पायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये

By Naukari Adda Team


पायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये,  The company will pay Rs 28,000 for wearing pajamas and watching webseries at home

पायजमा घालून घरात बसून वेबसीरिज पाहण्यासाठी ही कंपनी देणार 28000 रुपये

 

लंडन, 29 सप्टेंबर : असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही म्हण खरोखर प्रत्यक्षात येऊ शकते. पायजमा घालून आरामात घरी सोफ्यावर बसून किंवा लोळत वेबसीरिज पाहण्यासाठी तुम्हाला मानधन मिळू शकतं. जगात कुठेही बसून (लोळून) काम केलंत तरी तुम्हाला ही नोकरीची ऑफर आहे. आरामदायी कपड्यांचं परीक्षण करण्यासाठी तुम्हाला 300 युरोंचं म्हणजेच  सुमारे 28 हजार 515 रुपयांचं मानधन मिळू शकतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घरातून पाऊलही बाहेर टाकावं लागणार नाही.

हे स्वप्न नसून सत्य आहे, ब्रिटनमधील पॉर मोई Pour Moi या कपड्यांच्या कंपनीने ही आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिली आहे. दिवसभर घरात पायजमा घालून निवांत सोफ्यावर बसून Netflix च्या वेबसीरिजचा आनंद लुटायचा आणि या कंपनीचे घरात वापरायचे कपडे वापरून कसं वाटलं हे त्यांना सागायचं. या कामासाठी तुम्हाला पैसे देण्याची घोषणा या कंपनीने केली आहे. सध्या अनेक लोक घरूनच काम करत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणं हा सर्वांत महत्त्वाचा उपाय मानला जात असल्याने ही संकल्पना राबवली जात आहे. अशाच काळात केवळ टीव्ही पाहण्याचे पैसे तुम्हाला कुणी दिले तर किती चांगलं होईल असा विचार तुमच्या मनात येऊन गेलाच असेल. तेच ही कंपनी करते आहे.

घरी बसून कपड्यांच्या परीक्षणाच्या या नोकरीसाठी तुम्ही 12 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकता. comfy clothing tester अशी ही पोस्ट आहे. जर यासाठी तुम्ही अर्ज करण्याच्या विचारात असाल तर कंपनीनी याबाबत असंख्य नियम दिलेले आहे. या ब्रँडने जाहिरातीत अगदी छोट्या फाँटमध्ये हे असंख्य नियम लिहिले आहेत़.  जर तुम्ही यात भाग्यवान उमेदवार ठरलात तर तुम्ही तुमच्या सोफा किंवा बेडवर बसून आपल्या आवडत्या टीव्ही शोचे 3 एपिसोड पहावे, यासह वाईनचा किंवा हॉट चॉकलेटचा आनंद घ्यावा,  एक कप चहा किंवा हॉट ड्रिंक्सचा आनंद घ्या आणि किमान 10 मिनिटं सोशल मीडियावर फेरफटका मारा या गोष्टी तुम्ही करू शकाल असं या जाहिरातीत म्हटलं आहे.

या जॉबसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी दहा तासांसाठी पॉर मोईचे कपडे घालावे लागतील, आणि 28 हजारांची रक्कम मिळवण्यासाठी ते कपडे वापरण्याचा अनुभव कसा होता याचा एक रिपोर्ट तुम्हाला द्यावा लागेल. यासह निवड झालेल्या उमेदवारांना दिवसातून अनेकदा आपला पोषाख बदलवा लागणार आहे. जेणेकरून पॉर मोईने दिलेल्या कपड्यांचे परीक्षण करता येईल. हे कपडे तुम्ही स्वत:जवळच ठेवू शकता.

हे कपडे वापरल्याचे फोटो  सोशल मीडियावर टाका अशी अट यामध्ये नाही.  वयाची 18 वर्ष पूर्ण केलेलं कुणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतं. 12 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार असून, 26 ऑक्टोबरला भाग्यवान उमेदवारांची नावं जाहीर केली जातील.

sors- news 18 lokmat


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The company will pay Rs 28,000 for wearing pajamas and watching webseries at home

By Naukari Adda Team


The company will pay Rs 28,000 for wearing pajamas and watching webseries at home

London, September 29: This saying may come true when I go to bed. You can get honorarium for watching webseries while sitting on the sofa or rolling at home in pajamas. No matter where you work in the world, you have this job offer. You can get an honorarium of 300 euros, or about 28,515 rupees, for testing comfortable clothes, and most importantly, you don't have to step out of the house.

This is not a dream come true, Pour Moi, a clothing company in the UK, has provided this unique opportunity. He would spend the day in pajamas at home, sitting on a comfortable sofa, enjoying Netflix's webseries, and telling them how he felt about using the company's home clothes. The company has announced that it will pay you for this work. Many people are currently working from home. The concept is being implemented as the most important way to break the corona chain is to avoid crowds. At the same time, you may have wondered how much better it would be if someone paid you just to watch TV. That's what this company does.

You can apply for this job of testing clothes at home till October 12. This is a post on comfy clothing tester. If you are considering applying for this, the company has a number of rules in place. The brand has written these rules in very small fonts in advertisements. If you are a lucky candidate, you can sit on your sofa or bed and watch 3 episodes of your favorite TV show, including wine or hot chocolate, a cup of tea or hot drinks and take a walk on social media for at least 10 minutes. That is stated in this advertisement.

Candidates selected for this job will have to wear Por Moi clothes for at least ten hours, and you will have to give a report on how they had the experience of using those clothes to get the amount of Rs 28,000. With this, the selected candidates will have to change their attire several times a day. So that the clothes given by Por Moi can be examined. You can keep these clothes with you.

There is no requirement to post photos of these clothes on social media. Anyone who has completed 18 years of age can apply for this job. Registration will be open till October 12 and the names of the lucky candidates will be announced on October 26.

sors- news 18 lokmat


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021