मुलांनो अभ्यासाला लागा! JEE आणि NEE मेन परीक्षा 'या' तारखेला होणार

By Naukari Adda Team


मुलांनो अभ्यासाला लागा! JEE आणि NEE मेन परीक्षा

मुलांनो अभ्यासाला लागा! JEE आणि NEE मेन परीक्षा 'या' तारखेला होणार

 

मुंबई, 22 ऑगस्ट : JEE आणि NEEची परीक्षा होणार की नाही या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेत होणार असून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण नीट आणि जेईई परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. यासंदर्भात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं परीपत्रक जारी केलं आहे.

जेईईची मुख्य परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. नीट परीक्षेसाठी 15,97,433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानं जेईई आणि नीट परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यासंदर्भात 11 विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती.

 

कोरोना काळात ही परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असताना NEET आणि JEE घेणे धोक्याचे ठरू शकते. असं म्हटलं होतं. कोरोनामुळे ही परीक्षा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दरम्यान कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता आता 13 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. मात्र ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं यासंदर्भात ट्वीट करून परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

सोर्स - न्युज १८ लोकमत

 

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Kids start studying! JEE and NEE Main exams will be held on this date

By Naukari Adda Team


Kids start studying! JEE and NEE Main exams will be held on this date

Mumbai, Aug 22: The controversy over whether JEE and NEE exams will be held has come to an end. Both these exams will be held on time and students need to study. Because the dates of NEET and JEE exams have been announced. The National Examination Agency has issued a circular in this regard.

The main examination of JEE will be held from September 1 to 6 as per the scheduled date. The exam will be held on September 13. 15,97,433 students have registered for the exam. Earlier, the apex court had rejected the pleas of 11 students seeking cancellation of JEE and NEET exams due to corona.


The Supreme Court was asked to cancel the exam during the Corona period. Taking NEET and JEE can be dangerous when all exams are canceled during the corona period. That was said. The exam was postponed until July due to corona. Meanwhile, in view of the increasing cases of corona, the examination will now be held on September 13.

Students and parents are being asked to cancel the exam in view of Corona's threat. However, after the Supreme Court rejected the demand, the National Examinations Agency tweeted the dates of the exams.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda