औरंगाबाद विभागात सतत चार वर्ष अव्वल राहणारा बीड जिल्हा यावर्षी चौथ्या स्थानावर

By Naukari Adda Team


औरंगाबाद विभागात सतत चार वर्ष अव्वल राहणारा बीड जिल्हा यावर्षी चौथ्या स्थानावर, Beed district, which topped the Aurangabad division for four consecutive years, is ranked fourth this year

औरंगाबाद विभागात सतत चार वर्ष अव्वल राहणारा बीड जिल्हा यावर्षी चौथ्या स्थानावर

बीड : मागच्या चार वर्षापासून दहावीच्या निकालामध्ये औरंगाबाद विभागात बीड जिल्हा अव्वल राहिला होता मात्र यावर्षी दहावीचा निकाल बीड जिल्हा थेट चौथ्या क्रमांकावर गेला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा यावर्षी बीड जिल्ह्या साठी धक्कादायक निकाल लागला आहे.

औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा सर्वाधिक 94.4 टक्के इतका निकाल लागला असून औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल (92.10 टक्के) इतका लागला आहे. हिंगोली जिल्हा 91.94 टक्के निकाल घेत तिसर्‍या स्थानी, बीड जिल्हा 91.24 टक्के घेऊन चौथ्या स्थानी तर परभणी जिल्हा 90.66 टक्के निकाल घेवून पाचव्या स्थानावर राहिला आहे.औरंगाबाद विभागाचा एकूण निकाल 92 टक्के लागला आहे.

 

आज लागलेल्या निकालांमध्ये बीड जिल्ह्याचा एकुण निकाल 91.24 टक्के इतका लागला आहे. यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी (94.36) अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 88.94 टक्के इतके आहे.

कोरोनामुळे यावर्षी बहुतेक परीक्षा या रद्द कराव्या लागल्या लहान वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करावे लागले. दहावीचा निकाल सुद्धा दरवर्षी हा जून महिन्यामध्ये लागत असतो मात्र यावर्षी करूनच या संकटामुळे निकाल जुलै महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात लागला आहे. यात बीड जिल्ह्याचा 91.24 टक्के इतका लागला आहे.

मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील 645 शाळांमधील 24 हजार 798 मुले व 18 हजार 307 मुली अशा एकुण 43 हजार 105 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. पैकी 24 हजार 612 मुले व 18 हजार 176 मुली अशा एकुण 42 हजार 788 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

दहावीच्या आज लागलेल्या निकालावरुन यापैकी 21 हजार 890 मुले 17 हजार 150 मुली असे एकुण 39 हजार 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णचे प्रमाण अधिक आहे. हे निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक 93.85 टक्के निकाल परळी तालुक्याचा लागला असून त्या खालोखाल आष्टी तालुक्याने 93. 38 टक्के निकाल घेत जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आहेत तर अंबाजोगाई तालुका 93.3 टक्के निकाल घेत जिल्ह्यात तृतीयस्थानी राहिला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून अभिनंदन केले जात आहे.


तालुकानिहाय निकाल

परळी-93.85
आष्टी-93.38
अंबाजोगाई-93.03
बीड-90.67
पाटोदा-87.38
गेवराई-92.23
माजलगाव-86.88
केज-92.99
धारुर-86.80
शिरुर-88.17
वडवणी-90.73

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Beed district, which topped the Aurangabad division for four consecutive years, is ranked fourth this year

By Naukari Adda Team


Beed district, which topped the Aurangabad division for four consecutive years, is ranked fourth this year

Beed: For the last four years, Beed district had topped the Aurangabad division in the results of class X, but this year, the results of class X have gone to the fourth position in Beed district. The State Board of Secondary and Higher Secondary Education's Class X examination held in March 2020 has yielded shocking results for Beed district this year.

In Aurangabad division, Jalna district has the highest result of 94.4 per cent and Aurangabad district has the highest result (92.10 per cent). Hingoli district came third with 91.94 per cent results, Beed district came fourth with 91.24 per cent results and Parbhani district came fifth with 90.66 per cent results. The overall result of Aurangabad division is 92 per cent.

In today's results, the overall result of Beed district is 91.24 percent. It has a higher pass percentage of girls (94.36) than boys. The pass percentage of the children is 88.94 percent.

Corona had to cancel most of the exams this year, forcing younger students to pass without taking the exam. The results of class X are also available in the month of June every year, but this year, due to this crisis, the results are available in the last week of July. This is 91.24 per cent of Beed district.

A total of 43,105 students, including 24,798 boys and 18,307 girls from 645 schools in the district, had registered for the Class X examination in March. Out of which 24 thousand 612 boys and 18 thousand 176 girls, a total of 42 thousand 788 students had appeared for the matriculation examination.

Out of these 21 thousand 890 boys and 17 thousand 150 girls, a total of 39 thousand 40 students have passed. The pass percentage of girls is higher than that of boys. This is clear from the results.

Beed district has the highest pass percentage of 93.85 per cent followed by Parli taluka followed by Ashti taluka with 93.38 per cent results and has secured second position in 10th standard examination while Ambajogai taluka has come third with 93.3 per cent result. All the passing students are being congratulated by the Education Department of the Zilla Parishad.


Taluka wise results

Parli-93.85
Ashti-93.38
Ambajogai-93.03
Bead-90.67
Patoda-87.38
Gevrai-92.23
Majalgaon-86.88
Cage-92.99
Dharur-86.80
Shirur-88.17
Wadwani-90.73

 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda