11 वी ऑनलाईन ऍडमिशनचे वेळापत्रक जाहीर

By Naukari Adda Team


11 वी ऑनलाईन ऍडमिशनचे वेळापत्रक जाहीर,  11th Online Admission Schedule Announced

11 वी ऑनलाईन ऍडमिशनचे वेळापत्रक जाहीर

:- 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. आज, 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहेत. तर 1 ऑगस्टपासून विद्यार्थ्याला 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात 11 वीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मात्र सदर प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 1 भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे.

 

आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग 1 भरायचा होता, मात्र आता हा अर्ज 1 ऑगस्टपासून विद्यार्थी भरणार आहेत.या ऑनलाईन प्रवेशाबाबत कनिष्ठ महाविद्यालय, मार्गदर्शक केंद्र तसेच माध्यमिक शाळांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. पण अद्याप विद्यार्थी आणि पालकांना याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना विभागीय उपसंचांलकना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना सखोल ऑनलाइन प्रवेशाबाबतची माहिती दिलेल्या अधिकृत ठिकाणी मिळावी यासाठी दक्षता घ्यावी असे संचालकांकडून सांगण्यात आले आहे.

  • दिनांक 26 जुलै 2020 पासून – 11 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. लॉग इन आयडी मिळवून पासवर्ड तयार करणे.
  • दिनांक 1 ऑगस्ट पासून – दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड
  • वापरून लॉग इन करून 11 वी प्रवेशसाठीचा अर्ज भाग – 1 भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक करणे.
  • अर्जातील माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रवरून प्रमाणित करून घेणे
  • विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती तपासून अर्ज पूर्णपणे भरणे
  • 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग- 2 महाविद्यालय पसंती क्रमांक भरणे

आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


11th Online Admission Schedule Announced

By Naukari Adda Team


11th Online Admission Schedule Announced

: - Revised schedule for 11th online admission process has been announced once again. Today, from July 26, students will receive a login ID and password. From August 1, students will be able to fill part 1 of the 11th online admission form. The 11th admission process will be done online in Mumbai Mahanagar, Pune, Nashik, Aurangabad, Amravati and Nagpur divisions of the state. However, as the students and parents are not yet aware about the admission process, the date for filling Part 1 in the admission process has been postponed.

According to the earlier schedule, Part 1 of the application was to be filled from tomorrow, but now the application will be filled by the students from August 1. Training classes of junior colleges, guidance centers and secondary schools are being conducted for this online admission. However, measures should be taken to provide detailed information to the students and parents, said the Deputy Director of Education. The director has asked the students and parents to take precautionary measures to get in-depth online admission information at the authorized places.

From 26th July 2020 - Online registration of students for 11th admission. Create a password by getting a login ID.
From 1st August - Login ID and password obtained by visiting the given website
Logging in using 11th Admission Application Part-1 Filling, Locking the Form by Paying the Fee.
Certification of information in the application from the school, guidance center
Complete the application form by checking the information in the student admission form
Filling Part-2 College Preference Number after 10th Board Results


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda