अकरावी प्रवेश यंदा घरबसल्या; पहिल्या दिवशीच १,९३,००० नोंदणी

By Naukari Adda Team


अकरावी प्रवेश यंदा घरबसल्या; पहिल्या दिवशीच १,९३,००० नोंदणी, The eleventh entry sat at home this year; 1,93,000 registrations on the first day

मुंबई  -   दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली. यंदा दहावीच्या निकालानंतर शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा सर्वच प्रक्रिया ऑनलाइन करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी नोंदणी करत आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या हातात माहितीपुस्तिका नसल्याने अनेक बाबतीत संभ्रम निर्माण होत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन होत नसल्याने गोंधळ वाढू लागला आहे.

राज्यभरात मुंबई एमएमआर क्षेत्र तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिकांच्या क्षेत्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. या प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू झाले असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. पहिल्या टप्यातील अर्ज भरल्यानंतर विद्यार्थांना दुसरा टप्पात महाविद्यालय पसंतीक्रम असणार आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे असले तरी विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन करावी लागत होती. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन सादर करता येणार आहेत. तसेच त्यांना प्रवेश शुल्कही ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मिळालेला प्रवेश निश्चित करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी कुठेही धावाधाव करू नका, सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

माहितीपुस्तिकाच नाही

प्रवेशासाठी आवश्यक अशी माहितीपुस्तिका आणि वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हातात पुस्तिकाच नसल्याने कोणत्या कॉलेजांची निवड कशी करावी, त्यांचे शुल्क काय आहे, याची माहितीच विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. अनेकांनी प्रवेशसाठीच्या प्रक्रियेचे शुल्क भरलेले असतानाही त्यांना ते दाखवले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

ग्रेडचे गुणांबाबत दिलासा

आयसीएसई आणि आयजीएससीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना ग्रेडमध्ये गुण दिले जातात. त्यामुळे त्यांना दरवर्षी गुणांमध्ये रूपांतर करण्यासाठी धावपळ करावी लागते. मात्र यंदा यामध्ये बदल करण्यात आला असून विद्यार्थांना प्रवेशाच्या संकेतस्थळावरच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

पहिल्या दिवशी बोर्डनिहाय नोंदणी झालेले विद्यार्थी

राज्य शिक्षण मंडळ - १,७२,३५७

सीबीएसई - ७,२००

आयसीएसई - १०,८२४

आयबी - ३५

आयजीसीएसई - १,२६०

एनआयओएस - २७६

इतर - २९५

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The eleventh entry sat at home this year; 1,93,000 registrations on the first day

By Naukari Adda Team


The eleventh entry sat at home this year; 1,93,000 registrations on the first day

 

Mumbai: After announcing the results of class X, the education department has started the process of online admission for class XI. This year, the Department of Education has started the eleventh online admission process after the results of the tenth. Against the backdrop of Corona, students will be able to do all the procedures online this year. Students are registering for this, but in many cases there is confusion as students do not have brochures in their hands. The confusion is growing as the students are not getting any guidance in this regard.

Eleventh admission process is conducted online in Mumbai MMR area as well as Pune, Nashik, Aurangabad, Amravati, Nagpur Municipal Corporations across the state. The website of this admission process has been started and the students who have passed 10th will be able to fill part one of the admission application. Students will have college preference in the second phase after filling the application in the first phase. Although the 11th admission form was to be filled online every year, the students had to go to the guidance centers to verify their certificates. But this year, students will also be able to submit documents online in the background of Corona. They have also been provided the facility to pay the entrance fee online. Therefore, this year students will be able to complete the admission process at home. Don't rush anywhere to confirm the admission or any kind of complaint, all the procedures have been done online, said School Education Minister Varsha Gaikwad.

No brochure

There is confusion among students and parents as the brochures and schedules required for admission have not been released yet. This is a problem for the students as they do not have a book in hand, they do not know how to choose which colleges, what are their fees. Many have complained that even though they have paid the admission fee, they are not being shown it.

Consolation about grade points

Students of ICSE and IGSCSE board are given marks in the grade. So they have to rush to convert them into points every year. However, this year this has been changed and the students have been relieved as the facility has been made available only on the admission website.

Students registered board wise on the first day

State Board of Education - 1,72,357

CBSE - 7,200

ICSE - 10,824

IB-35

IGCSE - 1,260

NIOS - 276

Others - 295


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda