MPSC’चा मोठा निर्णय! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा

By Naukari Adda Team


MPSC’चा मोठा निर्णय! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा, MPSC

MPSC’चा मोठा निर्णय! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा

 सोलापूर :  राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी पुणे जिल्हा निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली ठिकाणी परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. 17 ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून 19 ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.

 पुणे जिल्हा निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागात बाहेरील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या उमेदवारांना त्यांच्या महसूली विभागातील परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. तर पुणे महसूली विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास मुभा असणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान महसुली परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस केले जाणार आहेत.

 

 ठळक बाबी. 

  •   17 ऑगस्ट दुपारी दोन ते 19 ऑगस्ट सायंकाळी बारा वाजेपर्यंत बदलता येणार परीक्षा केंद्र
  •   जिल्हा केंद्र निवडण्यासाठी असलेल्या पात्र उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस द्वारे कळविले जाणार
  •  प्रत्येक महसूल विभागाच्या मुख्यालयातील जिल्हा केंद्रांची कमाल क्षमता लक्षात घेऊन प्रथम येणाऱ्यास राहणार प्राधान्य
  •   परीक्षा केंद्राची क्षमता संपल्यानंतर केंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नसल्याचे आयोगाकडून स्पष्टीकरण

 उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

 राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 20 सप्टेंबर रोजी देणार आहेत. परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येणे उमेदवारांना कठीण होणार आहे. ही अडचण लक्षात घेऊन आयोगाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी दिली आहे.
– सुनिल आवताडे, सहसचिव, एमपीएससी 

सोर्स:सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MPSC's big decision! ‘Ya’ students are allowed to change examination centers

By Naukari Adda Team


MPSC's big decision! ‘Ya’ students are allowed to change examination centers

 Solapur: The Maharashtra Public Service Commission (MPSC) has given permission to the candidates selected for Pune district for the pre-examination of state service to select examination centers at their revenue places. Candidates will be able to change centers from 2 pm on August 17 to 23.59 pm on August 19.

 Out of the candidates selected from Pune district, candidates from outside Mumbai, Nashik, Aurangabad, Nagpur, Amravati in Pune revenue department will be able to choose examination centers in their revenue department. Students from Pune, Satara, Sangli, Solapur and Kolhapur in the Pune Revenue Department will not be allowed to change their examination centers, the commission said. Meanwhile, SMSes will be sent through the commission to the candidates who are eligible to change the revenue examination center.


 Highlights.

      The examination center can be changed from 2 pm on 17th August to 12 noon on 19th August
      Eligible candidates for district center selection will be notified by SMS through the commission
     Considering the maximum capacity of the district centers at the headquarters of each revenue department, priority will be given to the first come first served basis
      An explanation from the Commission that the candidates will not be able to select the center after the capacity of the examination center is exhausted

 Decisions to avoid inconvenience to candidates

 About 2.5 lakh students in the state will appear for the state service pre-examination on September 20. It will be difficult for the candidates to come to the examination center for the examination. In view of this difficulty, the Commission has given the opportunity to the students to change the examination center.
- Sunil Avtade, Joint Secretary, MPSC

Source: Morning


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda