कोरोना संकटकाळात ठाकरे सरकारनं दिला ५३ हजार तरुणांना रोजगार; मंत्र्यांची माहिती

By Naukari Adda Team


 कोरोना संकटकाळात ठाकरे सरकारनं दिला ५३ हजार तरुणांना रोजगार; मंत्र्यांची माहिती, Thackeray government provides employment to 53,000 youths during Corona crisis; Information of Ministers

 कोरोना संकटकाळात ठाकरे सरकारनं दिला ५३ हजार तरुणांना रोजगार; मंत्र्यांची माहिती

 

बेरोजगारीची  समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाइन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ५३ हजार ०४१ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे अशी माहिती मंत्री नवाब मलिक  यांनी दिली.

 फक्त ऑगस्ट महिन्यात १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला असं नवाब मलिकांनी सांगितले. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड ;घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते असं त्यांनी सांगितले.

 यात ऑगस्टमध्ये या वेबपोर्टलवर ३७ हजार ३२० इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन ;नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ६ हजार ७१०, नाशिक विभागात ५ हजार;६८७, पुणे विभागात १२ हजार ५२३, औरंगाबाद विभागात ७ हजार ०८८, अमरावती विभागात २& ;हजार ३४९ तर नागपूर विभागात २ हजार ९६३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ७५४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार १७७, नाशिक विभागात १ हजार ७६४, पुणे विभागात ६ हजार ३२०, औरंगाबाद विभागात २ हजार ९३२, अमरावती विभागात ११० तर ;नागपूर विभागात ४५१ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागल्याची माहिती सरकारने दिली .

 ऑगस्टमध्ये १३ हजार जागांसाठी ऑनलाइन मुलाखती 

 कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ;ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात ७६ ऑनलाइन रोजगार ;मेळावे झाले. ऑगस्टमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये १२८ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १३ हजार ८९४ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १० हजार ३३२ ;नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत १ हजार २८९ तरुणांना रोजगार ;मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना ;रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असंही नवाब मलिक म्हणाले.

 नोकरी इच्छूक तरुणांना नोंदणी करण्याचं आवाहन 

 यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील ;उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन मंत्री नवाब मलिकांनी केलं आहे

सोर्स: लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Thackeray government provides employment to 53,000 youths during Corona crisis; Information of Ministers

By Naukari Adda Team


Thackeray government provides employment to 53,000 youths during Corona crisis; Information of Ministers


Unemployment has become a problem. Despite this, the Skill Development, Employment and Entrepreneurship Department has organized online job fairs in the districts during the lockdown and various initiatives being implemented through the Mahasvayam web portal have provided employment to a total of 53,041 unemployed people, said Minister Nawab Malik.

In the month of August alone, 13 thousand 754 unemployed have got employment. Earlier, in the four months from April to July, 39,287 unemployed people got employment, said Nawab Malik. Malik said that the Department of Skill Development, Employment and Entrepreneurship has launched a web portal https://rojgar.mahaswayam.gov.in to bridge the gap between unemployed candidates and entrepreneurs. Unemployed candidates register on this web portal with information about their education, skills, experience etc. Companies, entrepreneurs, corporates who are looking for skilled candidates can also register on this web portal and find the skilled candidates they want. In this way, the work of coordinating between the unemployed and the entrepreneurs is done through this web portal, he said.

In August, 37,320 job-seeking candidates have registered or re-registered on this web portal. 6 thousand 710 in Mumbai division, 5 thousand in Nashik division; 687 in Pune division, 12 thousand 523 in Aurangabad division, 7 thousand 088 in Aurangabad division, 2 thousand 349 in Amravati division and 2 thousand 963 in Nagpur division. In August, 13 thousand 754 candidates got jobs through various initiatives of the Skill Development Department. According to the government, 2,177 unemployed candidates have been recruited in Mumbai division, 1,764 in Nashik division, 6,320 in Pune division, 2,932 in Aurangabad division, 110 in Amravati division and 451 in Nagpur division.
Online interviews for 13,000 seats in August

The Skill Development Department has launched a massive campaign of Pandit Deendayal Upadhyay online job fairs across the state during the lockdown. Online employment fairs are being held at every district level. From April to August, 76 online job fairs were held. 128 entrepreneurs participated in the fairs held in August. He conducted online interviews for 13,894 seats. 10 thousand 332 job-seeking youth participated in these fairs. Out of which 1 thousand 289 youths have got employment till now. The selection process for the remaining seats is underway from the remaining youth. Nawab Malik also said that efforts are being made by the department to provide employment to all the candidates.
Appeal to job-seeking youth to register

The department will continue to work on a campaign level for employment availability in the future as well. Job-seeking youth  https://rojgar.mahaswayam.gov.in   Register on this web portal with Aadhaar number. Candidates who have already registered should update their information, as well as private, public sector entrepreneurs, corporates who are looking for skilled candidates should also register on this web portal, appealed Minister Nawab Malik.

Source: Lokmat

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda