रोजगारांची संधी! 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार!

By Naukari Adda Team


रोजगारांची संधी! 90 हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार!,  Bullet train work will provide employment to more than 90,000 people

बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिक जणांना मिळणार रोजगार

 

Bullet Train Jobs : बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकामादरम्यान 90000 हून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. 1 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने ही घोषणा (NHSRCL) केली आहे. या बांधकामाच्या वेळीच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 90000हून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

51000 पेक्षा जास्त तंत्रज्ञ, कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी निवेदनात दिली आहे. बांधकामासाठी 51000हून अधिक तंत्रज्ञ आणि कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता असेल. अशा लोकांना विविध संबंधित कामांसाठी प्रशिक्षण देणार आहे. ट्रॅक लावण्यासाठी, कंत्राटदारांच्या कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही कॉर्पोरेशन करेल.

तसेच 34000 पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी

बांधकाम सुरू असताना 34000पेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली. 460किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या ट्रॅकमध्ये एकूण 26 किलोमीटर बोगदे, 27 लोखंडी पूल, 12 स्टेशन्स आणि 7 किलोमीटर अंडरग्राऊंड बोगदे, इतर सुपर स्ट्रक्चर्स आहेत. बांधकाम चालू असताना 75 लाख टन सिमेंट आणि 21 लाख टन स्टील वापरण्याचा अंदाज आहे. यामुळे संबंधित उद्योगांमध्ये आणि त्यांच्याशी संबंधित पुरवठा शृंखलामध्ये रोजगाराच्या अतिरिक्त संधीही निर्माण होतील.

2016 मध्ये स्थापन झालेल्या या महामंडळाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, बांधकामाशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांच्या निविदा येत्या दोन महिन्यांत खुल्या केल्या जातील आणि त्या अंतिम असतील. जपान सहाय्य प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2017मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे केले.

सोर्स : लोकमत

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Bullet train work will provide employment to more than 90,000 people

By Naukari Adda Team


Bullet train work will provide employment to more than 90,000 people


Bullet Train Jobs: Good news for unemployed youth. The Mumbai-Ahmedabad bullet train project will provide employment to more than 90,000 people during construction. The announcement was made by the National High Speed ​​Rail Corporation (NHSRCL), which is implementing the Mumbai-Ahmedabad bullet train project worth over Rs 1 lakh crore. He said that more than 90,000 direct and indirect jobs will be created at the time of construction.


More than 51,000 technicians, skilled and unskilled workers are needed, said Sushma Gaur, spokesperson of the corporation. The construction will require more than 51000 technicians and skilled and unskilled workers. Such people will be trained for various related tasks. The corporation will also arrange special training for the contractor's staff to track it.
As well as more than 34000 indirect employment opportunities

More than 34,000 indirect employment opportunities will also be created during the construction, he said. The track, which is more than 460 km long, has a total of 26 km of tunnels, 27 iron bridges, 12 stations and 7 km of underground tunnels, among other superstructures. Construction is estimated to use 75 lakh tonnes of cement and 21 lakh tonnes of steel. It will also create additional employment opportunities in related industries and related supply chains.

A spokesperson for the corporation, which was set up in 2016, said tenders for some important works related to construction would be opened in the next two months and would be final. The bullet train, a Japanese aid project, was formally inaugurated by Prime Minister Narendra Modi in September 2017 in Ahmedabad in the presence of the then Prime Minister of Japan, Shinzo Abe.

Source: Lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda