मोठा निर्णय! दहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये नाहीच!

By Naukari Adda Team


मोठा निर्णय! दहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये नाहीच!, Big decision! Tenth and twelfth failed students

मुंबई, 2 सप्टेंबर: दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी माहिती दिली.

 

शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थीची फेरपरीक्षा ही बहुतेक वेळा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. पण, यंदा कोरोनाचं संकट असल्यानं ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कदाचित ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्या घेण्यात येण्याची शक्यता आहे.

 

दहावीमध्ये जवळपास एक लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे. मात्र, नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Big decision! Tenth and twelfth failed students' re-examination is not in October!

By Naukari Adda Team


Mumbai, September 2: The state government has taken a big decision regarding the students who failed in the 10th and 12th standard examinations. That is, it has been decided not to conduct the re-examination of the failed students in the month of October. State School Education Minister Varsha Gaikwad informed about this on Wednesday.

The Minister of Education said that the re-examination of the students who failed in the examinations held in February-March is usually held in the month of October. However, due to the Corona crisis this year, the exam scheduled for October has been postponed. This is likely to take place in November or December.

About one lakh 25 thousand students have failed in class X and one lakh 80 thousand students in class XII. At the same time, there are some students who have also received ATKT. Tenth grade ATKT students are allowed eleventh admission. However, we are considering re-examination as an opportunity for Napas and ATKT students, said Varsha Gaikwad.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda