ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप?

By Naukari Adda Team


ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप?, The government is giving laptops for Rs 3500 to eighth graders for online education?

ऑनलाइन शिक्षणासाठी आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 3500 रुपयात लॅपटॉप?

 

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : सोशल मिडियावर (Social Media) एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs) विद्यार्थ्यांना 3500 रुपयात लॅपटॉप देत आहेत. या व्हायरल झालेल्या बातमीच्या मते, एमसीए कोव्हिड-19 ऑनलाइन शिक्षण अंतर्गत 8वी पासून पीयूसी 1 च्या विद्यार्थ्यांना 3500 रुपयात लॅपटॉप देत आहे. या खोट्या दाव्याची चौकशी जेव्हा पीआयबीने केली तेव्हा याबाबत सत्य उघडकीस आले. पीआयबीने हा दावा फेक ठरवला आहे.

 

काय आहे सत्य?

भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ही जाहिरात खोटी ठरवली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने असे म्हटले आहे की, एमसीए कोव्हिड-19 ऑनलाइन एज्यूकेशन उद्देश्य याकरता लॅपटॉप प्रदान करत नाही आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी खोटी आहे.

व्हायरल जाहिरातीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 3500 रुपयात लॅपटॉप खरेदी करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर आहे. अर्ज केल्यानंतर 30 दिवसात लॅपटॉप मिळेल. हे लॅपटॉप लावा, लेनोव्हो आणि एटीएस कंपनीचे असणार आहेत. ज्यामध्ये Windows 10 OS, Intel Atom Processor, 32GB HDD Storage, ATS, 2GB रॅम असेल.

 

या खोटारड्या जाहिरातीनुसार लॅपटॉपसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रं देखील गरजेची आहेत. आधार कार्ड, फोटो, विद्यार्थ्याचे आयडी कार्ड, पालकांचे आधार कार्ड, शिक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक द्यावा लागेल.

 

सोर्स - न्युज १८ लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The government is giving laptops for Rs 3500 to eighth graders for online education?

By Naukari Adda Team


The government is giving laptops for Rs 3500 to eighth graders for online education?

New Delhi, September 13: A news story is rapidly going viral on social media. It is claimed that the Ministry of Corporate Affairs is giving laptops to students for Rs 3,500. According to the viral news, MCA is offering laptops worth Rs 3,500 to PUC1 students from 8th standard under Covid-19 online education. The truth came to light when the PIB investigated this false claim. The PIB has dismissed the claim as fake.


What is the truth?

The PIB Fact Check, the official Twitter handle of the Government of India, has falsified the advertisement. The PIB fact check states that MCA does not provide laptops for Covid-19 online education purposes. The news that went viral on social media is false.

According to the viral advertisement, the last date to buy a laptop for Rs 3,500 is September 25. Laptops will be available within 30 days of application. The laptops will be from Lava, Lenovo and ATS. It will have Windows 10 OS, Intel Atom Processor, 32GB HDD Storage, ATS, 2GB RAM.


According to this fake advertisement, some documents are also required to apply for a laptop. Aadhar card, photo, student ID card, parent's Aadhar card, teacher's name and contact number will have to be given.


Source - News18 Lokmat
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda