावितरणमधील प्रलंबित भरती प्रक्रियादेखील पूर्ण होणार आहे. तसेच ग्राहकसेवेसाठी तब्बल सात हजार कर्मचाऱ्यांची आणखी भर पडणार आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment of seven thousand posts in MSEDCL

By Naukari Adda Team


Mumbai: There is good news for job seekers. Seven thousand posts will be filled in MSEDCL. Energy Minister Dr. Nitin Raut has ordered the recruitment of these posts. Accordingly, the selection for 7,000 posts of technicians is likely to be announced next week. The recruitment process for 7,000 posts of Electrical Assistants and Sub-Station Assistants in MSEDCL has been pending for the last eight months. State Energy Minister Dr. Nitin Raut has directed MSEDCL to announce the selection list of eligible candidates for all these posts next week. This has brought relief to the candidates in the pending selection process.

In July 2019, MSEDCL started the process of direct recruitment for a total of 7,000 posts, including 2,000 for Sub-Center Assistants and 5,000 for Electrical Assistants. The examination for the post of Sub-Center Assistant has been conducted by IBPS on 25th August 2019. So for the post of Electrical Assistant, selection is made only on the basis of merit without taking the examination. After that, the process of direct recruitment of 7,000 posts for both these posts is pending.

About 1.5 lakh ITI candidates in the state have applied for these 7,000 seats. However, as the recruitment process has been pending for the last eight to nine months, the candidates have asked the state's energy minister, Dr. Raut's statement drew attention. Energy Minister Dr. Raut recently discussed the pending recruitment process with Dinesh Waghmare, Principal Secretary, Department of Energy and Chairman and Managing Director, MSEDCL, and other senior directors.

After that, the selection list of eligible candidates for 7,000 posts of Electrical Assistant and Sub-Station Assistant should be announced within the next week. Dr. Raut's order has come as a great relief to the candidates in the state and the pending recruitment process in MSEDCL will also be completed. It will also add another 7,000 employees for customer service.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda